logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*ऐतिहासिक दगडी शाळेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा....* *' विद्यार्थ्यांना भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने सात्विक राजगिरा लाडू वाटप '* भारताचे मानबिंदू... कर्तव्यदक्ष... पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड शहरातील ब्रिटिश कालीन व बुथ क्रमांक १४७ अंतर्गत येणारी ऐतिहासिक दगडी शाळेत विद्यार्थ्यांनी साजरा केला आनंदोत्सव. भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांना सात्विक राजगिरा लाडू वाटप करण्यात आले. प्रा डॉ सुरेश पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री संदीप महाले सर, सहाय्यक शिक्षक सौ. संगीता वाघचौरे, सौ. वैशाली वाघ, निशा पाटील व माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने बाळा पाडवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी पत्रकार सुनिल अण्णा सोनवणे, श्री हरीभाऊ ठाकरे सर, श्री कैलास सोनवणे, युवा उद्योजक श्री किशोर क्षत्रिय, श्री चंद्रकांत निकुंभ, श्री प्रविण देशमुख, पत्रकार संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

1 hr ago
user_SUNIL ANNA SONAWANE
SUNIL ANNA SONAWANE
Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago
474c08cc-457e-4e0e-8f07-ee9dbe00a861

*ऐतिहासिक दगडी शाळेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा....* *' विद्यार्थ्यांना भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने

d013229c-2003-47de-92cc-6cd1787a559f

सात्विक राजगिरा लाडू वाटप '* भारताचे मानबिंदू... कर्तव्यदक्ष... पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त

027fa32d-ae5c-494a-8e23-ad82ff1f39f2

चांदवड शहरातील ब्रिटिश कालीन व बुथ क्रमांक १४७ अंतर्गत येणारी ऐतिहासिक दगडी शाळेत विद्यार्थ्यांनी

35aaa852-6287-47dc-a6c8-37f375b43553

साजरा केला आनंदोत्सव. भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांना सात्विक राजगिरा लाडू वाटप करण्यात आले.

6882fe10-821c-491a-8967-a88e3966cf9a

प्रा डॉ सुरेश पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री संदीप महाले सर,

b999a2fa-16bc-4ea8-99a4-90d2f58058db

सहाय्यक शिक्षक सौ. संगीता वाघचौरे, सौ. वैशाली वाघ, निशा पाटील व माजी विद्यार्थी मंडळाच्या

7568c7b5-90e7-45fc-9875-8e4d8e111c84

वतीने बाळा पाडवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी पत्रकार सुनिल अण्णा सोनवणे, श्री

2f0300e8-d13e-46fe-9ab6-f132a90b7859

हरीभाऊ ठाकरे सर, श्री कैलास सोनवणे, युवा उद्योजक श्री किशोर क्षत्रिय, श्री चंद्रकांत निकुंभ,

8e8da9cb-0068-4ec2-b9e4-9a365ee0d6ab

श्री प्रविण देशमुख, पत्रकार संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
    1
    नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले

भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी
नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले
भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी
प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल 
बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.
    1
    निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन
नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन! मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार! निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 📍 निफाड नगरपंचायत 🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन! मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार! निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 📍 निफाड नगरपंचायत
    1
    🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन!
मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार!
निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला.
हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे.
यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
📍 निफाड नगरपंचायत


🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन!
मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार!
निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला.
हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे.
यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
📍 निफाड नगरपंचायत
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    4
    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली.
या पथसंचलनावेळी  अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली.
या पथसंचलनावेळी  अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Dhule Crime News | धुळ्यात सण-उत्सवाच्या तोंडावर मोठा शस्त्रसाठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई... A large cache of weapons seized in Dhule ahead of festivals; Major action by the local crime branch - सण-उत्सवाच्या तोंडावर धुळे पोलिसांची मोठी कारवाई! दोंडाईचा-शहादा रोडवर १० तलवारींचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हा साठा गुजरातमधून आणल्याचे समोर आले असून ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहा सविस्तर बातमी. - #DhuleNews #DhuleCrime #DhuleLCBAction #MaharashtraPolice #DhuleBreaking
    1
    Dhule Crime News | धुळ्यात सण-उत्सवाच्या तोंडावर मोठा शस्त्रसाठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई...
A large cache of weapons seized in Dhule ahead of festivals; Major action by the local crime branch
-
सण-उत्सवाच्या तोंडावर धुळे पोलिसांची मोठी कारवाई! दोंडाईचा-शहादा रोडवर १० तलवारींचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हा साठा गुजरातमधून आणल्याचे समोर आले असून ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहा सविस्तर बातमी.
-
#DhuleNews #DhuleCrime #DhuleLCBAction #MaharashtraPolice #DhuleBreaking
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    Local News Reporter धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • धुळे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांसह विविध तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज दि. १५ सप्टेंबर रोजी निवेदने देण्यात आली. त्याच अनुषंगाने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. संजय बागडे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. “कोरडा दुष्काळ जाहीर करा”, “शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या”, “शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने सातत्याने ओढ दिल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांचे उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्व शासकीय सवलती लागू करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्याबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, उपाध्यक्ष नंदू अहिरराव, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, धुळे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, दिनकर जाधव, अमर फरताडे, नाना शिरसाठ, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
    1
    धुळे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांसह विविध तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज दि. १५ सप्टेंबर रोजी निवेदने देण्यात आली. त्याच अनुषंगाने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. संजय बागडे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. “कोरडा दुष्काळ जाहीर करा”, “शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या”, “शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने सातत्याने ओढ दिल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांचे उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्व शासकीय सवलती लागू करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्याबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, उपाध्यक्ष नंदू अहिरराव, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, धुळे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, दिनकर जाधव, अमर फरताडे, नाना शिरसाठ, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी महापौरांचे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; स्काडा महिनाअखेर, बारा बंगला केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार वादंग झाला. सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कृत्रिम पाणीटंचाईचा ठपका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीसह कारवाईची मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपलाही सभागृहात घरचा आहेर मिळाला. भूषण राणे यांनी पवननगरचा पाणीपुरवठा कोणाच्या तरी दबावाखाली वळविला जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बडगुजर यांनी पाणी वितरण व्यवस्था आणि पंपिंग यंत्रणेतील दोषांमुळेच पाणीप्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला. यावेळी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याचा मुद्दा उपस्थित केला. पाणीपुरवठा व्यवस्थेतील 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महासभेत पाचारण केले. 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे, तर बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले. पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत आयुक्तांनी व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, चर्चेनंतर महापौरांनीही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, तसेच व्हॉल्व्हमनच्या विभागनिहाय तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ठोस नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही महापौरांनी प्रशासनाला बजावले. चौकट : आदेशांची वेळमर्यादा व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कार्यकारी व कनिष्ठ अभियंत्यांवर महासभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त आणि महापौरांनी अधिकाऱ्यांना वेळमर्यादा देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नाशिककरांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी
पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी
महापौरांचे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; स्काडा महिनाअखेर, बारा बंगला केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार वादंग झाला. सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कृत्रिम पाणीटंचाईचा ठपका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीसह कारवाईची मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपलाही सभागृहात घरचा आहेर मिळाला.
भूषण राणे यांनी पवननगरचा पाणीपुरवठा कोणाच्या तरी दबावाखाली वळविला जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बडगुजर यांनी पाणी वितरण व्यवस्था आणि पंपिंग यंत्रणेतील दोषांमुळेच पाणीप्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला. यावेळी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याचा मुद्दा उपस्थित केला.
पाणीपुरवठा व्यवस्थेतील 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महासभेत पाचारण केले. 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे, तर बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले.
पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत आयुक्तांनी व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान, चर्चेनंतर महापौरांनीही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, तसेच व्हॉल्व्हमनच्या विभागनिहाय तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ठोस नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही महापौरांनी प्रशासनाला बजावले.
चौकट : आदेशांची वेळमर्यादा
व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन
'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित
बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण
सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक
पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कार्यकारी व कनिष्ठ अभियंत्यांवर
महासभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त आणि महापौरांनी अधिकाऱ्यांना वेळमर्यादा देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नाशिककरांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! अचानक भेटीत आढळलेल्या त्रुटींवर आता कारवाई होणार का? सुरगाणा तालुक्यातील पालकांचे लक्ष सुरगाणा तालुक्यातील माणी येथील सेंट्रल किचनला आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भोजनाची तपासणी करताना पोळी कच्ची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मंत्री उइके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यानच पोळी कच्ची आढळल्याने भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंत्री उइके यांच्या अचानक पाहणीमुळे सेंट्रल किचनमधील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. मंत्री स्वतः नाराज झाले असताना संबंधित सेंट्रल किचनवर ठोस कारवाई होणार का, की केवळ सूचना देऊन प्रकरण मिटणार? असा सवाल सुरगाणा तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने पाहणीतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले!
माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले!
अचानक भेटीत आढळलेल्या त्रुटींवर आता कारवाई होणार का? सुरगाणा तालुक्यातील पालकांचे लक्ष
सुरगाणा तालुक्यातील माणी येथील सेंट्रल किचनला आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भोजनाची तपासणी करताना पोळी कच्ची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मंत्री उइके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यानच पोळी कच्ची आढळल्याने भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंत्री उइके यांच्या अचानक पाहणीमुळे सेंट्रल किचनमधील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
मंत्री स्वतः नाराज झाले असताना संबंधित सेंट्रल किचनवर ठोस कारवाई होणार का, की केवळ सूचना देऊन प्रकरण मिटणार? असा सवाल सुरगाणा तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने पाहणीतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!
    1
    कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.