राहुरी येथे स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन बीजबँकेचा गौरव शिरोळ / प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६’ तसेच ‘जागतिक महिला दिना’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात शेडशाळ (ता. शिरोळ) येथील स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशनच्या बीजबँकेचा सन्मान करण्यात आला. स्थानिक देशी बियाण्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.या वेळी बीजमाता शमशादबी पठाण व वैशाली संकपाळ यांनी सन्मान स्वीकारला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन, चेन्नई यांच्या अध्यक्षा तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन, पुणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ञ कृषी व्यवसाय व्यवस्थापन अधिकारी सौ. उज्वला बानखिले, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या वरिष्ठ फेलो डॉ. आर. व्ही. भवानी तसेच भारतीय वन सेवेच्या अधिकारी व उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात बीजबँकेच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येत देशी बियाण्यांचे जतन, संवर्धन आणि शेतकऱ्यांपर्यंत त्याचे वितरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक मान्यवरांनी केले. या उपक्रमामुळे पारंपरिक शेती पद्धती जपण्यास मदत होत असून पर्यावरणपूरक आणि टिकाऊ शेतीला चालना मिळत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.बीजबँकेच्या कार्यात शर्मिला केरीपाळे, आक्काताई मगदूम, शेवंती चौगुले यांच्यासह अनेक महिला सक्रियपणे कार्यरत आहेत. तसेच दत्त साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांचीही उपस्थिती होती.या चळवळीला श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बळ मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे देशी बियाण्यांचे महत्त्व, त्यांचे पर्यावरणीय व आर्थिक फायदे याबाबत महिलांमध्ये जनजागृती झाली आहे. त्यांच्या प्रेरणेनेच बीज बँकेचे कार्य आज अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे.सध्या या बीजबँकेत विविध पिकांचे शंभरहून अधिक देशी वाण सुरक्षितरीत्या जतन करण्यात आले असून राज्यभरातून मागणीनुसार हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत. महिलांच्या पुढाकारातून उभारलेली ही बीज बँक पारंपरिक शेती संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

- हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व कुंभोज / प्रतिनिधी हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या कट्टर समर्थक अश्विनी अनिल बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.तर आळते पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले इंगवले गटाचे समर्थक संतोष कांबळे (शिवसेना शिंदे गट) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी अश्विनी बिरंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.त्यानंतर उपसभापती पदासाठी संतोष कांबळे यांच्या नावावर सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काम पाहिले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,राजू इंगवले,किरण इंगवले, झाकीर भालदार,वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरंजे व उपसभापती संतोष कांबळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.पंचायत समिती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,या निवड प्रक्रियेनंतर जनसुराज्य पक्षाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.1
- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.1
- Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज1
- सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1