Shuru
Apke Nagar Ki App…
पिछले १२वर्ष अधिक समय से “अनपढ़ राजा, चौपट प्रजा — जब नेतृत्व में समझ की कमी हो, तो उसका खामियाजा पूरी जनता को भुगतना पड़ता है।”
Shoukat
पिछले १२वर्ष अधिक समय से “अनपढ़ राजा, चौपट प्रजा — जब नेतृत्व में समझ की कमी हो, तो उसका खामियाजा पूरी जनता को भुगतना पड़ता है।”
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by E city news network1
- कोल्हापूर ता.22 : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 25 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या 2 पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील कत्यानी कॉम्प्लेक्स ते नेहरुनगर, लक्ष्मीपूरी रिलायन्स मॉल मागे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरु आहे. महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने 476 नाल्यापैकी 130 लहान नाले व 20 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसलेमळा, साळोखेमळा, सरदेसाई पाणंद, बुध्दविहार, समाज कल्याण ऑफिस अशा 130 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.1
- गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली. “जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे. नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. “सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- पेट्रोल 18, डिझेल 36 रुपयांनी महागणार?1
- ओंकार हत्तीचा दोडामार्ग तालुक्यातील शिरवळ गावात निर्धास्तपणे फिरताना दिसून आला. त्यानंतर शिरवळ गावातील नदीत डुबकी मारत पाण्यात आनंद घेतानाचे हे दृश्य खरोखरच मनमोहक आहे. ओंकार हत्ती जलविहार करत असताना मनसोक्त पाण्यात डुंबताना दिसत आहे. ओंकार ज्या प्रकारे लोळतोय आणि सोंडेने पाणी उडवतोय, त्यावरून तो पाण्यात आनंद घेताना दिसतोय. मात्र ओंकार हत्तीचा लोकवस्तीत वावर वाढल्याने वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.1
- Post by मन्सूर शेख1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- /पणजी: गेल्या रविवारी कुडचडे येथील दोन भावंडांचा बेतुल येथील नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी बबरूमड्डी-केपे येथे कालव्यात बुडून इग्नेशियस शेरी फर्नाडिस (२२, फातोर्डा-मडगाव) आणि त्याचा मित्र हर्षित (२१, मूळ उत्तराखंड) या दोघांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांत या दोघांसह एकूण आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कुशावती नदी तसेच जलस्रोत खात्याच्या कालव्यात रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेकजण आंघोळीसाठी येतात. इग्नेशियस आणि हर्षित हे दोघेही आंघोळीसाठीच बबरूमड्डी-केपे येथील मुख्य कालव्यात आले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचाही कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती केपे पोलिसांनी दिली. कालव्याच्या एका बाजूला दोन मृतदेह तरंगताना आढळल्याचे एका स्थानिकाच्या निदर्शनास आले. त्याने तत्काळ केपे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुडचडे अग्निशामक दलाला पाचारण केले. आई-बहिणीला धक्का: इंग्रजेवाडा-फातोर्डा येथील इग्नेशियस शेरी फर्नांडिस हा होतकरू मुलगा होता. तो माजोर्डा येथील आयटीसी हॉटेलमध्ये कार्यरत होता. त्याचे वडील हयात नसून त्याच्या पश्चात आई व एक बहीण असा परिवार आहे. त्या दोघींची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी समजताच फातोर्डा परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इग्नेशियसच्या मृत्यूमुळे त्याच्या आई व बहिणीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. *जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष* गेल्या रविवारी बेतुल येथे बुडून भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी समुद्र, नद्या तसेच इतर पाणवठ्यांवरील धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी न उतरावे, अशा सूचना नागरिक व पर्यटकांना दिल्या होत्या. तसेच अशा ठिकाणी धोक्याचे फलक लावण्याचे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, संबंधितांकडून या प्रक्रियेला गती मिळालेली नसल्याने नागरिक व पर्यटक अशा ठिकाणी आंघोळीसाठी जात असल्याचे दिसून येते. इग्नेशियस व हर्षित यांचा ज्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला, तेथेही धोक्याचा कोणताही इशारा फलक नव्हता. फक्त पूल कमकुवत असल्याने त्यावरून वाहने नेऊ नयेत, असा फलक होता. उपनिरीक्षक दिगंबर बोद्रे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रविवारी तसेच इतर सुट्टीच्या दिवशी पोलिस अशा भागांत गस्त घालतात. धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते. मात्र, अशा ठिकाणी २४ तास बंदोबस्त ठेवणे शक्य नसते.1