महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ची दारव्ह्यात जनजागृती पदयात्रा दारव्हा शहरात वीज ग्राहकांमध्ये शासनाच्याविविध योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांच्या वतीने धडाकेबाज ‘ग्राहक जनजागृती पदयात्रा रॅली’चे आयोजन करण्यात आले. शहराच्या मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रॅलीदरम्यान नागरिकांना नियमित वीजबिल भरण्याचे महत्त्व पटवून देत अखंडित वीजपुरवठ्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच स्मार्ट टीओडी मीटरबाबत असलेले गैरसमज दूर करत हे मीटर पोस्टपेड पद्धतीचे असून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दिवसा वीज वापरावर सवलत, अचूक बिलिंग व मोबाईल अॅपद्वारे रिअल टाईम वापर पाहण्याची सुविधा यांची माहिती देण्यात आली. याशिवाय सोलर रूफटॉप योजनेद्वारे सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीजबिलात बचत करण्याचे आवाहन करण्यात आले. “वीज वाचवा, देश वाचवा” व “वेळेवर वीजबिल भरा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत महावितरण व ग्राहकांतील संवाद अधिक दृढ होईल, अशी भावना व्यक्त केली.

- दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात सोमवार दि. १६ फेब्रुवारीला उशिरा रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाम श्रावण टारपे (वय ५७, रा. कावेरी नगर, दारव्हा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटना १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.१० ते ११.२० दरम्यान घडली. तक्रारदार यांचा पुतण्या गौरव प्रकाश टारपे (वय २६, रा. कावेरी नगर) हा घराजवळ असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी राफ्टरने त्याच्या डोक्यावर व शरीरावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडिओ दिवसभर समाजमाध्यमांवर व्हायरल होत होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहेत. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून दारव्हा ठाणेदार यांना शहरातील काही सामाजिक संघटनाणी रात्री ७. ३० वाजता निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.2
- अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..1
- *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!1
- 🔱 पावसात अदृश्य… शिवरात्रीला प्रकट! 🔱 तेलंगणातील तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्हा, नंदिपेट मंडल परिसरातील उम्मेडा गावाजवळ गोदावरी नदीच्या पवित्र काठावर वसलेले श्री सोमेश्वर (उमामहेश्वर) मंदिर हे देवस्थान महाशिवरात्रीला अक्षरशः चमत्कारासारखे प्रकट होते! 🌊 पावसाळ्यात धरणातील पाणी वाढल्याने वर्षभर पाण्यात लपलेले हे प्राचीन मंदिर, पाणी ओसरताच महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले होते. 🛕 कळस, गाभारा आणि दीपमाळ पुन्हा उजेडात येतात आणि श्रद्धा-निसर्ग-अध्यात्म यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. 🪔 कार्तिक महिन्यातील गंगा पूजन व दीपोत्सव तर भक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरतो. ✨ निसर्गाच्या कुशीत दरवर्षी पुन्हा उगवणारा हा अध्यात्माचा दीप—गोदावरीकाठी अनुभवायला मिळणारी दिव्य पर्वणी! यंदा महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. हर हर महादेव! 🔱 #श्रीसोमेश्वर #उमामहेश्वर #गोदावरीकाठ #महाशिवरात्री2026 #Telangana #Nizamabad #Umedda #आस्था #धार्मिकवार्ता #NNLDigitalMedia1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by JKV NEWS 241
- छत्रपती शिवरायांचे विचार युवा पिढीने अंगिकारावे - कुलसचिव डॉ. अविनाश असनारे1