Shuru
Apke Nagar Ki App…
महिला आरक्षण परिसीमनाशी जोडणे मोठी चूक; महिलांवर अन्याय, भाजपच्या शेवटाची सुरुवात — प्रणिती शिंदे संसद भवन परिसरात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने मोठी चूक करत महिलांशी अन्याय केला आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये मंजूर झाले असून ते २०२४ पासून लागू व्हायला हवे होते. मात्र, महिला आरक्षणाला परिसीमन प्रक्रियेशी जोडण्याचा निर्णय घेत सरकारने गंभीर चूक केली आहे. या निर्णयामुळे देशातील महिलांच्या हक्कांवर गदा आली असून हा अन्यायकारक निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, "हीच भाजपच्या शेवटाची सुरुवात ठरेल," असा इशाराही त्यांनी दिला.
Akkalkot news
महिला आरक्षण परिसीमनाशी जोडणे मोठी चूक; महिलांवर अन्याय, भाजपच्या शेवटाची सुरुवात — प्रणिती शिंदे संसद भवन परिसरात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने मोठी चूक करत महिलांशी अन्याय केला आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये मंजूर झाले असून ते २०२४ पासून लागू व्हायला हवे होते. मात्र, महिला आरक्षणाला परिसीमन प्रक्रियेशी जोडण्याचा निर्णय घेत सरकारने गंभीर चूक केली आहे. या निर्णयामुळे देशातील महिलांच्या हक्कांवर गदा आली असून हा अन्यायकारक निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, "हीच भाजपच्या शेवटाची सुरुवात ठरेल," असा इशाराही त्यांनी दिला.
More news from Maharashtra and nearby areas
- 📍लातूरच्या निलंगा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांरी अणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, 3000₹ हाप्ता घेऊन पण कार्यवाही..? #viralvideo1
- *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..* AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.3
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- सरकारने रद्द केलेल्या 5 टक्के आरक्षणावर पुनर्विचार करावा शेख अनिस सर यांचे मत.बीड शहरात 17 तारखेला एल्गार मोर्चा काढण्यात आला होता1
- Post by Mahindra Magi1
- Post by मन्सूर शेख1
- तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 18 एप्रिल 2020. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या 'खाकी' वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर जनतेतून व भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.1
- पाटोदा(प्रतिनिधी):- बीड जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापुरुष आणि लोकनेत्यांच्या पुतळ्यांच्या उभारणीसाठी हालचालींना अखेर वेग आला आहे. मुंबईतील नामांकित शिल्पकारांकडून तातडीने कोटेशन मागविण्यात आले असून, गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या शंभुप्रेमींच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जिल्हा नियोजन अर्थसंकल्पात या स्मारकांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असली, तरी ही रक्कम अपुरी असल्याचे सांगत अधिक निधी उपलब्ध करून देऊन रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी डॉ.गणेश ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीसमोर महापुरुषांची स्मारके उभारल्याशिवाय लोकार्पण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शंभुप्रेमींनी घेतली होती. या नंतर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी १९ मार्च २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात चार वर्षे कोणती ही कामे झाली नाहीत. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शंभुप्रेमींनी सातत्याने निवेदने व आंदोलनांद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुंबईतील प्रख्यात शिल्पकार राजेंद्र शिरगावकर (विघ्नेश्वर आर्ट्स) यांना पत्र पाठवून प्रक्रिया सुरू केली आहे. त्या मुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषदेत एकूण सहा पुतळे उभारण्याचा ठराव पारित करण्यात आला असून त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा १२ फूट उंचीचा भव्य पूर्णाकृती ब्राँझ पुतळा, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येकी ४ फूट अर्धाकृती ब्राँझ पुतळे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा १० फूट पूर्णाकृती पुतळा, लोकनेते सुंदरराव सोळंके यांचा १० फूट पूर्णाकृती पुतळा आंदोलनकर्त्यांनी लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मारकांचीही उभारणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी असलेले शंभुप्रेमी डॉ.गणेश ढवळे, शेख युनुस, रामनाथ खोड, अशोक येडे, शेख मुबीन, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, राहुल वायकर, संजय गोडसे, जयदत्त थोटे, युवराज मस्के, विठ्ठल बहिर, भागवत मस्के, गणेश मस्के, गणेश धोंडरे, राजेंद्र आमटे, नितिन सोनावणे,विजय लाटे सह आदींनी समाधान व्यक्त केले आहे.1
- 17 एप्रिल 2026 रोजी बीड येथे होणाऱ्या एल्गार मुस्लिम आरक्षण मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातून तालुक्यातून मुस्लिम समाजाने आपले आपसातील मतभेद बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन नेकनूर चे माजी पंचायत समिती सदस्य पठाण फेरोज यांनी यावेळी केले.1