Shuru
Apke Nagar Ki App…
धुळ्याच्या पश्चिम पट्ट्यात ‘मशरूम क्रांती’; आदिवासी महिलांनी उभारली आत्मनिर्भरतेची नवी वाट धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी महिलांनी आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आत्मनिर्भरतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. उमरपाटा येथील ‘एकता महिला उत्पादक समूहा’च्या महिलांनी मशरूम शेतीतून आर्थिक स्वावलंबन मिळवत ‘मशरूम क्रांती’ घडवून आणली आहे.
Dhule News 24
धुळ्याच्या पश्चिम पट्ट्यात ‘मशरूम क्रांती’; आदिवासी महिलांनी उभारली आत्मनिर्भरतेची नवी वाट धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी महिलांनी आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आत्मनिर्भरतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. उमरपाटा येथील ‘एकता महिला उत्पादक समूहा’च्या महिलांनी मशरूम शेतीतून आर्थिक स्वावलंबन मिळवत ‘मशरूम क्रांती’ घडवून आणली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी महिलांनी आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आत्मनिर्भरतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. उमरपाटा येथील ‘एकता महिला उत्पादक समूहा’च्या महिलांनी मशरूम शेतीतून आर्थिक स्वावलंबन मिळवत ‘मशरूम क्रांती’ घडवून आणली आहे.1
- यवतमाळ प्रतिनिधी: बंजारा समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा सखोल अभ्यास करून “याडी” हे सुप्रसिद्ध पुस्तक लिहिणारे अभ्यासू लेखक पंजाबराव चव्हाण यांनी त्यांच्या लेखनप्रवासाबद्दल महत्त्वपूर्ण विचार मांडले. सनातन सारथी न्यूजचे प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी बंजारा समाजाच्या जतन आणि संवर्धनावर भर दिला. पंजाबराव चव्हाण म्हणाले की, “याडी हे पुस्तक केवळ साहित्य नसून बंजारा समाजाचा इतिहास जपणारे एक दस्तऐवज आहे. समाजातील परंपरा, संस्कृती, रूढी आणि जीवनशैली पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.” त्यांनी सांगितले की, या पुस्तकासाठी त्यांनी विविध भागांत जाऊन प्रत्यक्ष माहिती गोळा केली. मुलाखतीदरम्यान त्यांनी आजच्या पिढीने आपल्या मुळांचा विसर पडू नये, यासाठी वाचन संस्कृती वाढवण्याचे आवाहन केले. तसेच बंजारा समाजातील तरुणांनी शिक्षणासोबतच आपल्या इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रतिनिधी सुरज पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना चव्हाण यांनी त्यांच्या पुढील साहित्यिक योजनांबद्दलही संकेत दिले. “समाजाच्या विविध अंगांवर आधारित आणखी संशोधनपर लेखन करण्याचा माझा मानस आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ही मुलाखत वाचकांसाठी बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरेचा परिचय करून देणारी ठरली असून, “याडी” या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहास जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.1
- जळगाव हायवेवर नांद्रा ते हडसन च्या मध्ये लक्ष्मी अग्रो कंपनी च्या पुढे निसर्ग बियर बार जवळ बिबट्या काही रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आढळून आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे1
- https://youtube.com/shorts/aXzpiA_fZLQ?si=BwJgMbtXKVS0flRz चांदवड येथे भिम सैनिकांचा डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन1
- दरेगाव हादरले! जंगलात सापडला इंदेवाडीच्या व्यक्तीचा मृतदेह दरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कैलास पवार (रा. इंदेवाडी) अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून येत असून हा खून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृतदेह जंगलात टाकण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे दरेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.1
- प्रतिनिधी D.M लातूर — शहरात कथित हप्ता प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये एका हॉटेल चालकाने "हप्ता घेतात आणि माझा मालही पकडतात" असा संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अधिकारी अचानक रेडसाठी आल्यावर हॉटेल चालकाने संतप्त प्रतिक्रिया दिली. "हप्ता घेतला जातो, आणि तरीही रेड टाकली जाते" असा आरोप करत चालकाने अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेल्याचेही दिसत असून, यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, संबंधित विभागाकडून चौकशीची मागणी होत आहे. जर व्हिडिओतील आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे.1
- येवला: शहराच्या धार्मिक आणि सामाजिक वैभवात भर टाकणाऱ्या रोकडे हनुमान मंदिर परिसरातील २० लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नांतून हा विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी महंत संदिपगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि अनुषंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. या कामामुळे मंदिर परिसराचा कायापालट झाला असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष गणेश गायकवाड, जेष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर आणि सुभाष पाटोळे यांची सन्माननीय उपस्थिती होती. तसेच नगरसेवक सचिन शिंदे, सचिन साबळे, प्रा. नानासाहेब लहरे, राजुसिंग परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेशी, धिरज परदेशी, युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, दत्ता सानप, बंटी धसे, पंकज पहिलवान, संतोष नागपुरे, दीपक टकले, मनिषा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी रोकडे हनुमान मंदिर भक्त परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. या विकासकामामुळे येवला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. बीड रिपोर्ट सचिन वाखारे येवला1
- हनुमान नगरात हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड! हनुमान नगर परिसरात काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करत त्यांची धिंड काढली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी किरकोळ वादातून हवेत गोळीबार करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संबंधित आरोपींना अटक केली. यानंतर पोलिसांनी आरोपींची परिसरात धिंड काढत नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.1