वाघेबाभूळगाव येथे ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेने दिली सामाजिक संदेशाची जोड वाघेबाभूळगाव (वार्ताहर): येथील जिल्हा परिषद (अनु.) माध्यमिक शाळेत ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासोबतच यावेळी विद्यार्थ्यांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेत सामाजिक जनजागृतीचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. धनगर सर होते. त्यांच्या हस्ते विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वातावरणात भारदस्त आवाजात झेंडा गीत सादर केले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली. याप्रसंगी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतानाच सामाजिक सुधारणांवरही भर देण्यात आला. श्री. डोईफोडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा दिली. समाजातील या अनिष्ट आणि घातक कुप्रथेविरुद्ध लढा उभारण्याचा आणि समाजात जागृती घडवून आणण्याचा संकल्प या वेळी सर्वांनी केला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. आरकडे सर यांनी केले. या सोहळ्यास श्री. डोईफोडे सर, श्री. डेंगळे सर, श्रीमती राख मॅडम, तसेच केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर, श्री. काळकुटे सर, श्री. शिंदे सर, श्रीमती उगिले मॅडम, श्रीमती केंद्रे मॅडम आणि श्रीमती सोनार मॅडम यांच्यासह दोन्ही शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत आणि सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
वाघेबाभूळगाव येथे ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेने दिली सामाजिक संदेशाची जोड वाघेबाभूळगाव (वार्ताहर): येथील जिल्हा परिषद (अनु.) माध्यमिक शाळेत ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासोबतच यावेळी विद्यार्थ्यांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेत सामाजिक जनजागृतीचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. धनगर सर होते. त्यांच्या हस्ते विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वातावरणात भारदस्त आवाजात झेंडा गीत सादर केले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली. याप्रसंगी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतानाच सामाजिक सुधारणांवरही भर देण्यात आला. श्री. डोईफोडे सर यांनी
सर्व विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा दिली. समाजातील या अनिष्ट आणि घातक कुप्रथेविरुद्ध लढा उभारण्याचा आणि समाजात जागृती घडवून आणण्याचा संकल्प या वेळी सर्वांनी केला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. आरकडे सर यांनी केले. या सोहळ्यास श्री. डोईफोडे सर, श्री. डेंगळे सर, श्रीमती राख मॅडम, तसेच केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर, श्री. काळकुटे सर, श्री. शिंदे सर, श्रीमती उगिले मॅडम, श्रीमती केंद्रे मॅडम आणि श्रीमती सोनार मॅडम यांच्यासह दोन्ही शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत आणि सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
- रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी1
- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न1
- नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.4
- ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला1
- दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?1
- 17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.1
- तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1