वाशीम उड्डाणपुलाजवळ भीषण ट्रॅफिक जॅम; पुसद नाका पर्यंत वाहनांच्या रांगा, ट्राफिक नियम बसले धाब्यावर. वाशीम प्रतिनिधी. अनंता घुगे दिनांक 03 मे 2026 वाशीम शहरातील उड्डाणपुलालगतचे सर्व्हिस रोड बंद असल्यामुळे शहरात वारंवार ट्रॅफिक जॅमची गंभीर समस्या निर्माण होत आहे. पुसद नाका पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक वेळा वाहनांच्या रांगा 30 मिनिटांहून अधिक काळ जागीच उभ्या राहत असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गर्दीमुळे मोठ्या वाहनांकडून मोटारसायकलस्वार, पायदळ चालणारे नागरिक यांना चिरडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच शाळकरी मुलं आणि परीक्षा देण्यासाठी जाणारे विद्यार्थी या ट्रॅफिकमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे, या ट्रॅफिक जॅममध्ये रुग्णवाहिका अडकण्याच्या घटनाही समोर येत असून, तात्काळ सेवा देणारी वाहने वेळेवर पोहोचू शकत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय, ट्रॅफिकमध्ये वाहनधारकांमध्ये अनेकदा वादावादी व चकमकी होत असल्याचेही दिसून येत आहे. ही परिस्थिती पुढे जाऊन गंभीर किंवा विकृत घटनांमध्ये बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे उड्डाणपुलाचे सर्व्हिस रोड तात्काळ सुरू करण्याची, पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची, उड्डाणपुलावर लाईट व लॅम्प बसवण्याची तसेच पुसद नाका परिसरात अतिरिक्त वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, या सर्व मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- वाशीम प्रतिनिधी. अनंता घुगे दिनांक 03 मे 2026 वाशीम शहरातील उड्डाणपुलालगतचे सर्व्हिस रोड बंद असल्यामुळे शहरात वारंवार ट्रॅफिक जॅमची गंभीर समस्या निर्माण होत आहे. पुसद नाका पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक वेळा वाहनांच्या रांगा 30 मिनिटांहून अधिक काळ जागीच उभ्या राहत असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गर्दीमुळे मोठ्या वाहनांकडून मोटारसायकलस्वार, पायदळ चालणारे नागरिक यांना चिरडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच शाळकरी मुलं आणि परीक्षा देण्यासाठी जाणारे विद्यार्थी या ट्रॅफिकमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे, या ट्रॅफिक जॅममध्ये रुग्णवाहिका अडकण्याच्या घटनाही समोर येत असून, तात्काळ सेवा देणारी वाहने वेळेवर पोहोचू शकत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय, ट्रॅफिकमध्ये वाहनधारकांमध्ये अनेकदा वादावादी व चकमकी होत असल्याचेही दिसून येत आहे. ही परिस्थिती पुढे जाऊन गंभीर किंवा विकृत घटनांमध्ये बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे उड्डाणपुलाचे सर्व्हिस रोड तात्काळ सुरू करण्याची, पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची, उड्डाणपुलावर लाईट व लॅम्प बसवण्याची तसेच पुसद नाका परिसरात अतिरिक्त वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, या सर्व मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- बुद्ध पौर्णिमेनिमित्त खीरदानाचे आयोजन जऊळका येथे बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने धम्म उपासिका मीनाताई सारनाथ अवचार यांच्या वतीने खीरदानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बुद्ध पूजा पाठ घेण्यात आला याप्रसंगी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची स्थापना मीना ताई अवचार यांच्या निवासस्थानी करण्यात आली या उपक्रमाद्वारे परिसरातील नागरिकांना खीर वाटप करून भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा, दया आणि समतेच्या संदेशाचा प्रसार करण्यात आला. या कार्यक्रमाला मीना ताई सारनाथ अवचार सविता राजेश ढाले पूजा बाळू ढाले ,माया रवी ढाले आम्रपाला पोफळे, मथुराबाई अवचार, विशाखा बलदेव अवचार ,सुजाता अनिल अवचार सुनंदा अवचार नंदाबाई कांबळे ,वर्षा अवचार इंदुबाई खडसे आम्रपाला बाई कांबळे, नीलम ढाले सविता इंगोले गिताबाई खडसे स्वाती भगत यासह कार्यक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थितांना खीर वाटप करताना बौद्ध धर्मातील मानवतेचा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी मीनाताई सारनाथ अवचार यांनी सांगितले की, “बुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक उत्सव नसून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुभाव वाढविण्याची संधी आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना दृढ होते.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या खीरदान उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.1
- Post by Sharad Dayedar1
- Post by दिपक हैबतराव चोरमले2
- एसटीचा प्रवास फ्री आहे. त्यांनी रिटायर होईपर्यंत कधी गाडी घेतली नाही, बंगला बांधला नाही, बायकोने महाराष्ट्रभर बसने फिरणारे आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांचं नाव फेमस आहे. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या गाडीत कित्त्येकदा त्यांना कंडक्टरला पटवून द्यावं लागायचं कि ते खरंच आमदार आहेत आणि त्यांना डब्यात दिलेली भाजी भाकरीच खाल्ली, त्यांच्या याच साधेपणाने त्यांनी एक अनोखा रेकॉर्ड केला. ते एकाच मतदारसंघातुन ११ वेळेस निवडून आले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. भ्रष्टाचार केला नाही आणि करूही दिला नाही. काटकसर करण्याचा स्वभाव असा कि मंत्री झाल्यावर मंत्रालयातली रद्दी विकून ते पैसे सरकारी खात्यात जमा होतील याकडे त्यांनी बारीक लक्ष दिलं होतं. त्यांच्या याच इमेजमुळे त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं 'चालत-बोलते विद्यापीठ' म्हणलं जायचं. गणपतरावांच्या साधेपणाचे सगळे किस्से जाणून घ्या, या व्हिडिओमधून.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- नागिन डान्स आंदोलन प्रकरण: १० वर्षांनी न्यायाचा विजय, सर्व आरोपी निर्दोष! शेगाव : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आणि आपल्या अनोख्या ‘नागिन डान्स’ आंदोलनामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या प्रकरणात अखेर न्यायाचा मोठा विजय झाला आहे. तब्बल दहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांना निर्दोष मुक्त करत सत्याला मान्यता दिली आहे. दि. 28 एप्रिल 2016 रोजी शेगाव विकास आराखड्यातील त्रुटी, अपूर्ण कामे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात युवकांनी केलेले हे आंदोलन त्या काळात प्रचंड गाजले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘नागिन डान्स’ सारखी हटके पद्धत वापरल्यामुळे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात युवा आंदोलनकर्ते अमित वसंतराव जाधव यांच्यासह संतोष सानप, शुभम आझादीवाल, ताहेर शेख, प्रा. भूषण दाभाडे, आकाश पहुरकर पाटील, सागर दिंडोकार, राजेंद्र गोरे, गणेश जाधव आणि अनंतलालजी भुतडा यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले होते. मात्र सेशन कोर्टाने सर्व पुरावे आणि युक्तिवाद तपासून अखेर सर्वांना निर्दोष घोषित केले. निर्णयानंतर शेगाव शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून आंदोलनकर्त्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना अमित जाधव यांनी ठाम शब्दांत सांगितले — “जनतेच्या हक्कासाठी लढलो, त्याचा आम्हाला अभिमान आहे. या संघर्षात कधीही मागे फिरलो नाही आणि पश्चाताप तर अजिबात नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आज तो खरा ठरला.” ते पुढे म्हणाले — “ही फक्त आमची नाही, तर जनतेच्या आवाजाची जीत आहे. यापुढेही अन्यायाविरुद्ध अशाच अभिनव आणि जोरदार पद्धतीने आंदोलन सुरूच राहणार!” हा निकाल केवळ आरोपींची सुटका नाही, तर लोकशाहीत आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.1
- Post by विदर्भ शासन न्यूज..1