धम्मचक्र प्रवर्तन दिन व आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण सोहळ्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची आग्रही मागणी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना निवेदन सादर कामठी : नागपूर ते बोधगया दरम्यान धावणाऱ्या ऐतिहासिक व बौद्ध बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘दीक्षाभूमी एक्स्प्रेस’चे रूपांतर तातडीने सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये करण्यात यावे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी आठवड्यातून किमान तीन दिवस नियमित सुरू करावी, अशी आग्रही मागणी माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शिफारशी नंतर ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या रेल्वे राज्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत रंजन कुमार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रवासाचा वेळ कमी करून वारंवारता वाढवण्याची गरज नागपूरसह संपूर्ण विदर्भातील लाखो बौद्ध अनुयायी, भिक्खू संघ आणि अभ्यासकांसाठी ज्ञानभूमी बोधगया हे परम पावन व सर्वोच्च श्रद्धेचे केंद्र आहे. सध्या धावणाऱ्या दीक्षाभूमी एक्स्प्रेसमुळे या प्रवासाला गती मिळाली असली, तरी मर्यादित फेऱ्या आणि प्रवासाचा दीर्घ कालावधी यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या गाडीला सुपरफास्टचा दर्जा देऊन प्रवासाचे तास कमी करण्यात यावेत. तसेच आठवड्यातून किमान तीन दिवस ही सेवा उपलब्ध झाल्यास धम्मदीक्षा, विहारदर्शन, संशोधन आणि धार्मिक उपक्रमांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी निवेदनात नमूद केले. विशेष म्हणजे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवरून लाखों अनुयायी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत असतात. धम्मचक्र प्रवर्तन दिन व त्रिपिटक सोहळ्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करा नागपूर येथे साजरा होणारा ऐतिहासिक 'धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा' आणि बोधगया येथे संपन्न होणारा 'आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण सोहळा' या दोन्ही जागतिक स्तरावरील महोत्सवांना देशभरातून लाखो अनुयायी उपस्थित राहतात. या काळात रेल्वे प्रशासनावर प्रचंड ताण येतो आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने दोन्ही सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर तत्काळ विशेष रेल्वे गाड्यांचे स्वतंत्र नियोजन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. रेल्वे मंत्रालयाने या जनभावनेची गंभीर दखल घेत दीक्षाभूमी एक्स्प्रेस सुपरफास्ट करणे, वारंवारता वाढवणे आणि विशेष गाड्या सुरू करणे या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असा विश्वास यावेळी ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केला.

- राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची पत्रकार परिषद; दिली महत्त्वपूर्ण माहिती रामटेकचे आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत राज्यात शेतीच्या परिस्थितीबद्दल व शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.याशिवाय त्यांनी अंन्य महत्त्वपूर्ण माहिती दिली.पहा मंत्री काय सांगतात.1
- राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !1
- वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .1
- साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गणित शिक्षिका नसल्याने 'तालाठोको' आंदोलन; पालकांच्या तीव्र रोषानंतर मार्ग निघाला नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा / साकरीटोला : सातगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाच्या शिक्षिका धुवाधपाडे मॅडम यांची चार महिन्यांपूर्वी अन्यत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर शाळेत नियमित गणित शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. आगामी १५ दिवसांत प्रथम सत्र परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विरोधात आज संतप्त विद्यार्थी, पालक, शाळा सुधार समिती व व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेला कुलूप लावून 'तालाठोको' आंदोलन पुकारण्यात आले. प्रतिक्रिया व भूमिका: वंदनाताई काळे (जिल्हा परिषद सदस्य, कारूटोला क्षेत्र): आंदोलनादरम्यान प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे म्हणाल्या की, धुवाधपाडे मॅडम या साकरीटोला शाळेत ९ वी आणि १० वीच्या गणित विषयासाठी कार्यरत असताना त्यांना नियमबाह्यरीत्या जाम्यातिम्या हायस्कूल येथे नेण्यात आले. शिक्षण सेवकाने किमान तीन वर्षे एका ठिकाणी सेवा देणे बंधनकारक असताना अवघ्या काही महिन्यांत अशी तदर्थ बदली करणे नियमबाह्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या आदेशाचीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी न केल्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सालेकसा: या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, साकरीटोला शाळेत पालक व व्यवस्थापन समितीने आंदोलन करून शाळा बंद केल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. धुवाधपाडे मॅडम यांची सेवा यापूर्वी जाम्यातिम्या येथील हायस्कूलमध्ये संलग्न करण्यात आली होती, परंतु पालकांच्या तीव्र मागणीनुसार त्यांचे ते आदेश रद्द करण्यात आले असून, त्या लवकरच साकरीटोला शाळेत पुन्हा रुजू होणार आहेत. पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे मनोगत: आंदोलनानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतल्यामुळे आणि पालकांच्या व शाळा समितीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या शिक्षक नियुक्तीची मागणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. याबद्दल पालक वर्ग व शाळा समितीच्या वतीने समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानण्यात आले. – अमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत / संपादक, सत्य को जानो न्यूज1
- भजियापार टोला येथे गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधनातून एकतेचा संदेश गोंदिया आमगांव:भजियापार टोला, ता. आमगाव, जि. गोंदिया : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त भजियापार टोला येथील भजियापार नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने विविध सार्वजनिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा मजबूत करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव रहांगडाले, उपाध्यक्ष मोहित रहांगडाले, सचिव आदित्य रहांगडाले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते राधेलाल रहांगडाले, शितल चौधरी, तीलकचंद कटरे, मेघराज चौधरी ,केशरी रहांगडाले तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘एकता आणि सामाजिक जनजागृती’ हा संदेश देण्याचा मंडळाचा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.1
- लोणार धोटे गावात सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचा विळखा; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी व कचऱ्यामुळे अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी साचले असून संपूर्ण गावाला चिखल आणि कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची योग्य स्वच्छता न झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत असून, 'स्वच्छ भारत' मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने नालेसफाई व सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने पुढील दोन दिवसांत यावर ठोस उपाययोजना न केल्यास सुमठाणा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि विभागप्रमुख सचिन दडमल यांनी दिला असून याबाबत पंचायत समितीकडे आज तक्रारही नोंदवली आहे.1
- चंद्रपूर शहरात आंबेडकरी जनतेचा भव्य आक्रोश मोर्चा, दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन चंद्रपुरात आज दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन अंतर्गत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला, आयोजित मोर्च्यात आंबेडकरी जनतेतर्फे 9 मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रमुख मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर या संस्थेमध्ये एकाच परिवारातील तसेच नातेसंबंधातील रक्त नात्याचे सदस्य नसावे व त्यात जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी सर्वानुमते निवडलेले अथवा पाठविलेल्या समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.1
- १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;1
- लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर नगरी जिल्हा प्रतिनिधी विशेष वृत्त लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर: एमआयडीसी घुग्घुस परिसरातील ‘मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ या कारखान्यामुळे परिसराचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी केला आहे. या उद्योगाची पर्यावरण परवानगी तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास थेट मुंबईत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनातील मुख्य मुद्दे व घडामोडी रासायनिक कचऱ्याचे प्रदर्शन: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर रासायनिक घनकचरा आणि सांडपाणी आणून अनोखा निषेध नोंदवण्यात आला. शेतीचे नुकसान: १८ ऑगस्ट २०२६ रोजी उसगाव नाल्यात रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे सुमारे १०० एकर शेती प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दहा गंभीर आरोप: ईएसपी डस्ट (डोलाचार) ची नियमबाह्य वाहतूक व विक्री, हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा जास्त उत्पादनाचे आरोप. MPCB अधिकाऱ्यांवर गंभीर संशय: पर्यावरण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांवर व्यवस्थापनाशी संधान साधल्याचे आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा कारखान्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आगामी २५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ समोर आत्मदहन करण्याचा इशारा उसगाव येथील खालील नागरिकांनी दिला आहे: मोहनदास धोंडूजी राजूरकर वामन बापूजी राजूरकर बंडू धोंडूजी राजूरकर रामरतन बापूजी राजूरकर सुधाकर मल्हारी ठाकरे नितेश पांडुरंग ठाकरे महत्त्वाचे: प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जल व मृद नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांमधून दिली जात आहे. © चंद्रपूर नगरी | सर्व हक्क सुरक्षित1