किसान जागृती यात्रेचे रांजणगाव गणपती येथे भव्य व जोरदार स्वागत; शेतकरी सभेत सरकारच्या धोरणांवर टीका कन्याकुमारी ते काश्मीर (७ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२६) या कालावधीत वरिष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ‘किसान जागृती यात्रा’ पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे दाखल झाली. यात्रेचे विविध शेतकरी संघटना, माहिती अधिकार संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना, ग्राहक संघटना, स्वराज्य जनजागृती परिषद, ग्राम स्वराज प्रतिष्ठान, रांजणगाव गणपती ग्रामपंचायत, वारकरी संप्रदाय रांजणगाव गणपती तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी सभेला संबोधित करताना जगजीत सिंह डल्लेवाल यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. देशातील सरकार विविध विषयांवर असत्य माहिती देऊन स्वतःला देशहितैषी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषत: भारत-अमेरिका कराराबाबत चुकीची माहिती पसरवली जात असून, या करारामुळे भारतीय शेतकरी अधिक कमजोर होऊन कर्जबाजारी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याऐवजी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी संघटित संघर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले. सभेत पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या — किमान आधारभूत किंमत (MSP) हमी कायदा लागू करणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ऊसाचा FRP दर वाढवून ६०० रुपये प्रति क्विंटल करणे २०१३ चा जमीन अधिग्रहण कायदा पुन्हा लागू करणे पीक विमा योजनेत व्यापक सुधारणा या मागण्यांसाठी १९ मार्च रोजी दिल्ली येथील रामलीला मैदान येथे होणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. सभेला विविध राज्यांतील शेतकरी नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. पंजाबमधून इंद्रजीत सिंह पन्नीवाल, संदीप सिंह खेरा, हर्षदीप सिंह गिल, सोनी सिंह ओलख; कर्नाटक मधून अभिमन्यू कोहोड, दयानंद पाटील; राजस्थान मधून युवा शेतकरी नेते जगदीश कुमार; मध्य प्रदेश मधून महेश अजनबी यांनी आपली मते मांडली. महाराष्ट्रातून लक्ष्मण वडले (जालना), अनिल घनवट (श्रीगोंदा), शिवाजीनाना नांदखिले (दौंड), सीमा नरोटे (नाशिक), मधुसूदन पाटील महाराज (भामचंद्र डोंगर संघर्ष समिती, देहू), सुवर्णा वायदंडे (सरपंच, रांजणगाव गणपती), गंगाधर देशमुख (ग्रामविकास अधिकारी), शरद पवळे (शिवपानंद शेत रस्ते चळवळ प्रणेते), संदीप कुटे (प्रदेशाध्यक्ष, विकास परिषद कामगार युनियन), चंद्रकांत वारघडे (अध्यक्ष, माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य), विजय शिंदे (अध्यक्ष, पुणे जिल्हा भीममुद्रा), सीमा पवार (अध्यक्ष, सीमाई प्रतिष्ठान), मंगल सासवडे (जिल्हाध्यक्ष, भूमाता ब्रिगेड), आकाश साळुंखे, राजू लांडे (उद्योजक), रामदास बत्ते (प्रगतशील शेतकरी), तुषार कुटे आदींनी शेतकरी प्रश्नांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांनी उपस्थित सर्व शेतकरी नेते, पदाधिकारी व शेतकरी बांधवांचे आभार मानून, आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटित राहण्याचे आवाहन केले.

- शिरूर-आमदाबाद-मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी Shirur Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाबाद (ता. शिरूर) हद्दीत आमदाबाद फाट्यापुढे, माषेरेमळा येथे थोरात तलाठी यांच्या घरासमोर हा अपघात घडला. टोयोटा ग्लांजा (क्र. एमएच १२ एक्सएक्स २४८६) या चारचाकी वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरील वाहनास जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात धीरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धीरज पवळे (वय २१) व सासू गोपिका राजू पवळे (वय ४५, सर्व रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही डोक्याला, हात-पायांना तसेच छाती व मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा विराज धीरज पवळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींना तातडीने शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४ (४), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.1
- अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.1
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ' पिंचिं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली1
- Post by Shrinivas mane4
- Post by Raju Bawdiwale1
- वाघोलीत फटाक्यांसोबत तरुणाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल पुण्याच्या वाघोली परिसरातील बकोरी फाटा येथे एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी एका तरुणाने भर रस्त्यात फटाक्यांची माळ हातात फिरवत ती रस्त्यावर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.वाघोली हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला भाग असून अशा प्रकारची जीवघेणी स्टंटबाजी केल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.फटाक्यांची माळ रस्त्यात फेकल्याने वाहनचालक व पादचारी यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून संबंधित तरुणाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..1