रेणुका महागांवकर यांच्या ह्दयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन सोलापूर,- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा तथा कवयित्री रेणुका अविनाश महागांवकर यांच्या ह्दयस्थ या काव्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांच्या हस्ते आणि गायिका सन्मिता धापटे - शिंदे यांंच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6. 25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह चार हुतात्मा पुतळा चौक सोलापूर (अॅम्फी थिएटर ) येथे होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली. कवयित्री रेणुका महागांवकर यांचे तिसरे पुस्तक प्रकाशित होत असताना यापुर्वी सन 2016 मध्ये तुमच्यासाठी आणि सुजाण पालकत्व अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. यानंतर दि. 25 एप्रिल रोजी ह्दयस्थ हे तिसरे पुस्तक प्रकाशित होणार आहे. नीता नितीन हिरवे यांच्या संवेदना प्रकाशन संस्थेकडून प्रकाशनाची जबाबदारी घेण्यात आली आहे. या ह्दयस्थ या काव्य संग्रहामध्ये ह्दयाला थेट भिडतील अशा कवितांचा समावेश आहे. जुन्या काळातील अनेक परंपरा आणि संस्कृती तसेच आधुनिक काळातील बदल असा अनोखा संगम तसेच निसर्ग कविता, प्रेमकविता आणि सामाजिक भान असलेल्या कविता या ह्दयस्थ या काव्यसंग्रहात वाचायला मिळणार आहे. कवी अशोक नायगांवकर यांची प्रस्तावना लाभली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून या ह्दयस्थ काव्य संग्रहाचे प्रकाशन शनिवार दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6.25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह चार हुतात्मा पुतळा चौक सोलापूर (अॅम्फी थिएटर ) येथे होणार आहे या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रा.दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी,कोषाध्यक्ष अमोल धाबळे,कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर आदी कार्यरत आहेत

- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- Post by मन्सूर शेख1
- Post by कर्जत लाईव्ह1
- गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली. “जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे. नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. “सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- विक्रम शिंदे /भोर दि.२३ भोरसाठी वर्षभरासाठी ५०कोटीचा निधी आणला शिल्लक चार वर्षात किती निधी आणतो ते बघा असे सांगून विरोधकांच्या भुलथापाना बळी पडू नका असे भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर म्हणाले.भोर येथील नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकूल आणि रामबाग परिसरातील जलतरण तलावाचे लोकार्पण आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मा.श्री.रामचंद्रनाना आवारे - नगराध्यक्ष,न.प.भोर मा.श्री.गजाननजी शिंदे सर - सी.ओ.- न.प.भोर मा.श्री.विक्रमदादा खुटवड-जि.प.सदस्य,पुणे मा.श्री.रणजितदादा शिवतरे मा.उपाध्यक्ष,जि.प. मा.श्री.प्रवीणजी जगदाळे -जि.प.सदस्य,पुणे मा.सौ.मनीषाताई कंक - सभापती,पं.स.भोर मा.श्री.राजेशभाऊ बोडके - सदस्य,पं.स.भोर मा.श्री.केदारजी देशपांडे - गटनेते,न.प.भोर व सर्व सन्माननीय नगरसेवक ,पदाधिकारी तथा अधिकारी उपस्थित होते.2
- Post by Baban Gawade1
- Post by Kishor subhash jadhav1
- विक्रम शिंदे /भोर दि.२२ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या मात्र पैकी २४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने तालुक्यातील रावडी , अंगसुळे ,खडकी या ३ ग्रामपंचायतीसाठी पोट निवडणूक येत्या २८ होत आहे.या निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज (दि.22) पंचायत समिती भोर येथे पार पडले.रावडी आणि खडकी येथे सरपंचपदासाठी तर खडकी येथे केवळ एका वॉर्डमधील केवळ एका सदस्यपदासाठी ही पोट निवडणूक होत असल्याचे निवासी नायब तहसीलदार महसूल वैशाली घोरपडे यांनी सांगितले.1