ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत; उदयदादांच्या नेतृत्वाची ‘शिरवळ पॅटर्न’ वाटचाल! सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्ह्याच्या नेतृत्वापर्यंतचा संघर्षमय प्रवास; वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव शिरवळ, ता.31 : राजकारणात पद मिळविणारे अनेक असतात; मात्र पदाला जनतेच्या कामाची दिशा देणारे मोजकेच! शिरवळच्या मातीतून राजकीय प्रवासाला सुरुवात करून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारणारे उदयदादा कबुले यांचे नाव सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर याच श्रेणीत घेतले जाते. सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून सुरू झालेली त्यांची वाटचाल आज पुन्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेसमोर उभी आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या स्थानिक राजकारणापासून जनसंपर्क आणि संघटनकौशल्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कबुले यांनी पुढे पंचायत स्तरावरील राजकारणात आपला ठसा उमटवला. गावाच्या प्रश्नांपासून परिसराच्या विकासापर्यंत सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत शिरवळ गटातून अपक्ष म्हणून विजयी होत त्यांनी राजकीय ताकद दाखवून दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. १ जानेवारी २०२० रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे अपक्ष सदस्याला अध्यक्षपदाची संधी मिळण्याची ही ऐतिहासिक घटना ठरली. अध्यक्षपदाच्या काळात जिल्हा परिषदेच्या विकासकामांना गती देण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या कार्यकाळात सातारा जिल्हा परिषदेला सलग दुसऱ्या वर्षी केंद्र शासनाचा पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळाला, ही त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय बाब ठरली. राजकारणात चढ-उतार अपरिहार्य असतात. मात्र, पराभव असो वा विजय, जनतेशी संपर्क कायम ठेवण्याची भूमिका कबुले यांनी जपली. २०२६ मध्ये शिरवळ गटातून पुन्हा विजय मिळवत त्यांनी आपली राजकीय पकड कायम असल्याचे दाखवून दिले. आज ‘उदयदादा’ हे नाव केवळ एका पदापुरते मर्यादित राहिलेले नाही. शिरवळपासून जिल्ह्याच्या राजकारणापर्यंत पोहोचलेली ही वाटचाल संघर्ष, संघटन, जनसंपर्क आणि राजकीय संयम यांची साक्ष देणारी आहे. वाढदिवसानिमित्त उदयदादा कबुले यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी सामाजिक-राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

- श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.3
- जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर1
- मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* 📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी मान्यवर उपस्थित होते. KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:80079136681
- घोडनदी येथे जैन समाजाच्या चातुर्मासाला उत्साहात प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: घोडनदी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यंदाच्या चातुर्मास-2026 सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला आहे. धर्मसभा मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाच्या चातुर्मासात प्रवचन प्रभाविका ज्ञान प्रबोधिनी साध्वी पू. आभाश्रीजी म.सा., आगम ज्योती साध्वी पू. डॉ. महिमाश्रीजी म.सा. तसेच मधुर व्याख्यानी साध्वी पू. डॉ. श्रेयांश्रीजी म.सा. यांचे पावन सान्निध्य लाभले आहे. चातुर्मास काळात दररोज सकाळी ६.३० वाजता प्रार्थना, सकाळी ८.४५ ते ९.४५ या वेळेत प्रवचन, दुपारी २.३० वाजता महिलांसाठी धार्मिक वर्ग तसेच सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण आयोजित करण्यात आले आहे. चातुर्मासाची सुरुवात धर्मचक्र तपाने करण्यात आली असून अधिकाधिक भाविकांनी एकासना, आयंबिल, उपवास, दया, रात्री संवर व पौषध यांसारख्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धर्मचक्र तपस्वींच्या पारण्याची व्यवस्था श्री जैन युवा परिषद करणार असून चातुर्मास कालावधीत गौतम प्रसादीची व्यवस्था पंचायत भवन भोजनशाळेत करण्यात आली आहे. दर्शन, प्रार्थना, प्रवचन, धर्मचर्चा, मांगलिक व प्रतिक्रमणाचा लाभ घेऊन आत्मशुद्धी आणि कर्मनिर्जरा साधावी, असे आवाहन जैन श्रावक संघाने केले आहे. हा कार्यक्रम स्व. श्री सुखलालजी खाबिया धर्मसभा मंडप, पंचायत भवन, घोडनदी येथे होत आहे.2
- अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल1
- विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.2
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास1