दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाचा उदगीरकरांना ठेंगा उदगीर (एल पी उगीले) उदगीर रेल्वे स्टेशन येथे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव तसेच विभागीय व्यवस्थापक गोपालकृष्णन यांच्यासह आपल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यासोबत 17 फेब्रुवारी 2020 रोजी सुरक्षा पाहणी दौऱ्यावर येणार आहेत आणि दुपारी बारा वाजता उदगीर रेल्वे स्टेशनला भेट देणार आहेत, अशा पद्धतीचा निरोप आला होता. विशेष म्हणजे या महाप्रबंधकाच्या दौऱ्यासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय बनसोडे आणि लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यापूर्वी 11 जुलै 2025 मध्ये संजय कुमार श्रीवास्तव यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांचा हा पहिला सुरक्षा पाणी दौरा होता. या दौऱ्यात हैदराबाद पुणे मुंबई वंदे भारत स्लीपर वर्जन हैदराबाद इंटरसिटी सोबत स्टेशन विकासाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती संघर्ष समितीच्या माध्यमातून बेल सकारगा येथे नवीन क्रॉसिंग स्टेशन निर्माण करावे लातूर रोड व परळी येथे नवीन बायपास लाईन टाकावी विकाराबाद परळी वैजनाथ 265 किलोमीटर दुहेरीकरण लाईन मंजूर असून त्यास गती देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा विविध मागण्या करण्यात येणार होत्या तसेच अनेक रेल्वे प्रस्ताव असून त्या लवकरात लवकर चालू करण्याची ही मागणी या परिसरातील प्रवाशांच्या वतीने रेल्वे संघर्ष समिती करणार होती मात्र हे सर्व असे असले तरीही महाप्रबंधकांनी उदगीर स्टेशनवर न थांबता सरळ ते बिदरला गेल्याने उदगीर परिसरातील रेल्वे प्रवाशांना धक्का बसला आहे. उदगीर परिसरातील लोकांना महाप्रबंधक आणि ठेंगा दाखवल्याबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने उदगीर रेल्वे स्टेशनचे शुशोभीकरण करण्यात आले होते, त्यासंदर्भात ही त्यांनी पाहणी केली नाही याबद्दलही रेल्वेचे कर्मचारीही नाराज आहेत.

- Post by Vishwanath Hengne1
- उमदरीयेथील गट क्रमांक ५८/३ मध्ये सुरू असलेल्याबेकायदशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनही, भूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाही. उलट, अधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहे. प्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी १ एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाही, अद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार झाल्या पासून हे उत्खनन थांबण्या ऐवजी त्याचे स्वरूप अधिक ‘चोरटे‘ झाले आहे. ५ ते ६ हायवा टिपर्सच्या माध्यमातून रातोरात मुरूम गायब केला जात आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाआरोप होत आहे. ‘जाया मोका‘ पंचनामा त्वरित होणे अपेक्षित असताना टाळाटाळ का केली जात आहे? आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. मुखेडचे तहसीलदार याकडे गांभीर्याने बघून गुन्हे दाखल करणार की भूमाफियांना अभय देणार, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.2
- नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती1
- लातूर शहरात भीमजयंतीचा जल्लोष; मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी भीम आर्मीच्या स्टेजवर मिरवणूक व मिरवणूक अध्यक्षाचे सन्मान चिन्ह देऊन केले स्वागत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी (दि. १४) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी, शुभेच्छांच्या फलकांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. एका बाजूला आंबेडकर अनुयायांनी, भीम सैनिकांनी समतेचा संदेश देत लातूर शहरातून अनेक भागातून मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकांना शांततेचा संदेश देत भीम आर्मीचे रणधीर सुरवसे यांनी मिरवणुकीतील अध्यक्षांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष रणधीर सुरवसे यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शिका संघर्ष करा परंतु आपला समाज संघटित झाला नाही तो झाला पाहिजे, संघटन करा असे समाजाला संदेश देत सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भीम आर्मीने उत्साहात साजरी केली. याप्रसंगी भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- 🙏 मी तुम्हाला एका खास उपक्रमासाठी आमंत्रित करत आहे… 🌍 आज जगात ताण, भीती आणि अस्थिरता वाढत आहे… पण एक सुंदर सत्य आहे - 👉 समाजातील फक्त 1% लोक जर नियमित ध्यान करू लागले, तर त्यांचा शांत आणि सकारात्मक प्रभाव हळूहळू संपूर्ण समाजात पसरतो 💫 🧘♂️14 दिवसांची विनामूल्य मेडिटेशन सिरीज 🗓 20 एप्रिलपासून ⏰ Batch Timings: 👉 7:00 AM | 11:00 AM | 7:00 PM ✨ प्राणायाम • ध्यान • सकारात्मक ऊर्जा आताच विनामूल्य नोंदणी करा आणि त्या 1% चा भाग बनन्यासाठी व्हॉटसअप करा 9422366147 🌿 शांत मनातूनच शांत जग निर्माण होतं 🌍1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम4
- नांदेड मध्ये महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नांदेड जिल्हा पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम नमस्कार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली विष्णुपूरी येथील डॉक्टर. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवार १४ एप्रिल रोजी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळ आणि अन्नदान वाटप करण्यात आले आहे1
- विश्वभूषण,भारतरत्न दलीत - बहुजनांचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मुखेड येथील स्मारकात काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या शुभप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस सुनिल पाटील आरगिळे,शहर काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,युवक काँग्रेस ता. उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,दिपक गुरूजी लोहबंदे,सतिष चौव्हाण,ईरफानभाई मोमिन, गोविंदराव पाटील सह वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीज पठाण यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले.3