अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी धाडसत्र सुरूच. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई –वाहनासह ८.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त. अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई –वाहनासह ८.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्हा पोलीस दल सतत सक्रिय असून, याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस आणले आहे. दि. २३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक अवैध धंद्यांविरोधात गुप्त माहिती संकलन व कारवाईसाठी लातूर जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत होते. सकाळी सुमारे ९:०० वा. पथकाला माहिती मिळाली की, रेनापुर फाटा ते रेणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH 44 G 2994) मधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जाणार आहे. प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. काही वेळातच नमूद वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी तत्परतेने कार थांबवून तपासणी केली. सदर कारमधून चालकास ताब्यात घेऊन त्याची ओळख आमर श्रीकांत लकडे (वय २८ वर्षे, रा. बोरवटी, ता. जि. लातूर) अशी पटली. यानंतर कारची सखोल झडती घेतली असता, वाहनामध्ये विविध प्रकारचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला, वी-१ तंबाखू, रजनीगंधा पान मसाला व रत्ना ३००० सुगंधीत तंबाखू असा एकूण अंदाजे २,३९,५८४/- रुपये किंमतीचा गुटखा साठा मिळून आला. तसेच या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायर कार (अंदाजे किंमत ६,००,०००/- रुपये) जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ८,३९,५८४/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपी अमर श्रीकांत लकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कलम ५९ प्रमाणे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास रेनापुर पोलीस करीत आहेत. सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मुन्ना मदने, आनंद हल्लाळे व प्रविण कोळसुरे यांनी पार पाडली.
अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी धाडसत्र सुरूच. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई –वाहनासह ८.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त. अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई –वाहनासह ८.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्हा पोलीस दल सतत सक्रिय असून, याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस आणले आहे. दि. २३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक अवैध धंद्यांविरोधात गुप्त माहिती संकलन व कारवाईसाठी लातूर जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत होते. सकाळी सुमारे ९:०० वा. पथकाला माहिती मिळाली की, रेनापुर फाटा ते रेणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH 44 G 2994) मधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जाणार आहे. प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. काही वेळातच नमूद वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी तत्परतेने कार थांबवून तपासणी
केली. सदर कारमधून चालकास ताब्यात घेऊन त्याची ओळख आमर श्रीकांत लकडे (वय २८ वर्षे, रा. बोरवटी, ता. जि. लातूर) अशी पटली. यानंतर कारची सखोल झडती घेतली असता, वाहनामध्ये विविध प्रकारचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला, वी-१ तंबाखू, रजनीगंधा पान मसाला व रत्ना ३००० सुगंधीत तंबाखू असा एकूण अंदाजे २,३९,५८४/- रुपये किंमतीचा गुटखा साठा मिळून आला. तसेच या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायर कार (अंदाजे किंमत ६,००,०००/- रुपये) जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ८,३९,५८४/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपी अमर श्रीकांत लकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कलम ५९ प्रमाणे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास रेनापुर पोलीस करीत आहेत. सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मुन्ना मदने, आनंद हल्लाळे व प्रविण कोळसुरे यांनी पार पाडली.
- Post by Mohsin ahmed khan1
- नारीशक्ती वंदन विधेयक संसदेत विरोधकांनी हाणून पाडल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. येत्या काळात नारीशक्ती विरोधकांना चोख प्रतित्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला.1
- Post by Jafar tarodekar1
- मुखेड येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचे २५ एप्रिल रोजी भव्य अनावरण ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू मुखेड / अनिल कांबळे मुखेड तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजाच्या एकजुटीतून साकारलेल्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचे भव्य अनावरण दि. २५ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ६ वाजता करण्यात आले असून, संपूर्ण तालुक्यात या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या स्मारकाचे अनावरण डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते होणार असून, विविध मठांतील शिवाचार्य महाराजांचे सान्निध्य या सोहळ्यास लाभणार आहे. त्यामुळे धार्मिक व सामाजिक दृष्ट्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमास तमलूरचे शिवानंद शिवाचार्य महाराज, बिचकुंदाचे सोमलिंग शिवाचार्य महाराज, हणेगावचे शंकरलिंग शिवाचार्य महाराज, देवणीचे सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, नागठाण्याचे सद्योजात शिवाचार्य महाराज, उदगीरचे डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज, बेटमोगराचे सिद्धद्याळ शिवाचार्य महाराज, मुखेडचे डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज, आलमेलचे चंद्रशेखर शिवाचार्य महाराज तसेच अहमदपूरचे राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचीही या सोहळ्यास उपस्थिती लाभणार असून, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे तसेच सुप्रसिद्ध उद्योजक सुमित मोरगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने दुपारी ४ वाजता बालाजी मंदिरापासून शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. शहरातील विविध मार्गांवरून ही शोभायात्रा काढण्यात येणार असून, भाविकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. तसेच दुपारी ३ वाजल्यापासून महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्मारकामुळे वीरशैव लिंगायत समाजाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेला नवे अधिष्ठान मिळणार असून, हा सोहळा समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. सध्या मुखेड शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांमार्फत नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. तर जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक समितीच्या वतीने सर्व समाजबांधवांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याला यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथील ईदगाह परिसरात घडलेल्या घटनेचा तपास सुरू असून, या प्रकरणात अद्याप ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस प्रशासन फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेले पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थिती स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या घटनेची सर्व बाजूंनी तपासणी केली जात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.1
- Post by Sameer pathan1
- Post by Mohsin ahmed khan1
- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आज गुरुवार 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या जयंती महोत्सवात धम्मदेसना पुज्यभन्ते मोग्गलायन , पुज्यभन्ते एस संघमित्र यांनी दिली, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, टेहरे मॅडम, कुपटेकर, लहामगे, शेळके, उक्कडगावकर, कुलकर्णी, माकळे, प्रदीप वावळे, आशाबाई मालसमीनदर , द्वारकाबाई गंडले, संयुक्त जयंती उत्सव समितीचे , बबन अंभोरे, मारुती शिंदे, राजू पाचपोर, आकाश खिल्लारे,आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी कंत्राटदार उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गेव्हारे मॅडम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन इंजिनीयर दीपक कुपटेकर यांनी केली1
- Post by Jafar tarodekar1