*केळीवेळी येथे अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई १० हजार ७५० रुपयांची देशी दारू जप्त,दोघांविरुद्ध गुन्हे दाखल* अहेमद शेख / अकोट केळीवेळी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात दहीहंडा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल २१५ नग देशी दारूचे क्वॉर्टर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत १० हजार ७५० रुपये आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्टच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.आगामी धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.बसस्थानक परिसरात पहिली कारवाई पहिल्या कारवाईत अरुण नारायण भटकर (वय ५५ रा. केळीवेळी याच्यावर कारवाई करण्यात आली.गुप्त माहितीच्या आधारे ग्राम केळीवेळी येथील बसस्थानक परिसरात पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ९० एम.एल. क्षमतेचे १२५ देशी दारूचे क्वॉर्टर आढळून आले.या दारूची किंमत ६ हजार २५० रुपये असून पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.दुसऱ्या कारवाईत ९० क्वॉर्टर जप्त दुसऱ्या स्वतंत्र कारवाईत किशोर विठ्ठल कानपूरे (वय २९, रा. केळीवेळी, ता. अकोट) याच्याकडून ९० एम.एल. क्षमतेचे ९० देशी दारूचे क्वॉर्टर जप्त करण्यात आले. जप्त दारूची किंमत ४ हजार ५०० रुपये आहे.दोघांविरुद्ध गुन्हे दाखल या दोन्ही प्रकरणांमध्ये दहीहंडा पोलीस ठाण्यात अनुक्रमे अप. क्र. ४६२/२०२६ आणि ४६३/२०२६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त दारूचे नमुने पुढील सी.ए. तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून, दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.ही कारवाई दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी पोहवा सतीश वानखडे (ब.नं. ४२२) तसेच तपास अधिकारी पोहवा रविराज डाबेराव (ब.नं. १९१९) यांच्या पथकाने केली.धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई आगामी धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर केळीवेळी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, अशा गैरप्रकारांविरोधात पोलिसांनी सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन परिसरातील गैरप्रकारांना आळा बसावा, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

- अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.2
- शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन; शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन;1
- आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.3
- दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; जळगाव जामोद(प्रतिनिधी): अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी निंभोरा बु. व खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास २८ सप्टेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.दुष्काळी सवलती व विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा.पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.सन २०२५-२६ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा मागण्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुंदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिघडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.1
- माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.1
- ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी जागो जागी रांगोळी काढून स्वागत. ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी शेगाव : ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगाव आज श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराजांनी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर श्रींच्या पालखीची अश्वांसह व पताकाधारी वारकरी, पालखीचे भोई, सेवेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य प्रभातफेरी संत नगरीतून काढण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान सर्वत्र “गण गण गणात बोते” आणि “श्री संत गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, अश्व आणि पालखीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रींच्या नामस्मरणाने संपूर्ण शेगाव नगरीत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करून, श्री महाराज सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत, सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो, अशी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली.4
- बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.3
- *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!* ----------- नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी -------------- *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!* ----------- नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी -------------- अकोट तालुका प्रतिनिधी.... श्री संत वासुदेव महाराजांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या संत वासुदेव नगर परिसरासह संपुर्ण प्रभाग १० मध्ये पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करीत वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण परिसर हिरवागार व पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने ट्री-गार्डसह वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, रोपलेल्या प्रत्येक वृक्षाचे जतन व संगोपन करण्याची जबाबदारी स्थानिक नगरवासीयांनी स्वतःहून स्वीकारली आहे. हा उपक्रम प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक दिलीप बोचे व सौ. विजयाताई बोचे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे, वृक्षमित्र प्राचार्य गजानन चोपडे आणि मुकुंदराव गावंडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. *'स्व. विश्वासराव चोपडे स्मृती वृक्ष' उपक्रम'* प्राचार्य गजाननराव चोपडे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विश्वासराव चोपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पांतर्गत त्यांनी स्वतः ट्री-गार्डसह मोठ्या वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. *मान्यवरांची उपस्थिती* या प्रेरणादायी सोहळ्याला सुरेश कराळे, नंदकिशोर हिंगणकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राममूर्ती वालसिंगे,नारायणराव अनासाने, पत्रकार विजय शिंदे सहपत्नीक, विनायकराव सपकाळ, प्रदीप ओळंबे, विजय वानखडे, अमोल बोरकर, दीपक पाटील, मनोहर रेचे, विलासराव चोरे, डॉ. लाड,माधव अनासाने, ऍड विपुल भिसे, भिकू गटकळ, अजय मोरे, प्रफुल्ल थोरात,शुभम जाधव, विक्रम सावंत, नागोराव कुलट,राजकुमार सिकजी मंगेश हिंगणकर,ऍड राठी, चोपडे साहेब,ऍड वल्लभ जोत,रमेश तासतोडे,विलास जाधव, नारायण मंडले, संजय गाडगे, यांच्यासह प्रभाग क्र १० परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी दिलिप बोचे यांनी सर्वांचे आभार मानलेत.4