logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगाव येथील अकोला रोडवरील कोलरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर २५ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने एका महिलेला चिरडल्याची खळबळजनक घटना घडली. अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृतदेहाची पूर्णपणे विटंबना झाली होती. अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसां पाठोपाठ मदतकार्यासाठी नेहमीप्रमाणे धावून येणारे रुख्माई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खंडेराव हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. संजय खंडेराव आणि त्यांच्या टीमने छिन्नविछिन्न झालेला मृतदेह गोळा करून तात्काळ खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या मदतकार्यात रुख्माई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खंडेराव, रमेश अवचार, अविनाश ठाकूर, अमर पिंपळेकर, ओम अवचार आणि करण हॅलोडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मृतक महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अद्याप मर्ग (अपघाती मृत्यूची नोंद) दाखल करण्यात आलेला नसून, पोलीस अनोळखी मृत महिलेचा शोध घेत आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तावडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पुढील तपास करत आहेत.

3 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
3 hrs ago

खामगाव येथील अकोला रोडवरील कोलरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर २५ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने एका महिलेला चिरडल्याची खळबळजनक घटना घडली. अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता

की मृतदेहाची पूर्णपणे विटंबना झाली होती. अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसां पाठोपाठ मदतकार्यासाठी नेहमीप्रमाणे धावून येणारे रुख्माई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खंडेराव हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. संजय खंडेराव आणि

त्यांच्या टीमने छिन्नविछिन्न झालेला मृतदेह गोळा करून तात्काळ खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या मदतकार्यात रुख्माई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खंडेराव, रमेश अवचार, अविनाश ठाकूर, अमर पिंपळेकर, ओम अवचार आणि करण हॅलोडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मृतक महिलेची

ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अद्याप मर्ग (अपघाती मृत्यूची नोंद) दाखल करण्यात आलेला नसून, पोलीस अनोळखी मृत महिलेचा शोध घेत आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तावडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पुढील तपास करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खामगाव येथील अकोला रोडवरील कोलरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर २५ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने एका महिलेला चिरडल्याची खळबळजनक घटना घडली. अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृतदेहाची पूर्णपणे विटंबना झाली होती. अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसां पाठोपाठ मदतकार्यासाठी नेहमीप्रमाणे धावून येणारे रुख्माई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खंडेराव हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. संजय खंडेराव आणि त्यांच्या टीमने छिन्नविछिन्न झालेला मृतदेह गोळा करून तात्काळ खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या मदतकार्यात रुख्माई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खंडेराव, रमेश अवचार, अविनाश ठाकूर, अमर पिंपळेकर, ओम अवचार आणि करण हॅलोडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मृतक महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अद्याप मर्ग (अपघाती मृत्यूची नोंद) दाखल करण्यात आलेला नसून, पोलीस अनोळखी मृत महिलेचा शोध घेत आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तावडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पुढील तपास करत आहेत.
    4
    खामगाव येथील अकोला रोडवरील कोलरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर २५ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने एका महिलेला चिरडल्याची खळबळजनक घटना घडली. अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृतदेहाची पूर्णपणे विटंबना झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसां पाठोपाठ मदतकार्यासाठी नेहमीप्रमाणे धावून येणारे रुख्माई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खंडेराव हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. संजय खंडेराव आणि त्यांच्या टीमने छिन्नविछिन्न झालेला मृतदेह गोळा करून तात्काळ खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या मदतकार्यात रुख्माई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खंडेराव, रमेश अवचार, अविनाश ठाकूर, अमर पिंपळेकर, ओम अवचार आणि करण हॅलोडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मृतक महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अद्याप मर्ग (अपघाती मृत्यूची नोंद) दाखल करण्यात आलेला नसून, पोलीस अनोळखी मृत महिलेचा शोध घेत आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तावडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पुढील तपास करत आहेत.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नोकरी (जॉब) आणि डायरेक्ट सेलिंग यांच्यातील फरक '19/20' इतका असल्याचे स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. पोस्टमध्ये डायरेक्ट सेलिंगच्या बाजूने सकारात्मक सूर लावत, हा फरक योग्य आहे का, अशी सहमती मागितली जात आहे.
    1
    नोकरी (जॉब) आणि डायरेक्ट सेलिंग यांच्यातील फरक '19/20' इतका असल्याचे स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. पोस्टमध्ये डायरेक्ट सेलिंगच्या बाजूने सकारात्मक सूर लावत, हा फरक योग्य आहे का, अशी सहमती मागितली जात आहे.
    user_Sagar Chimkar
    Sagar Chimkar
    Comedy club नांदुरा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जून महिना अर्ध्याहून अधिक संपला असला तरी, अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे आकाशात ढगांचा मागमूस नसताना, दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. पावसाअभावी शेतीची कामे थांबली असून, ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी जूनमध्ये मान्सून सक्रिय झाल्यावर शेतकरी पेरणी करतात. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. बियाणे, खते आणि शेतीची पूर्वतयारी करूनही पावसाअभावी पेरणी रखडली आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, वाढती वृक्षतोड, कमी होत जाणारे हरित क्षेत्र आणि बदलते हवामान यामुळे पावसाचे प्रमाण व वितरण अनियमित झाले असून, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडला आहे. दरम्यान, तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शेतमजूर यांना सर्वाधिक फटका बसत असून, पंखे, कुलर आणि एसी सुरू असूनही उकाड्यापासून दिलासा मिळत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पाण्याचे स्रोतही वेगाने आटत असल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊस आणखी लांबल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपली हतबलता व्यक्त करताना म्हटले आहे की, "आकाशात ढग नाहीत, शेतात ओलावा नाही आणि वाढत्या उकाड्याने जीव कासावीस झाला आहे." पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आणि उष्णतेने त्रस्त नागरिक आता एकच प्रार्थना करत आहेत की, "लवकर बरस रे मेघा, अन्यथा संकट आणखी गडद होईल!"
    1
    जून महिना अर्ध्याहून अधिक संपला असला तरी, अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे आकाशात ढगांचा मागमूस नसताना, दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. पावसाअभावी शेतीची कामे थांबली असून, ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरवर्षी जूनमध्ये मान्सून सक्रिय झाल्यावर शेतकरी पेरणी करतात. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. बियाणे, खते आणि शेतीची पूर्वतयारी करूनही पावसाअभावी पेरणी रखडली आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, वाढती वृक्षतोड, कमी होत जाणारे हरित क्षेत्र आणि बदलते हवामान यामुळे पावसाचे प्रमाण व वितरण अनियमित झाले असून, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडला आहे.

दरम्यान, तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शेतमजूर यांना सर्वाधिक फटका बसत असून, पंखे, कुलर आणि एसी सुरू असूनही उकाड्यापासून दिलासा मिळत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पाण्याचे स्रोतही वेगाने आटत असल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊस आणखी लांबल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी आपली हतबलता व्यक्त करताना म्हटले आहे की, "आकाशात ढग नाहीत, शेतात ओलावा नाही आणि वाढत्या उकाड्याने जीव कासावीस झाला आहे." पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आणि उष्णतेने त्रस्त नागरिक आता एकच प्रार्थना करत आहेत की, "लवकर बरस रे मेघा, अन्यथा संकट आणखी गडद होईल!"
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    23 hrs ago
  • जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे काल रात्री झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल साडेसात तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने गावकऱ्यांना रात्रभर अंधारात काढावी लागली. विशेष म्हणजे, पर्यायी व्यवस्था उपलब्ध असूनही, केवळ स्थानिक वायरमनच्या मद्यधुंद अवस्थेमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हजेरीनंतर सुनगाव येथील वीजपुरवठा बंद झाला. सुनगाव गावाला तीन क्रमांकाच्या सबस्टेशनवरून इमर्जन्सीमध्ये वीजपुरवठा करण्याची सोय उपलब्ध असतानाही, रात्री अडीच वाजेपर्यंत वीज आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या ३० ते ४० गावकऱ्यांनी थेट जामोद सबस्टेशन गाठले. तिथे पोहोचल्यानंतरही संबंधित वायरमन महेंद्र सोळंके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता (जे.ई.) हिंगणे यांच्याशी संपर्क साधून शनी मंदिर सबस्टेशन गाठले. तिथे पोहोचल्यावर वायरमन महेंद्र सोळंके हे पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. जे.ई. साहेबांसमोर त्यांनी स्वतःहून दारू प्यायल्याची कबुली दिली. हा सर्व प्रकार घडत असतानाच, विद्युत विभागाचे कर्मचारी रवी नानग्दे यांनी रात्री अवघ्या १५ ते २० मिनिटांत तांत्रिक बिघाड (फॉल्ट) दुरुस्त केला आणि रात्री २:४० च्या सुमारास गावाची वीज सेवा सुरळीत केली. एका जबाबदार शासकीय पदावर असूनही ड्युटीवर दारूच्या नशेत आढळणे आणि जनतेला रात्रभर अंधारात ठेवणे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. आता या मद्यधुंद वायरमनवर कनिष्ठ अभियंता हिंगणे नेमकी काय कारवाई करतात, याकडे सुनगावच्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    1
    जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे काल रात्री झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल साडेसात तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने गावकऱ्यांना रात्रभर अंधारात काढावी लागली. विशेष म्हणजे, पर्यायी व्यवस्था उपलब्ध असूनही, केवळ स्थानिक वायरमनच्या मद्यधुंद अवस्थेमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हजेरीनंतर सुनगाव येथील वीजपुरवठा बंद झाला. सुनगाव गावाला तीन क्रमांकाच्या सबस्टेशनवरून इमर्जन्सीमध्ये वीजपुरवठा करण्याची सोय उपलब्ध असतानाही, रात्री अडीच वाजेपर्यंत वीज आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या ३० ते ४० गावकऱ्यांनी थेट जामोद सबस्टेशन गाठले. तिथे पोहोचल्यानंतरही संबंधित वायरमन महेंद्र सोळंके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

त्यानंतर गावकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता (जे.ई.) हिंगणे यांच्याशी संपर्क साधून शनी मंदिर सबस्टेशन गाठले. तिथे पोहोचल्यावर वायरमन महेंद्र सोळंके हे पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. जे.ई. साहेबांसमोर त्यांनी स्वतःहून दारू प्यायल्याची कबुली दिली.

हा सर्व प्रकार घडत असतानाच, विद्युत विभागाचे कर्मचारी रवी नानग्दे यांनी रात्री अवघ्या १५ ते २० मिनिटांत तांत्रिक बिघाड (फॉल्ट) दुरुस्त केला आणि रात्री २:४० च्या सुमारास गावाची वीज सेवा सुरळीत केली. एका जबाबदार शासकीय पदावर असूनही ड्युटीवर दारूच्या नशेत आढळणे आणि जनतेला रात्रभर अंधारात ठेवणे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. आता या मद्यधुंद वायरमनवर कनिष्ठ अभियंता हिंगणे नेमकी काय कारवाई करतात, याकडे सुनगावच्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे की, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्रातील वीजदर संपूर्ण देशात सर्वात कमी असतील. या घोषणेमुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यानुसार, महाराष्ट्रातील वीजदर प्रति युनिट ७.४३ रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. इतकेच नाही, तर पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात गुजरातपेक्षाही स्वस्त वीज उपलब्ध होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे की, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्रातील वीजदर संपूर्ण देशात सर्वात कमी असतील. या घोषणेमुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यानुसार, महाराष्ट्रातील वीजदर प्रति युनिट ७.४३ रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. इतकेच नाही, तर पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात गुजरातपेक्षाही स्वस्त वीज उपलब्ध होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
    user_दखल २०२९ न्यूज
    दखल २०२९ न्यूज
    Mill Owner Buldana, Buldhana•
    9 min ago
  • शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयाच्या खाटेवरूनच राज्य सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. अन्नत्याग आंदोलन स्थगित करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सरकारसोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने दिलेला हा शब्द पाळावा, हवे तर आणखी चार-पाच दिवसांचा वेळ घ्यावा, मात्र सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडेल आणि त्याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील, अशी गर्जना तुपकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केली आहे. तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाणा येथील निवासस्थानासमोर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा आणि अन्य २३ मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला सरकारने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते, ज्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावत गेली. याच वेळी राज्यभरातील शेतकऱ्यांचा संतापही उफाळून आला. अनेक ठिकाणी आंदोलनांनी आक्रमक वळण घेतले; एसटी बस जाळणे, सरकारी कार्यालयांवर हल्ले, आत्मदहनाचे प्रयत्न, जाळपोळ, तलाठी कार्यालये आणि शासकीय वाहनांची तोडफोड अशा घटनांनी प्रशासन हादरून गेले होते. राज्यातील ग्रामीण भागात असंतोषाचा जणू स्फोटच झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. अखेर, पाचव्या दिवशी सरकार झुकले आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत तुपकर यांच्याशी चर्चा केली. कर्जमाफी संदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि सरकारला संधी देण्याच्या भूमिकेतून तुपकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, या अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकर यांना स्वतःच्या प्रकृतीने मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी धोकादायकरीत्या घसरली होती, किटोनचे प्रमाण वाढले आणि किडनीवर परिणाम झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी, सरकारने दिलेला शब्द विसरू नये अशी आठवण त्यांनी रुग्णालयाच्या खाटेवरूनच करून दिली आहे. जर सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर यावेळी संघर्ष अधिक तीव्र होईल, असे सांगत तुपकर यांनी, 'मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेल आणि एकदा बसल्यावर उठणार नाही,' असा निर्धार व्यक्त केला. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, तसेच 'शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.
    1
    शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयाच्या खाटेवरूनच राज्य सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. अन्नत्याग आंदोलन स्थगित करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सरकारसोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने दिलेला हा शब्द पाळावा, हवे तर आणखी चार-पाच दिवसांचा वेळ घ्यावा, मात्र सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडेल आणि त्याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील, अशी गर्जना तुपकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केली आहे.

तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाणा येथील निवासस्थानासमोर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा आणि अन्य २३ मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला सरकारने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते, ज्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावत गेली. याच वेळी राज्यभरातील शेतकऱ्यांचा संतापही उफाळून आला. अनेक ठिकाणी आंदोलनांनी आक्रमक वळण घेतले; एसटी बस जाळणे, सरकारी कार्यालयांवर हल्ले, आत्मदहनाचे प्रयत्न, जाळपोळ, तलाठी कार्यालये आणि शासकीय वाहनांची तोडफोड अशा घटनांनी प्रशासन हादरून गेले होते. राज्यातील ग्रामीण भागात असंतोषाचा जणू स्फोटच झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. अखेर, पाचव्या दिवशी सरकार झुकले आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत तुपकर यांच्याशी चर्चा केली. कर्जमाफी संदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि सरकारला संधी देण्याच्या भूमिकेतून तुपकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.

मात्र, या अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकर यांना स्वतःच्या प्रकृतीने मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी धोकादायकरीत्या घसरली होती, किटोनचे प्रमाण वाढले आणि किडनीवर परिणाम झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी, सरकारने दिलेला शब्द विसरू नये अशी आठवण त्यांनी रुग्णालयाच्या खाटेवरूनच करून दिली आहे. जर सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर यावेळी संघर्ष अधिक तीव्र होईल, असे सांगत तुपकर यांनी, 'मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेल आणि एकदा बसल्यावर उठणार नाही,' असा निर्धार व्यक्त केला. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, तसेच 'शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    12 hrs ago
  • मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे हळदीचे बियाणे उचलून ठेवत असताना 17 वर्षीय करण शिंदे या तरुणाला सापाने दंश केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, वेळेत खासगी रुग्णालयात उपचार मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली असून, करणची प्रकृती सध्या स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी शेतकरी भिकाजी शिंदे आणि त्यांचा मुलगा करण शेतात हळद लागवडीची तयारी करत होते. आदल्या दिवशी झालेल्या दमदार पावसामुळे, लागवडीसाठी औषध प्रक्रिया करून ठेवलेले हळदीचे बियाणे (कट्टे) उचलून ठेवण्याचे काम सुरू असताना, कट्ट्याखाली लपून बसलेल्या सापाने अचानक करणला दंश केला. या घटनेनंतर करणच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी त्याला तत्काळ मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने करणची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. संपूर्ण जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेलेल्या शेतकऱ्यांना कालच्या आलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, त्यामुळे खरीप पेरणी व हळद लागवडीची कामे वेगाने सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, पावसाळ्यामध्ये शेतात साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. शेतातील गवत, बियाण्याचे कट्टे किंवा इतर साहित्य उचलताना आधी नीट तपासणी करावी, तसेच सापदंश झाल्यास कोणताही घरगुती उपचार न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे शेतीकामांना वेग आला असला, तरी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
    3
    मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे हळदीचे बियाणे उचलून ठेवत असताना 17 वर्षीय करण शिंदे या तरुणाला सापाने दंश केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, वेळेत खासगी रुग्णालयात उपचार मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली असून, करणची प्रकृती सध्या स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी शेतकरी भिकाजी शिंदे आणि त्यांचा मुलगा करण शेतात हळद लागवडीची तयारी करत होते. आदल्या दिवशी झालेल्या दमदार पावसामुळे, लागवडीसाठी औषध प्रक्रिया करून ठेवलेले हळदीचे बियाणे (कट्टे) उचलून ठेवण्याचे काम सुरू असताना, कट्ट्याखाली लपून बसलेल्या सापाने अचानक करणला दंश केला. या घटनेनंतर करणच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी त्याला तत्काळ मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने करणची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

संपूर्ण जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेलेल्या शेतकऱ्यांना कालच्या आलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, त्यामुळे खरीप पेरणी व हळद लागवडीची कामे वेगाने सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, पावसाळ्यामध्ये शेतात साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. शेतातील गवत, बियाण्याचे कट्टे किंवा इतर साहित्य उचलताना आधी नीट तपासणी करावी, तसेच सापदंश झाल्यास कोणताही घरगुती उपचार न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

दोन दिवसांच्या पावसामुळे शेतीकामांना वेग आला असला, तरी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
    user_गजानन कडुजी राऊत
    गजानन कडुजी राऊत
    Graphic designer मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अकोट तालुक्याच्या नव्याने बांधलेल्या तहसील कार्यालयात भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोपटखेड रोडवरील वनविभागाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या या तहसीलमध्ये लोक विविध कामांसाठी आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी येतात, मात्र येथील संडास, बाथरुम आणि मुतारीच्या दुर्गंधीयुक्त वासामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून त्यांची साफसफाई केली जात नसल्याने येथे मोठ्या प्रमाणावर घाण पसरली आहे, ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कार्यालयात सफाईदार कर्मचारी असूनही इतकी घाण का आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, कार्यालयात पिण्याच्या आर.ओ. पाण्याची व्यवस्था केवळ नावापुरतीच आहे. या मशीनमध्ये पाणी नाही आणि त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत; उलट, त्यांवर दुर्गंधीयुक्त कपडे टाकण्यात आले आहेत. एवढेच नाही तर, मुतारीमध्ये तहसील कार्यालयाचे बॅनर ठेवण्यात आले असल्याने 'मुतारी बॅनर ठेवण्यासाठी आहे की जनतेला लघुशंका करण्यासाठी?' असा उपरोधिक प्रश्नही विचारला जात आहे. अनेक नागरिकांनी या गंभीर बाबींबद्दल अधिकारी वर्गाला तोंडी सांगितले असले तरी, कोणीही याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे, अकोट तहसील कार्यालयाच्या या दयनीय आणि भोंगळ कारभाराकडे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    4
    अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अकोट तालुक्याच्या नव्याने बांधलेल्या तहसील कार्यालयात भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोपटखेड रोडवरील वनविभागाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या या तहसीलमध्ये लोक विविध कामांसाठी आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी येतात, मात्र येथील संडास, बाथरुम आणि मुतारीच्या दुर्गंधीयुक्त वासामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून त्यांची साफसफाई केली जात नसल्याने येथे मोठ्या प्रमाणावर घाण पसरली आहे, ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कार्यालयात सफाईदार कर्मचारी असूनही इतकी घाण का आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, कार्यालयात पिण्याच्या आर.ओ. पाण्याची व्यवस्था केवळ नावापुरतीच आहे. या मशीनमध्ये पाणी नाही आणि त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत; उलट, त्यांवर दुर्गंधीयुक्त कपडे टाकण्यात आले आहेत. एवढेच नाही तर, मुतारीमध्ये तहसील कार्यालयाचे बॅनर ठेवण्यात आले असल्याने 'मुतारी बॅनर ठेवण्यासाठी आहे की जनतेला लघुशंका करण्यासाठी?' असा उपरोधिक प्रश्नही विचारला जात आहे. अनेक नागरिकांनी या गंभीर बाबींबद्दल अधिकारी वर्गाला तोंडी सांगितले असले तरी, कोणीही याकडे लक्ष देत नाही.

त्यामुळे, अकोट तहसील कार्यालयाच्या या दयनीय आणि भोंगळ कारभाराकडे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    user_राजकुमार वानखडे
    राजकुमार वानखडे
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.