logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाचनातून ज्ञानाचा प्रकाश; जीवनातील अंधार नष्ट करतो.. (वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाच्या 46 व्या केंद्राचे एकलव्य नगर येथे उद्घाटन) वाचनातून ज्ञानाचा प्रकाश; जीवनातील अंधार नष्ट करतो.. (वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाच्या 46 व्या केंद्राचे एकलव्य नगर येथे उद्घाटन) बीड (प्रतिनिधी) माऱ्याच्या- मोक्याच्या जागा मिळवा; त्याकरिता उच्च शिक्षणाची कास धरून ग्रंथाशी संगत ठेवून सखोल वाचन, चिंतन,मनन करून ज्ञान प्राप्त करा. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा हा बहुमोल उपदेश लक्षात ठेवून लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधून लोकशाही तत्त्वाचा प्रचार आणि समर्थन करण्याकरिता वाचनालयाच्या 46 व्या केंद्राचे उद्घाटन माननीय प्रभू पवार यांच्या अध्यक्षतेखाली,मा प्रा. श्रीराम जाधव, मा.श्री संतोष बर्डे यांच्या उपस्थितीत एकलव्य नगर, (भिल्ल समाज वस्ती) आहेर धानोरा ता. जि. बीड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ह्याप्रसंगी एकलव्य नगर परिसरातील परिवर्तनवादी जेष्ठ नागरिक माननीय प्रभू पवार अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्रीराम जाधव से.नी. जिल्हा प्रबंधक एलआयसी यु एस वाघमारे प्रा. टी.जी कांबळे, पोस्टमास्टर अमरसिंह ढाका, शिक्षक संतोष बर्डे, आयुष्यमान प्रतिभाताई रोडे, मा. प्रकाश फाटक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते,तर आयुष्यमान काशिनाथ वाघमारे , संविधान युवा मंचचे अध्यक्ष ॲड राजेश शिंदे , बीड विधानसभा मतदारसंघ बसपा चे अध्यक्ष रजनीकांत वाघमारे,निखिल वडमारे यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ आठवले यांनी केले तर वाचाल तर वाचालचे अध्यक्ष डी.जी वानखेडे यांनी प्रास्ताविक करून वाचनालयाच्या उपक्रमाबद्दल व महामानव अभिवादन ग्रुप राबवीत असलेल्या विविध समाज उपयोगी व प्रबोधनात्मक कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प व पुष्प माला मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून त्यांच्या विचारांना व महान कार्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन घेतले. विद्यार्थी व पालकांशी हितगुज साधताना आपल्या प्रबोधनात्मक भाषणातून प्राध्यापक श्रीराम जाधव म्हणाले की जीवनात आहे त्या परिस्थितीत बदल करायचा असेल तर उच्च शिक्षणाची कास धरून आजच्या लोकशाही शासन व्यवस्थेत आपले हक्क संविधानानिक मार्गाने कसे मिळवायचे हे समजून घेणे व त्याकरिता कायद्याचे पालन करून लढा देणे गरजेचे आहे. तत्कालीन ब्रिटिश शासनाने 1871 मध्ये गुन्हेगारी जमात कायदा केला होता तो कायदा 31 ऑगस्ट 1952 रोजी भारतीय लोकशाही संविधानिक मार्गाने रद्द केला. या जुलमी कायद्यांमुळे मूळ रहिवासी असलेले आदिवासी, भिल्ल, पारधी,रामोशी,विमुक्त भटक्या जाती जमाती मधील मानवाचे जीवन दुःखमय व हालाखीचे होते. याबद्दल सविस्तर विवेचन केले. *"शिका संघटित व्हा व संघर्ष करा"* ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपदेशानुसार विपरीत परिस्थितीत राहूनही उच्चशिक्षण घेऊन स्वहिता बरोबर समाजाची ऋण फेडा परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करा असे प्रतिपादन प्रकाश फाटक यांनी केले. ऍड राजेश शिंदे यांनी देखील स्पष्ट केले की माणूस म्हणून स्वाभिमानाने जगायचे असेल तर आणि जीवनात परिवर्तन करावयाचे असेल तर शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या व क्रांतिवीर बिरसा मुंडा या महान महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले आचरण ठेवावे हे अगत्यपूर्वक सांगितले. अमरसिंह ढाका आपल्या मनोगतात म्हणाले की गुन्हेगारी जमात कायद्याने पोळलेल्या व सर्व स्तरातील मानवाने अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी -परंपरा व बालविवाह न करणे दारू मादक पदार्थ तंबाखू बिडी सिगरेट यापासून दूर राहणे व समाजाच्या प्रगती करिता हे समजावून सांगितले. शिक्षक संतोष बर्डे यांनी आपल्या भिल्ल बांधव बोलीभाषेत बोलून भिल्ल समाजातील पहिले आय.ए.एस होऊन जिल्हाअधिकारी झालेले डॉ राजेंद्र भारुड यांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडून दाखवला तर प्रत्येकाने बघितलेले मोठे स्वप्न देखील पूर्ण करता येते त्याकरिता पालकांनी व्यसनापासून दूर राहून आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे मुळीच दुर्लक्ष करू नये असे आग्रही प्रतिपादन केले. वाचाल तर वाचाल तर्फे 51 पुस्तकाचा संच एकलव्य नगर वस्ती करिता माननीय प्रभू पवार व कृष्णा पवार कडे सुपूर्द केला. पुस्तक वितरणाची जबाबदारी कृष्णा पवार यांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारली. महामानव अभिवादन ग्रुप तर्फे 39 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही पेन वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयु. प्रतिभाताई रोडे व पी. आय.सुरेश साबळे व ए .एस.आय.अशोक सोनवणे यांनी 29 पुस्तके फिरते मोफत वाचनालयाला दान दिले. महामानव अभिवादन ग्रुप करिता रोडे ताईंनी 20 पेन व 18 वह्या दान दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्षीय समारोपात या प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे प्रभू पवार यांनी एकलव्य नगरा तर्फे लहान बालकांच्या हिताकरिता जाहीर केले की संपूर्ण समाज अंधश्रद्धा, दारू, तंबाखू, बिडी, सिगरेट त्यापासून दूर राहण्यास व आदर्श जीवन जगण्यासाठी स्वतः शपथ घेतली व व्यसनापासून दूर राहण्याचे सर्वांच्या वतीने आश्वासन दिले.. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन काशिनाथ वाघमारे यांनी केले. कार्यक्रमास यलोपा पवार, कैलास पवार, राजू पवार, बलभीम पवार, काळू पवार,दादा पवार, बाळू पवार,सतीश पवार,दीपक बर्डे,अमोल बर्डे, दत्ता बर्डे, अमोल पवार, गंगाधर पवार,वैभव पवार, छबाबाई पवार, आशाबाई पवार,सुरेखा पवार,जया पवार, सुमन बर्डे,मकाबाई बर्डे,इमलबाई बर्डे व परिसरातील बहुसंख्य महिला, पुरुष व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

1 hr ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
1 hr ago
d509aded-995e-48ba-82b3-001099b11201

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली. जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले. पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे. “पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे. “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच.. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.
    3
    “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू
“ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू
“या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद
अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले.
कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली.
जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले.
पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे.
“पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला.
मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.
एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे.
“वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच..
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात सोनपेठचे नगरसेवक मा.अब्दुल रहेमान सौदागर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण अत्यंत सन्मानपूर्वक संपन्न झाले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुकास्तरीय बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू जान्हवी अशोक रोडे, निनाद गोविंद वाकणकर, दिप उद्धव भोसले, अलफिया अतिक सय्यद, अर्शिया फारूक सय्यद, श्रेयस सतीश काटे, सार्थक संजय फपाळ, अनन्या रामेश्वर गव्हाणे.या सर्व विजेत्यांचे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष मा.परमेश्वर भैय्या कदम, कोषाध्यक्ष मा. रामेश्वर कदम, उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम, संपादक किरण रमेश स्वामी व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत व कौतुक करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.पल्लवी यादव, प्राचार्य श्री. प्रशांत कांबळे, किड्स विभागाच्या प्राचार्या सौ.अनिता कंदे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    3
    एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार
एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात सोनपेठचे नगरसेवक मा.अब्दुल रहेमान सौदागर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण अत्यंत सन्मानपूर्वक संपन्न झाले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुकास्तरीय बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू जान्हवी अशोक रोडे, निनाद गोविंद वाकणकर, दिप उद्धव भोसले, अलफिया अतिक सय्यद, अर्शिया फारूक सय्यद, श्रेयस सतीश काटे, सार्थक संजय फपाळ, अनन्या रामेश्वर गव्हाणे.या सर्व विजेत्यांचे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष मा.परमेश्वर भैय्या कदम, कोषाध्यक्ष मा. रामेश्वर कदम, उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम, संपादक किरण रमेश स्वामी व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत व कौतुक करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.पल्लवी यादव, प्राचार्य श्री. प्रशांत कांबळे, किड्स विभागाच्या प्राचार्या सौ.अनिता कंदे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    46 min ago
  • सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
    1
    सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..

दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..
दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..
दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त..
आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
    1
    रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा

नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!” कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे." "महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला. दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.
    1
    महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!”
कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे."
"महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला.
दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.
    user_SM Rokhthok News
    SM Rokhthok News
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • कादराबादच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आरती शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे कौतुक; भक्ती,आनंद, उत्साहासोबत सामाजिक एकता आणि पर्यावरण तज्ञ उत्तर संवर्धनाचा दिला संदेश कादराबादच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आरती शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे कौतुक; भक्ती,आनंद, उत्साहासोबत सामाजिक एकता आणि पर्यावरण तज्ञ उत्तर संवर्धनाचा दिला संदेश
    1
    कादराबादच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आरती

शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे कौतुक; भक्ती,आनंद, उत्साहासोबत सामाजिक एकता आणि पर्यावरण तज्ञ उत्तर संवर्धनाचा दिला संदेश
कादराबादच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आरती
शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे कौतुक; भक्ती,आनंद, उत्साहासोबत सामाजिक एकता आणि पर्यावरण तज्ञ उत्तर संवर्धनाचा दिला संदेश
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.
    1
    तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस 

तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस 
बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    1
    आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात

आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता.
१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.