Shuru
Apke Nagar Ki App…
हॉटेल किनारा परंडा आपल्या व्यवसायाची जाहिरात तयार करुण मिळेल जाहिरात बनवून मिळेल संपर्क करा 9096828080
Vijay Meher
हॉटेल किनारा परंडा आपल्या व्यवसायाची जाहिरात तयार करुण मिळेल जाहिरात बनवून मिळेल संपर्क करा 9096828080
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by कर्जत लाईव्ह1
- देविदास गुरधाळे मामांच्या समरणार्थ 92 फुटी अस्थी विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे रस्ते विकास महामंडळाचे MD डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देविदास गुरधाळे मामा यांच्या समरणार्थ डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने भव्य अस्थी विसर्जन घाट सोबतच मनोहरी गार्डन, पूजा विधिसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिव मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. या भव्य कार्याचा भूमिपूजन समारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळी सलगरा येथील ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात कुठेही अस्थी विसर्जन घाट, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट नाही. यासाठी जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर नाशिक येथे जावे लागते. धोबी घाट नसल्याने दगडावरून पडल्याने अपघाताच्या घटना येथे घडल्या होत्या. गावाकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवाकुंड ट्रस्टकडे ही मागणी केली. सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या गायकवाड यांनी देविदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक बांधण्याची घोषणा केली. या मध्ये अस्थी विसर्जन घाट, गार्डन, शिव मंदिर, सांभामंडप, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट उभारण्याचा निर्णय घेतला. सेवाकुंडचे पदाधिकारी स्वतः इंजिनियर असलेले दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.1
- अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीट-वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान ! गहू, ज्वारी, कांदा पिके आडवी फळबागांनाही फटका.. जालना जिल्ह्यात १९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान सलग चार वेळा अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील पिके अक्षरशः आडवी पडली असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.1
- आज शुक्रवार तीन मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर शिवारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे, सदरची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन विहिरीतून मृतदेह शोधून चिखलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात येत आहे.1
- Post by Laxman Ugile2
- ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हडपसर येथे 5 एप्रिल 2026 या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! सभेच्या प्रचारासाठी 3 एप्रिलला हडपसर येथे भव्य वाहनफेरी ! विक्रम शिंदे (भोर )दि.3 पुणे : आज गोहत्या, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद, देवतांचे विडंबन करणे यांसारखी असंख्य संकटे हिंदूंवर वारंवार येत आहेत. पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांचे वाढते प्रमाण आपल्या सुरक्षिततेसमोर मोठे आव्हान उभे करत आहे.आपले शहर आणि संस्कृती आज धोक्यात आली आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाज्वल्य स्वाभिमान मनात जागृत करून या सर्व अन्यायकारक संकटांना 'हिंदु संघटन' हेच एकमेव चोख उत्तर आहे. हिंदूंवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 5 एप्रिल 2026 या दिवशी सायंकाळी 6 वाजता मारुतीराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ, हडपसर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी हिंदुत्वाची बुलंद तोफ भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे मान्यवर उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती श्री. पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, श्री. सुनील घनवट, सी.ए. श्री. सर्वेश मेहेंदळे, वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, श्री. पराग गोखले, रुद्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गायकवाड उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना श्री. सुनील घनवट म्हणाले की, हिंदू धर्मविरोधी कथानक रचून 'हलाल जिहाद'सारख्या माध्यमांतून एक समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. विविध प्रकारचे जिहाद, देशाची सुरक्षा आणि 'वक्फ बोर्डा'च्या माध्यमातून अद्यापही ताब्यात असलेल्या मंदिरांच्या जमिनी, तसेच वर्तमान काळात भारताला 'हिंदु राष्ट्र' घोषित करणे या मुख्य मागण्यांविषयी सभेमध्ये सर्वांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी नमूद केले की, अशा सभांच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणावर जागृती होत असून सर्वांनी धर्मकार्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. समाज धर्मशिक्षित व्हावा, हाच संस्थेचा उद्देश असून सर्व हिंदूंनी या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सी.ए.श्री.सर्वेश मेहेंदळे यांनी सांगितले की, आज देश आणि धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी संघटन हाच एकमेव मार्ग आहे. आम्ही सर्व संघटना यामध्ये सक्रिय असून सर्व हिंदुत्ववाद्यांनी पूर्ण ताकदीनिशी या सभेला उपस्थित रहावे. सभेच्या नियोजनाविषयी माहिती देताना श्री. पराग गोखले यांनी सांगितले की, सभेच्या ठिकाणी क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष, गोरक्षण आणि हिंदूंवरील अत्याचारांविषयी माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच युवकांसाठी आणि मुलांसाठी बालसंस्कार कक्षासह विविध धर्मग्रंथ व आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शनही कार्यक्रमस्थळी असेल. सभेच्या निमित्ताने आतापर्यंत पुणे शहरासह बारामती, दौंड, सासवड, जुन्नर, यवत, पारगाव अशा 100 हून अधिक गावांमध्ये व्यापक प्रसार करण्यात आला आहे. विविध तरुण मंडळे, महिला गट आणि ग्रामस्थांच्या शेकडो बैठका, रामनवमी उत्सव, हस्तपत्रके, होर्डिंग्ज आणि सामाजिक माध्यमांच्या द्वारे सभेचा संदेश घराघरांत पोहोचवण्यात आला आहे. सभेच्या निमित्ताने जनमानसात जागृती व्हावी या उद्देशाने समितीच्या वतीने 3 एप्रिल या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी भेकराईनगर PMT बस डेपो येथून प्रारंभ होऊन पापडेवस्ती, काळेपडळ, ससाणेनगर, पुरोहित स्वीट चौक मार्गे जाऊन मारुतीराव काळे विद्यालयाच्या मैदानावर विसर्जित होईल.1
- आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती. जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.1
- उदगीर पोलिसांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी सह पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरगोजे अटक लाचखोरी प्रकरणात दोन पोलिस अधिकारी अडकले; उदगीरमध्ये खळबळ उदगीर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर युनिटने गुरुवारी (दि. २ एप्रिल २०२६) उदगीर येथे मोठी सापळा कारवाई करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राहुल बाबूराव नागरगोजे (पोलीस हवालदार, उदगीर शहर) आणि राजकुमार पुजारी (पोलीस निरीक्षक, उदगीर ग्रामीण) यांना आरोपी करण्यात आले आहे. तक्रारदार (वय ४३, रा. हडपसर, पुणे) यांच्या मेव्हण्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १ एप्रिल रोजी प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी २ एप्रिल रोजी करण्यात आली असता, आरोपी राहुल नागरगोजे यांनी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सांगण्यावरून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच रक्कम उदगीर येथील पंचवटी हॉटेल, अहमदपूर रोड येथे देण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना राहुल नागरगोजे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे यांनी तत्काळ राजकुमार पुजारी यांना फोन करून “भेट झाली” अशी माहिती दिली. यावेळी तक्रारदाराने पुजारी यांच्याशी फोनवर संवाद साधला असता, “पाठवून द्या, मदत करता येईल” असे सांगून त्यांनीही लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान आरोपी नागरगोजे याच्याकडून ४५ हजार रुपयांची लाच रक्कम व एक मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला असून, आरोपी पुजारी यांच्याकडूनही एक मोबाईल हँडसेट मिळून आला आहे. दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत.4
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे. सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत.... #पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या #PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews1