logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

संतापजनक! इंदापूर तालुक्यातील भादलवाडीत १४ वर्षांच्या मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; ६७ वर्षांच्या नराधम चुलत्याला अटक... # संतापजनक! इंदापूर तालुक्यातील भादलवाडीत १४ वर्षांच्या मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; ६७ वर्षांच्या नराधम चुलत्याला अटक **भिगवण / इंदापूर: समर्थ न्युज नेटवर्क ** इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षे ५ महिन्यांच्या मतिमंद अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरात जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात ६७ वर्षांच्या वृद्ध नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास मौजे भादलवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी ही मतिमंद व अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही, तिचे सख्खे चुलते आरोपी **शिवाजी चंद्रकांत दणाणे** (वय ६७ वर्ष, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) यांनी तिला पाय दाबायला लावून, तिची इच्छा नसताना तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय ४० वर्षे) भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ६४(२) (फ, आय, के), ६५(१), ७४ तसेच पोक्सो (POCSO) कायदा कलम ४, ६ व ८ अंतर्गत गुन्हा रजि. नं. १९२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून भिगवण पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी शिवाजी चंद्रकांत दणाणे याला ३० जुलै २०२६ रोजी रात्री २१:०६ वाजता अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ शेंडगे करत आहेत.

15 hrs ago
user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
15 hrs ago
fbc607d9-743f-46b5-8d8e-3afa18350b9e

संतापजनक! इंदापूर तालुक्यातील भादलवाडीत १४ वर्षांच्या मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; ६७ वर्षांच्या नराधम चुलत्याला अटक... # संतापजनक! इंदापूर तालुक्यातील भादलवाडीत १४ वर्षांच्या मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; ६७ वर्षांच्या नराधम चुलत्याला अटक **भिगवण / इंदापूर: समर्थ न्युज नेटवर्क ** इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षे ५ महिन्यांच्या मतिमंद अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरात जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात ६७ वर्षांच्या वृद्ध नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास मौजे भादलवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी ही मतिमंद व अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही, तिचे सख्खे चुलते आरोपी **शिवाजी चंद्रकांत दणाणे** (वय ६७ वर्ष, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) यांनी तिला पाय दाबायला लावून, तिची इच्छा नसताना तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय ४० वर्षे) भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ६४(२) (फ, आय, के), ६५(१), ७४ तसेच पोक्सो (POCSO) कायदा कलम ४, ६ व ८ अंतर्गत गुन्हा रजि. नं. १९२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून भिगवण पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी शिवाजी चंद्रकांत दणाणे याला ३० जुलै २०२६ रोजी रात्री २१:०६ वाजता अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ शेंडगे करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
    3
    श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
    1
    जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* 📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी मान्यवर उपस्थित होते. KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:8007913668
    1
    मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”*
📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास  सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी  आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी  मान्यवर उपस्थित होते.
KHABARDAR NEWS 
✨ आवाज जनतेचा ✨
━━━━━━━━━━━━━━━
🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 
🟨 संपर्क: दत्तात्रय पवार
📞 मो:8007913668
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • घोडनदी येथे जैन समाजाच्या चातुर्मासाला उत्साहात प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: घोडनदी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यंदाच्या चातुर्मास-2026 सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला आहे. धर्मसभा मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाच्या चातुर्मासात प्रवचन प्रभाविका ज्ञान प्रबोधिनी साध्वी पू. आभाश्रीजी म.सा., आगम ज्योती साध्वी पू. डॉ. महिमाश्रीजी म.सा. तसेच मधुर व्याख्यानी साध्वी पू. डॉ. श्रेयांश्रीजी म.सा. यांचे पावन सान्निध्य लाभले आहे. चातुर्मास काळात दररोज सकाळी ६.३० वाजता प्रार्थना, सकाळी ८.४५ ते ९.४५ या वेळेत प्रवचन, दुपारी २.३० वाजता महिलांसाठी धार्मिक वर्ग तसेच सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण आयोजित करण्यात आले आहे. चातुर्मासाची सुरुवात धर्मचक्र तपाने करण्यात आली असून अधिकाधिक भाविकांनी एकासना, आयंबिल, उपवास, दया, रात्री संवर व पौषध यांसारख्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धर्मचक्र तपस्वींच्या पारण्याची व्यवस्था श्री जैन युवा परिषद करणार असून चातुर्मास कालावधीत गौतम प्रसादीची व्यवस्था पंचायत भवन भोजनशाळेत करण्यात आली आहे. दर्शन, प्रार्थना, प्रवचन, धर्मचर्चा, मांगलिक व प्रतिक्रमणाचा लाभ घेऊन आत्मशुद्धी आणि कर्मनिर्जरा साधावी, असे आवाहन जैन श्रावक संघाने केले आहे. हा कार्यक्रम स्व. श्री सुखलालजी खाबिया धर्मसभा मंडप, पंचायत भवन, घोडनदी येथे होत आहे.
    2
    घोडनदी येथे जैन समाजाच्या चातुर्मासाला उत्साहात प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: घोडनदी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यंदाच्या चातुर्मास-2026 सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला आहे. धर्मसभा मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाच्या चातुर्मासात प्रवचन प्रभाविका ज्ञान प्रबोधिनी साध्वी पू. आभाश्रीजी म.सा., आगम ज्योती साध्वी पू. डॉ. महिमाश्रीजी म.सा. तसेच मधुर व्याख्यानी साध्वी पू. डॉ. श्रेयांश्रीजी म.सा. यांचे पावन सान्निध्य लाभले आहे.
चातुर्मास काळात दररोज सकाळी ६.३० वाजता प्रार्थना, सकाळी ८.४५ ते ९.४५ या वेळेत प्रवचन, दुपारी २.३० वाजता महिलांसाठी धार्मिक वर्ग तसेच सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण आयोजित करण्यात आले आहे.
चातुर्मासाची सुरुवात धर्मचक्र तपाने करण्यात आली असून अधिकाधिक भाविकांनी एकासना, आयंबिल, उपवास, दया, रात्री संवर व पौषध यांसारख्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धर्मचक्र तपस्वींच्या पारण्याची व्यवस्था श्री जैन युवा परिषद करणार असून चातुर्मास कालावधीत गौतम प्रसादीची व्यवस्था पंचायत भवन भोजनशाळेत करण्यात आली आहे.
दर्शन, प्रार्थना, प्रवचन, धर्मचर्चा, मांगलिक व प्रतिक्रमणाचा लाभ घेऊन आत्मशुद्धी आणि कर्मनिर्जरा साधावी, असे आवाहन जैन श्रावक संघाने केले आहे.
हा कार्यक्रम स्व. श्री सुखलालजी खाबिया धर्मसभा मंडप, पंचायत भवन, घोडनदी येथे होत आहे.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल
    1
    अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद 
खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून  संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल
    user_Devidas Devadhe
    Devidas Devadhe
    पाथर्डी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    2
    विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना 
विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह.
विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट 
हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली.
सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले
    1
    वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
    1
    रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी सातला रुग्णालयात हजेरी;
सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.