गडहिंग्लज-आजरा शहरांसाठी बायपासची मागणी | संकेश्वर-आंबोली महामार्गामुळे वाढली वाहतूक कोंडी – संसदेत धनंजय महाडिक संकेश्वर ते आंबोली या नव्या कॉंक्रीट महामार्गामुळे गडहिंग्लज आणि आजरा शहरात वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने, या दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र बायपास रस्ता मंजूर करावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत केली. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांबाबत चर्चा झाली. यावेळी खासदार महाडिक यांनी संकेश्वर-आंबोली-बांदा या नव्या चार पदरी कॉंक्रीट रस्त्याबाबत केंद्र सरकारचे आभार मानले. मात्र हा महामार्ग गडहिंग्लज आणि आजरा शहराच्या मुख्य बाजारपेठेतून जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे गडहिंग्लज आणि आजरा या दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र बायपास रोड उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मागणीला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, गडहिंग्लज आणि आजरा शहरांसाठी बायपास रस्त्याचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्राकडे प्राप्त झाला आहे. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. याच वेळी खासदार महाडिक यांनी कोल्हापूर ते सांगली चार पदरी महामार्गाचे काम लवकर पूर्ण करावे, अशीही मागणी केली. त्यावर बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले की, या प्रकल्पाची अंदाजित किंमत १ हजार १९२ कोटी रुपये आहे. जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने त्यावर तोडगा निघाला आहे. सध्या या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून एप्रिल महिन्यात निविदा मंजूर होण्याची शक्यता आहे. तसेच जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यात कोल्हापूर-सांगली चार पदरी महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

- कुडाळ येथील कचरा डेपोला आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप अत्यंत गंभीर होते, मात्र कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ही आग वेळीच नियंत्रणात आली असून मोठा अनर्थ टळला आहे. नेमकी घटना काय? आज दुपारच्या सुमारास कुडाळ येथील कचरा डेपोमध्ये अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. वाऱ्याच्या वेगामुळे आग वेगाने पसरत होती, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्षा मैदानात घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः घटनास्थळी धाव घेतली. केवळ सूचना देऊन न थांबता, त्या स्वतः अग्निशामक बंबासोबत (Fire Tender) घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली. आग नियंत्रणात नगराध्यक्षांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर पाण्याचा मारा करून ती अधिक पसरण्यापासून रोखण्यात आली. नगराध्यक्षांच्या समयसूचकतेमुळे आणि तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे ही भीषण आग आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. या संकटसमयी लोकप्रतिनिधी म्हणून धावून येत कामात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याबद्दल कुडाळवासीयांकडून नगराध्यक्षांचे कौतुक होत आहे.6
- स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही पूरक तपास सुरू ठेवत पोलिसांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, संबंधित क्रमांकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व तांत्रिक पुरावे तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित मोबाईल क्रमांकाचा सीडीआर मिळवण्यासाठी दूरसंचार कंपनीकडे अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सीडीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात यापूर्वी १० कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड आणि साक्षीदारांचे जबाब यांसारख्या पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांत यादव यांच्या संदर्भातील सीडीआर तपासात ते घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. आता स्वप्ना यादव यांच्या सीडीआर तपासातून प्रकरणातील इतर पैलू उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकारांकडून सुरुवातीपासूनच निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी करण्यात येत होती. पूरक तपासाद्वारे प्रत्येक तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात असल्याने तपास प्रक्रियेबाबत विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रिया काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला प्रारंभ होणार असला तरी, पूरक तपासातून समोर येणारी माहितीही खटल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सीडीआर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..1
- Post by मन्सूर शेख1
- चेन्नईत भोरच्या श्लोकची सुवर्ण कामगिरी विक्रम शिंदे /भोर दि.१५ चेन्नई येथे पार पडलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्केट गेम स्पर्धेत भेलकेवाडी ,भोर येथील श्लोक पराग भेलके याने चमकदार कामगिरी केली आहे. दि.१४ ते १७ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेतील पाचशे आणि दोनशे मीटर स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.देशाच्या विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले असून ग्रामीण भागातील असूनही श्लोक याने नेत्रदीपक कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- Post by TNMaharashtra News Channel1
- शिवसेनेतील अंतर्गत वाद, एस.आय.टी. चौकशी आणि 'सी.डी.आर.' वरून होणारे आरोप या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "विरोधकांकडे आमच्या विरुद्ध काहीही ठोस पुरावे नसल्याने केवळ ओळखीचे निमित्त करून आम्हाला टार्गेट केले जात आहे, हे एक राजकीय षडयंत्र आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सी.डी.आर. आणि चौकशीवर भाष्य सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना केसरकर म्हणाले की, "एस.आय.टी. आणि ई.डी. या यंत्रणा आपले काम करत आहेत. कोणासोबत फोटो असणे किंवा जुनी ओळख असणे हा गुन्हा नाही. केवळ राजकीय बदनामीसाठी आमची नावे घेतली जात आहेत. यंत्रणांना जिथे संशयास्पद माहिती मिळते, तिथे ते चौकशीसाठी कोणालाही बोलावू शकतात, त्यात गैर काहीच नाही." गोपनीय सी.डी.आर. राजकीय नेत्यांकडे कसे पोहोचले, याची चौकशी सरकार करेल, असेही त्यांनी नमूद केले. अजित पवारांचा अपघात आणि 'काळी जादू'चे आरोप अजित पवार यांच्या अपघातापूर्वी 'काळी जादू' झाल्याच्या आरोपांवर विचारले असता केसरकर म्हणाले, "दादांचा अपघात अत्यंत दुर्दैवी होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि दोषींना सोडले जाणार नाही. मात्र, कोणीही काहीही विधाने करणे आणि त्याला मी उत्तर देणे योग्य नाही." शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदलाची मागणी शक्तीपीठ महामार्गाबाबत महत्त्वाची भूमिका मांडताना केसरकर यांनी सध्याच्या आराखड्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले: सध्याचा मार्ग कोकणावर अन्याय करणारा आहे, कारण तो थेट प्रवाशांना गोव्याला नेतो.हा मार्ग आजऱ्यावरून थेट रेडी बंदराला जोडला जावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे कोकणातील पर्यटन, कोस्टल रोड आणि स्थानिक बंदरांचा विकास होईल.तिलारी आणि चंदगड मार्गे 'फोर लेन' रस्ता करून दक्षिण व उत्तर गोव्याला जोडल्यास इको-सेन्सिटिव्ह झोनचेही रक्षण होईल. शिवसेनेतील अंतर्गत खदखद डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर केलेल्या विधानावर केसरकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावरील आहे. जर कुठे चूक झाली असेल, तर मुख्यमंत्री संबंधितांना योग्य त्या सूचना देतील. पक्षामध्ये कोणतीही नाराजी राहणार नाही याची मला खात्री आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. आंबा-काजू उत्पादकांना मदत आंबा आणि काजू उत्पादकांना मिळालेली मदत तुटपुंजी असल्याच्या आरोपावर ते म्हणाले की, आंब्याला नुकसान भरपाई मिळण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब असून भविष्यात अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.1