logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

झोलांड कादंबरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित "झोलांड कादंबरीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित " रिसोड:- मराठी साहित्यात एक नवीन दृष्टीकोन आणणारी रंगनाथ पिराजी धांडे यांच्या झोलांड कादंबरीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2026 चा कादंबरीचा प्रथम पुरस्कार 14 एप्रिल 2026 रोजी घोषित झाला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर च्या पुरस्कारांसाठी झोलांड कादंबरीची निवड झाल्याचे अकादमीचे सचिव प्रकाश घानगिने यांनी कळविले आहे. अकादमीचे पुरस्कार वितरणाचे हे अठरावे वर्ष असून या पुरस्काराचे वितरण डाॅ.भालचंद्र ब्लड बॅक,बस स्टॅण्ड मागे येथे दिनांक 28/4/2026 रोजी मंगळवारी अकादमीच्या दुसरे साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह,शाल व प्रशस्तिपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात येईल. कादंबरी विभागात प्रथम क्रमांक झोलांड ला प्राप्त झाला तर द्वितीय क्रमांक सचिन फक्कड अवघडे सांगली यांच्या फक्कड कादंबरीला तर तृतीय क्रमांक बा.बा.कोटंबे परभणी यांच्या 'उन सावलीच्या शोधात' कादंबरीला प्राप्त झाला. झोलांड कादंबरीला प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याने चळवळकेंद्री कादंबरीच्या परंपरेत वेगळे स्थान अधोरेखीत झाले. आंबेडकरी चळवळ ही केवळ एका घटकांसाठी मर्यादित नाही तर शोषित, पीडित व वंचित या समस्त घटकांच्या उत्थानासाठी आहे, समाजोध्दारक चळवळ आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जीवनमूल्य म्हणून स्विकारणे ही काळाची गरज आहे.हे स्पष्ट विशद करणारी झोलांड कादंबरी आहे. या कादंबरीला वर्‍हाडी बोलीभाषेची झालर आहे.त्यामुळे ती या मातीशी इमान ठेवून आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पातळ्यांवरील गुंतागुंतीच्या गट-तटाच्या समस्यांचा वेध घेऊन आंबेडकरी चळवळ मानवमुक्तीची सामाजिक चळवळ आहे,असा महत्त्वपूर्ण सुतोवाच झोलांड कादंबरीत आहे. सदर पुरस्कार प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे.

22 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
22 hrs ago
d3b75dbc-2afc-47d6-b0de-483905ca3c89

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.
    2
    वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना  शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मंगरूळपीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली साजरी
    1
    मंगरूळपीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली साजरी
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.
    1
    दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते  अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Abdul Naeem
    1
    Post by Abdul Naeem
    user_Abdul Naeem
    Abdul Naeem
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    15 hrs ago
  • संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!
    1
    संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण 
शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे.
दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    15 hrs ago
  • अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    1
    अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.