धर्माबाद पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत धर्माबाद पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे एक आयशर वाहन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह तब्बल ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, २७ जुलै रोजी धर्माबाद पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. सरजखोड येथून धर्माबादच्या दिशेने एका आयशर वाहनातून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना समजले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून सरजखोड-धर्माबाद मार्गावर संशयित आयशर वाहन अडवले. वाहनाची पाहणी केली असता, त्यात कोणताही अधिकृत परवाना किंवा पास नसताना वाळूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ वाहनासह वाळू असा एकूण ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
धर्माबाद पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत धर्माबाद पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे एक आयशर वाहन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह तब्बल ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, २७ जुलै रोजी धर्माबाद पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. सरजखोड येथून धर्माबादच्या दिशेने एका आयशर वाहनातून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना समजले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून सरजखोड-धर्माबाद मार्गावर संशयित आयशर वाहन अडवले. वाहनाची पाहणी केली असता, त्यात कोणताही अधिकृत परवाना किंवा पास नसताना वाळूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ वाहनासह वाळू असा एकूण ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते1
- दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मानवतमध्ये भव्य आरोग्य शिबिर नगराध्यक्ष डॉ.अंकुश लाड दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मानवतमध्ये भव्य आरोग्य शिबिर नगराध्यक्ष डॉ.अंकुश लाड1
- लातूर. दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प; २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य 'पंचसूत्री' सोहळा* *दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प; २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य 'पंचसूत्री' सोहळा* पत्रकार परिषदेत धर्मवीर भारती व व्यंकटेश पुरी यांनी जागवल्या देव, देश अन् धर्माच्या स्मृती! लातूर (दि. २८ जुलै) : "दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत," असे प्रतिपादन व्यंकटेश पुरी आणि प्रतिष्ठित उद्योजक धर्मवीर भारती यांनी केले. दशनाम गोसावी समाज , लातूर या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात सकाळी १०:०० वाजता आयोजित भव्य 'पंचसूत्री सोहळ्याची' माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते संयुक्तपणे बोलत होते. गेली ३१ वर्षे, म्हणजेच १९९६ पासून दशनाम गोसावी समाज ही संघटना लातूरमध्ये समाजकार्यात अत्यंत सक्रियपणे कार्यरत असून अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे, हाच वारसा पुढे नेत या भव्य कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत उद्योजक धर्मवीर भारती यांच्या समाज उन्नतीसाठीच्या मोठ्या योगदानाचा आणि त्यांनी समाजातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेळोवेळी पुढे केलेल्या मदतीच्या हाताचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी गोसावी वुमन्स विंगच्या सुरेखा धर्मवीर भारती (भारती मॅडम) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानच्या व्यापक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, २ ऑगस्ट रोजी होणारा हा पंचसूत्री सोहळा केवळ एक कौतुक सोहळा नसून समाज बांधणीसाठी घेतलेला एक ध्यास आहे. समाजातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी 'भारती फाउंडेशन'च्या वतीने शैक्षणिक साहित्यासोबतच शिलाई मशीन वाटप केवळ एवढ्यावरच न थांबता हळदीकुंकू आणि विविध सांस्कृतिक सणांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे काम ही विंग करत आहे. समाजातील विधवा महिलांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणून, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणे, हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत अल्का गोसावी यांच्यासह विनायक गिरी, राजेंद्र गिरी, मोती गिरी गोसावी, मकरंद गिरी, प्रमोद बन, पद्माकर गिरी, विश्वजीत गिरी, चंद्रशेखर गिरी आणि बाळासाहेब भारती आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून हभप श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून हभप श्री. अविनाशजी भारती महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. स्वप्निल भय्या भारती, प्रमुख अतिथी सूर्यकांता गिरी गोसावी, पुणे यांच्या सह महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांतून नामांकित व्यक्ती श्री. सुखदेव गिरी (कोल्हापूर), श्री. अनुप गोसावी (नाशिक), श्री. ओमप्रकाश गिरी (बीड), श्री. मुन्ना गिरी गोसावी, पंढरपूर आणि श्री. गणेश पुरी (नागपूर) हे प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यात सत्कार आणि स्कॉलरशिपचा लाभ मिळवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क मेमोसह ९९२०६ २११११ (मयूर भारती प्रॉपर्टीज ऑफिस) या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नावनोंदणी करून घेणे आवश्यक आहे. लातूरच्या या ऐतिहासिक आणि प्रबोधनपर सोहळ्यास दशनाम गोसावी समाजातील सर्व समाज बांधव, भगिनी, आणि युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्घाटकांच्या विचारांचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन दशनाम गोसावी समाज, लातूरच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्वांसाठी प्रीती भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.1
- दर्शनाम गोसावी समाजाची पत्रकार परिषद उत्साहात संपन्न ‘पंचसूत्री सोहळ्या’ची सविस्तर माहिती लातूर, दि.२८ (प्रतिनिधी) : दर्शनाम गोसावी समाज, लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद मंगळवारी हॉटेल भोज, हनुमान चौक, मेन रोड, लातूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘पंचसूत्री सोहळ्या’ची सविस्तर माहिती पत्रकारांसमोर मांडण्यात आली. यावेळी आयोजकांनी सांगितले की, समाजामध्ये शिक्षण, सामाजिक ऐक्य, गुणवंतांचा गौरव आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने पंचसूत्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, निवृत्त कर्मचारी व ज्येष्ठांचा सन्मान, ‘समाजभूषण पुरस्कार’ वितरण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत, तसेच समाज प्रबोधनपर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत समाजाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना, समाजातील युवकांना शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यावर भर देण्यात आला. समाज संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी पंचसूत्री सोहळा हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नसून समाजातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक प्रगतीचा संदेश देणारा सोहळा ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही करण्यात आले. पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील विविध प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि कॅमेरामन उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आयोजकांनी सविस्तर उत्तरे देत पंचसूत्री सोहळ्याची रूपरेषा स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेस धर्मवीर भारती, व्यंकटेश पुरी यांच्यासह दर्शनाम गोसावी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकारांचे आभार मानून पंचसूत्री सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.1
- हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने अल्पसा पाऊस होताच नव्याने केलेल्या नालीचे घाण दुर्गंधी युक्त पाणी परत गावातील वस्तीत येत असल्याने नागरिकांना घाण पाण्याचा सामना करावा लागतो आहे. कोट्यावधी रुपयाच्या खर्चातून हिमायतनगर शहराच्या दोन्ही बाजूने बनविलेल्या नाल्याचे काम निकृष्ट पद्धतीने व मनमानी करून झाल्याने याचा नाहक फटका शहरातील सखल भागातील नागरिकांना बसत आहे अशा बेपरवा गुत्तेदाराच्या कामाची चौकशी करावी आणि याला अभय देणारे अभियंता यांनी दुर्लक्ष का केले याची चौकशी करून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात आहे. #Himayatnagar #drene #WaterCrisis #हिमायतनगर #नांदेड1
- आरक्षण नहीं खटकता, तुम्हें बराबरी खटकती हैपहले जातिवाद मिटाओ, फिर आरक्षण हटाओ..!!* *1
- मोती नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोलनाका सुरू करू नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा मुखेड महाविकास आघाडीचा इशारा! मुखेड-कौठा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मोती नदीवरील पुलाचे काम अद्याप अर्धवट असून, रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने मुखेडच्या तहसीलदार यांना निवेदन दिले. पुलाचे काम अपूर्ण असल्याने येथे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून वाहतूक सुरक्षित झाल्यानंतरच टोलनाका सुरू करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून टोल सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर डॉ. श्रावण रॅपणवाड, भालचंद्र नाईक, हणमंत नारनाळीकर, दिनेश पाटील केरूरकर, भाई असद बल्की यांच्यासह अनेक नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.1
- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते1
- आखाडा बाळापूर येथील नळातून जंतूंचा व घाण पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने नागरिकांनाचे आरोग्य धोक्यात आले आखाडा बाळापूर ग्राम पंचायत मार्फत डोंगरगाव पूल येथे करोडो रुपये खर्च करून विहीर खोदली असल्याचे शासनास कळविण्यात आले व तो खर्च कसा झाला याचे उदाहरण म्हणजे नळातून जंतूंचा पुरवठा सुरू करून सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येते आहे. जलजीवन मिशन योजनेतून झालेले बोगस कामे असल्या मुळे , जागोजागी नळाचे पाईप लिंकीज असल्याने बऱ्याच वेळेस नाली मधील घाण पाणी सुद्धा या नळाद्वारे मिळत असते यावर कोणतीही काळजी ग्राम पंचायत प्रशासन घेताना दिसून येत नाही. हर घर शुद्ध जल च्या ऐवजी हर घर जंतू का डर? आखाडा बाळापूर येथील नळाचे पाणी एकही नागरीक पिण्यासाठी वापरत नाही परंतु स्वयंपाक करण्यासाठी त्यांच्या वापर केला जातो. जर हे पाणी जंतू युक्त व घाणीयुक्त येत असेल तर आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोणती उपाय योजना करणार.1