विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवणाऱ्या शिक्षकाला गावकऱ्यांचा चोप खिचडी बनविणाऱ्या महिलेने उघड केला प्रकार; आरोपी शिक्षक पोलिसांच्या ताब्यात भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून आक्षेपार्ह चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शाळेत खिचडी बनविणाऱ्या महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मिळालेल्या माहितीनुसार, वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने काही विद्यार्थिनींना मोबाईलवर घाणेरडे व्हिडीओ दाखवले तसेच त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप आहे. हा प्रकार शाळेत मध्यान्ह भोजनासाठी खिचडी बनविणाऱ्या महिलेच्या लक्षात आला. तिने तातडीने ही माहिती गावकऱ्यांना दिली. ही बाब समजताच गावातील नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली आणि संतापाच्या भरात संबंधित शिक्षकाला मारहाण केली. त्यानंतर शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

- जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.1
- कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला1
- इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं1
- भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.1
- मां-बहन की गाली देने वालों की अब खैर नहीं! देश के भीतर इस जगह लागू हुई सख्त व्यवस्था, बच्चाें की पढ़ाई के दौरान मोबाइल-टीवी रहेंगे बंद महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के कोलगांव गांव ने एक अनोखा नियम लागू किया है. यानी अब अगर कोई व्यक्ति मां-बहन से जुड़ी गालियां देता है तो उस पर 500 रुपये का जुर्माना लगाया जाएगा. ग्राम सभा में पास हुए इस प्रस्ताव का मकसद गांव में सम्मानजनक माहौल बनाना और महिलाओं की गरिमा की रक्षा करना है. जिसकी खूब चर्चा हो रही है.समझते हैं पूरी बात.1
- तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- महाराष्ट्र : बीड शहर के बालपीर इलाके में एक तेज रफ्तार ऑटो रिक्शा का आगे वाला पहिया अचानक निकल गया, जिसके बाद रिक्शा हवा में उछलते हुए अनियंत्रित होकर दोपहिया वाहनों से जा टकराया. इस दुर्घटना में रिक्शा में सवार महिलाओं समेत 3–4 लोग घायल हुए, जिन्हें इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है1