नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकांनी लातूर हिंगोली नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्या वर धाडी टाकायला सुरुवात केली आहे नांदेड परिक्षेत्रात लातूर हिंगोली नांदेड परिसरात गुटखा विरोधी मोहीम आक्रमक पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा नांदेडमध्ये छापा, (5) लाख रुपयांचा गुटखा जप्त दिनांक 16 मार्च, 2026 पासून, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध व्यापक मोहीम उघडली आहे. सदर मोहिमेच्या अनुषंगाने, विशेष पथकास पोलीस ठाणे इतवारा भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये गुटखा साठवणूक केला असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार, दिनांक 31.03.2026 रोजी, इस्लामपुरा भागात असणाऱ्या शर्मा यांचे मळ्यातील शेडमध्ये साठवून ठेवलेला 5,03,740/- रुपयांचा गुटखा पथकाने जप्त केला आहे. नमुद प्रकरणी आरोपी 1) मोहम्मद शोएब मोहम्मद अकबर रा. मदिना नगर, देगलूर नाका, नांदेड 2) शेख अमीर रा. हिमायतनगर, नांदेड 3) शेख अजिम परभणीवाला रा. परभणी व 4) बबलू शेख अजिमोद्दीन अब्दुल हमीद मुदखेडवाला, रा. मदिना नगर, मुदखेड, जिल्हा नांदेड यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाणे येथे गुरनं 93/2026 कलम 123, 274, 275, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणाचा तपास पोलीस ठाणे इतवारा येथील पोउपनि आगलावे हे करीत आहेत. नमूद प्रकरणात, यातील आरोपी क्रमांक 1. मोहम्मद शोएब मोहम्मद अकबर रा. मदिना नगर, देगलूर नाका याच्याकडे सदरचा माल मिळाला आहे. या संदर्भाने, आणखी विस्तृत माहिती प्राप्त केली असता, आरोपी क्रमांक 2) शेख अमीर रा. हिमायतनगर 3) शेख अजिम परभणीवाला रा. परभणी व 4) बबलू शेख अजिमोद्दीन अब्दुल हमीद मुदखेडवाला रा. मुदखेड हे गुटखा व्यवसायात संघटितपणे कार्यरत असून, ते शेजारील राज्यांतून मोठ्या प्रमाणात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी करतात व सदर मालाची ठराविक ठिकाणी साठवणूक करून, गरजेप्रमाणे नांदेड व परभणी जिल्ह्यातील किरकोळ व्यापाऱ्यांना त्याचा पुरवठा करतात, असे निदर्शनास आले आहे. प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या माहितीमुळे, गुटखा खरेदी, वाहतूक, साठवणूक व वितरणासाठी आरोपींनी आणखी लोकांची मदत घेऊन, एक व्यापक जाळे उभे केले आहे. संबंधित आरोपींकडून या संदर्भात अधिक माहिती हस्तगत करून, या साखळीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, उपरोक्त प्रमाणे निष्पन्न झालेल्या व होणाऱ्या आरोपीतांचा गुन्हेगारी पूर्वेतिहास पडताळून, गुटखा निर्मूलनाच्या अनुषंगाने प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येत आहे.

- Post by Balaji Vedpathak1
- नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या पद्धतीने साजरी! यंदा नांदेडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जातविरहीत, डिजेमुक्त आणि पारंपारिक पद्धतीने साजरी होणार आहे. इंजि. प्रवीण खंदारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम सर्व जात-धर्मीयांचा सहभाग डिजेमुक्त जयंतीचा अभिनव निर्णय 🚩 भव्य मिरवणुकीची वैशिष्ट्ये: 🔥 मशाल रॅली 🥁 हलगी व ढोल पथक 💃 मुलींचे लेझीम पथक 🐪 उंट, 🐎 घोडे आणि बैलगाडी देखावे 🎭 बाबासाहेब, रमाई, गाडगेबाबा यांचे जिवंत देखावे 🎺 पारंपारिक बँड वादन 🕖 वेळ: सकाळी ७ ते १२ 📍 ठिकाण: नांदेड 👉 “महापुरुषांना जातीच्या चौकटीत न बसवता सर्वांसाठी जयंती” — हा या उपक्रमाचा मुख्य संदेश #AmbedkarJayanti #NandedNews #BabasahebAmbedkar #UnityInDiversity #DJFreeJayanti SocialHarmony NandedUpdates JayantiCelebration1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- उमरखेड : अन्याय, अत्याचार व गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लेखणीच्या जोरावर लढणाऱ्या पत्रकारावरच पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल केल्याची धक्कादायक घटना उमरखेड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उमरखेड प्रेस क्लबचे अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यक्ष गजानन वानखेडे व सचिव सिद्धार्थ दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाडस 007 या युट्यूब न्यूज चॅनलचे संपादक अमित वसंतराव देशमुख यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. दि. 10 मार्च 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, गांजा, गुटखा, मटका व अवैध वाहतूक याबाबत तक्रार करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या संबंधित ठाणेदारांनी आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर दि. 12 मार्च 2026 रोजी रात्री पत्रकार म्हणून माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या अमित देशमुख यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जातीय तेढ निर्माण केल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, हे गुन्हे मध्यरात्री उशिरा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या व समाजहितासाठी कार्य करणाऱ्या एका सुशिक्षित युवकावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून त्याचे शैक्षणिक व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करत उमरखेड प्रेस क्लबने मागणी केली आहे की, संबंधित ठाणेदार शंकर पांचाळ यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करावी त्यांचे त्वरित स्थानांतरण करण्यात यावे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल गुन्हे मागे घ्यावेत पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही, तर पत्रकार संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.2
- मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.1
- घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे3
- वाळकी येथे माता इसाई देवी यात्रेला उत्साहात सुरुवात! हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथे माता इसाई देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला असून, अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसर भक्तीमय झाला आहे 🌼 महाराष्ट्र व आंध्रप्रदेशातून भाविकांची मोठी गर्दी 🔥 चैत्र पौर्णिमेला मध्यरात्री भव्य छबिना 🪔 दीपमाळीत तेल अर्पण करून भाविकांची श्रद्धा व्यक्त विशेष म्हणजे देवीची मूर्ती चुलीत असल्याची अनोखी परंपरा भाविकांना आकर्षित करत आहे #Walke #IsaiDevi #Yatra #HarinamSaptah #Hadgaon Nanded Maharashtra Bhakti Festival1
- ----- (प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. __-__ एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले. __-__ या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.1
- मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.1