वैद्यकीय बिलांची शंभर टक्के प्रतिपूर्ती द्या : राजेंद्र कोरे कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांची शंभर टक्के प्रमाणे प्रतिपूर्ती द्या अशी मागणी राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती देत असताना ती 66.66% इतकीच वेतन पथकाद्वारे दिली जाते. उवर्रित 33.33% इतकी प्रतिपूर्ती महानगरपालिका यांच्याकडून आदा करण्याबाबतचे आदेश आहेत. खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे महानगरपालिकेचे थेट कर्मचारी नाहीत.तसेच या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते आदा करण्यासाठी स्वतंत्र वेतन पथकाची स्थापना करण्यात आली आहे.त्यामुळे महापालिकेकडून सदरची वैद्यकीय बिले स्वीकारली जात नाही, उर्वरित 33.33% इतके वैद्यकीय बिल या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. तरी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर यामुळे अन्याय होत असून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शंभर टक्के प्रमाणे वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती द्यावी,अशी मागणी राज्याचे शिक्षण संचालक ( प्राथ.)शरद गोसावी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे राजेंद्र कोरे यांनी केली आहे.

- इचलकरंजी जवळील तारदाळ येथे जुन्या वादातून चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली. जावेद मुजावर वय अंदाजे बावीस वर्षे राहणार तारदाळ याच्यावर यश गायकवाड राहणार जावई वाडी याने चाकूने जीवघेणा वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या जावेद मुजावर याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. शहापूर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.1
- हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व कुंभोज / प्रतिनिधी हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या कट्टर समर्थक अश्विनी अनिल बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.तर आळते पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले इंगवले गटाचे समर्थक संतोष कांबळे (शिवसेना शिंदे गट) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी अश्विनी बिरंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.त्यानंतर उपसभापती पदासाठी संतोष कांबळे यांच्या नावावर सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काम पाहिले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,राजू इंगवले,किरण इंगवले, झाकीर भालदार,वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरंजे व उपसभापती संतोष कांबळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.पंचायत समिती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,या निवड प्रक्रियेनंतर जनसुराज्य पक्षाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.1
- सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील नाझरे गावात शेकडो वर्षांपासून सोंगांच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची सेवा करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जात आहे. पूर्वजांच्या श्रद्धेतून सुरू झालेली ही परंपरा पिढ्यान् पिढ्या ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे. होळी नंतर सलग सात दिवस यात्रेपर्यंत गावात विविध सोंगं घेऊन उत्सव साजरा केला जातो. गावातील खेळगडी वेगवेगळी वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या तालावर गावभर फिरतात. त्यानंतर चौकाचौकात ढोल-ताशांच्या गजरात सोंगांचे सादरीकरण करत ग्रामस्थांचे मनोरंजन केले जाते. या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी खेळगड्यांचा वंश वाढत नसल्याने गावच्या पूर्वजांनी ग्रामदैवत भैरवनाथाला नवस केला होता. त्यानुसार धुलवडीच्या दिवशी होळीची शिळी पोळी घरोघरी मागून ती ओढ्याजवळ जाऊन खाणे तसेच गावातून वेगवेगळ्या सोंगांचे सादरीकरण करत छबिना काढण्याची प्रथा सुरू झाली. हा नवस फेडत आजही ग्रामस्थ सोंगांच्या माध्यमातून भैरवनाथ देवाची सेवा करत ही शेकडो वर्षांची परंपरा जिवंत ठेवत आहेत.1
- ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो. --- **हेडलाईन :** **बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव** **सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज** सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे. भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे. याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1