logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हा परिषदेत जनसुराज्य शक्तीच्या गटनेतेपदी सर्जेराव पाटील - पेरीडकर; सदस्यांवर शुभेच्छांचा वर्षाव कोल्हापूर / प्रतिनिधी  कोल्हापूर जिल्हा परिषदेत जनसुराज्य शक्तीच्या गटनेतेपदी शित्तूर - वारुण मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री. सर्जेराव दादा पाटील-पेरीडकर यांची निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.त्यांच्या निवडीमुळे जनसुराज्य शक्तीला जिल्हा परिषदेत अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.सर्जेराव पाटील-पेरीडकर हे स्थानिक पातळीवर सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागातील विकासकामांबाबत त्यांची ठाम भूमिका आणि लोकसहभागातून विकास साधण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षवेधी ठरला आहे.गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.याचबरोबर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अमरसिंह यशवंत पाटील (भाऊ) - कोडोली, शोभा युवराज बेलेकर -  कळे, स्नेहल केतन वेल्हाळ - आबार्डे, शितल प्रवीण यादव - कुंभोज आणि अनिरुद्ध केदारी रेडेकर - नूल यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत सर्व सदस्य एकत्रितपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नवीन सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेमार्फत गावोगावी विकासकामांना गती देणे, नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविणे आणि प्रशासनासोबत समन्वय ठेवून विकासाची गती वाढविणे हे प्राधान्यक्रम असतील, असेही मत व्यक्त करण्यात आले.दरम्यान, सर्जेराव पाटील-पेरीडकर यांच्या निवडीमुळे जनसुराज्य शक्तीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात जिल्ह्यात विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

7 hrs ago
user_आमची मराठी.com
आमची मराठी.com
शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
7 hrs ago
0675c46b-7b1e-46ed-8879-2ca93dc12c77

जिल्हा परिषदेत जनसुराज्य शक्तीच्या गटनेतेपदी सर्जेराव पाटील - पेरीडकर; सदस्यांवर शुभेच्छांचा वर्षाव कोल्हापूर / प्रतिनिधी  कोल्हापूर जिल्हा परिषदेत जनसुराज्य शक्तीच्या गटनेतेपदी शित्तूर - वारुण मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री. सर्जेराव दादा पाटील-पेरीडकर यांची निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.त्यांच्या निवडीमुळे जनसुराज्य शक्तीला जिल्हा परिषदेत अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.सर्जेराव पाटील-पेरीडकर हे स्थानिक पातळीवर सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागातील विकासकामांबाबत त्यांची ठाम भूमिका आणि लोकसहभागातून विकास साधण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षवेधी ठरला आहे.गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.याचबरोबर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अमरसिंह यशवंत पाटील (भाऊ) - कोडोली, शोभा युवराज बेलेकर -  कळे, स्नेहल केतन वेल्हाळ - आबार्डे, शितल प्रवीण यादव - कुंभोज आणि अनिरुद्ध केदारी रेडेकर - नूल यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत सर्व सदस्य एकत्रितपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नवीन सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेमार्फत गावोगावी विकासकामांना गती देणे, नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविणे आणि प्रशासनासोबत समन्वय ठेवून विकासाची गती वाढविणे हे प्राधान्यक्रम असतील, असेही मत व्यक्त करण्यात आले.दरम्यान, सर्जेराव पाटील-पेरीडकर यांच्या निवडीमुळे जनसुराज्य शक्तीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात जिल्ह्यात विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व  कुंभोज / प्रतिनिधी हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या कट्टर समर्थक अश्विनी अनिल बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.तर आळते पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले इंगवले गटाचे समर्थक संतोष कांबळे (शिवसेना शिंदे गट) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी अश्विनी बिरंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.त्यानंतर उपसभापती पदासाठी संतोष कांबळे यांच्या नावावर सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काम पाहिले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,राजू इंगवले,किरण इंगवले, झाकीर भालदार,वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरंजे व उपसभापती संतोष कांबळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.पंचायत समिती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,या निवड प्रक्रियेनंतर जनसुराज्य पक्षाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
    1
    हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व 
कुंभोज / प्रतिनिधी
हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या कट्टर समर्थक अश्विनी अनिल बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.तर आळते पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले इंगवले गटाचे समर्थक संतोष कांबळे (शिवसेना शिंदे गट) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी अश्विनी बिरंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.त्यानंतर उपसभापती पदासाठी संतोष कांबळे यांच्या नावावर सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काम पाहिले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,राजू इंगवले,किरण इंगवले, झाकीर भालदार,वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरंजे व उपसभापती संतोष कांबळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.पंचायत समिती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,या निवड प्रक्रियेनंतर जनसुराज्य पक्षाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
    user_आमची मराठी.com
    आमची मराठी.com
    शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.
    1
    कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    1
    Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    user_सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    Voice of people जत, सांगली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
    1
    सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    1
    मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    user_युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
    1
    सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे  सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही.
यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    user_युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.