Shuru
Apke Nagar Ki App…
वाशिम जिल्ह्यातील मुख्य नदी पैनगंगा नदीच पात्र कोरडे पडले अल्पशा जल साठा
@mayurkartik.official
वाशिम जिल्ह्यातील मुख्य नदी पैनगंगा नदीच पात्र कोरडे पडले अल्पशा जल साठा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by @mayurkartik.official2
- Post by Mahadu santosh pise1
- सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथे आज कानिफनाथ व कानोबा यात्रेची सुरुवात या निमित्ताने विदर्भ आणि मराठवाड्यातून भाविक भक्तगण मंडळी कावड घेऊन खैरी घुमट येथे येत असतात व आपले जे काही नवस असतील ते नवस पूर्ण करतात यामुळे आज खूप मोठी भक्तांची गर्दी दर्शनासाठी झाली आहे यावेळी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी कानिफनाथ व कानोबाची दर्शन घेऊन सर्व सामान्य जनतेला आशीर्वाद व सुख-समृद्धी लाभो यासाठी कानोबाला घातले साकडे1
- मंठा शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित “आनंद नगरी” या उपक्रमाचे उद्घाटन शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना तालुकाप्रमुख उदय बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात लहानग्यांनी सादर केलेल्या कलाकृती, उत्साह व आत्मविश्वासाने उपस्थितांचे मन जिंकले.उदय बोराडे यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, याचा विशेष आनंद आहे,” असे ते म्हणाले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पाटील अवचार, के.जी. राठोड सर, देशमुख सर, भगवानराव गायकवाड, कैलास अवचार, डॉ. सचिन सरकटे,गायकवाड सर, सतीशराव निर्वळ, डॉ. निर्वळ, डॉ. आशिष तिवारी, प्रकाश अण्णा घुले, नाना बोराडे, संदीप बोराडे तसेच मुख्याध्यापक निर्वळ सर यांची उपस्थिती होती.या सुंदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे उदय बोराडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.1
- मेहकर:: आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधिमंडळात मांडला सर्वसामान्यांचा विषय1
- खामगाव: शहरातील शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या डीपी रोडच्या कामात अडथळा ठरणारे पक्के बांधकाम आज नगर परिषद प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. नोटरी ॲड .अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे हे बांधकाम रस्त्याच्या मधात येत असल्याने ही कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध भागात डीपी रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या नियोजित रस्त्याच्या जागेत ॲड.अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे पक्के बांधकाम येत होते. नगर परिषद प्रशासनाने हे बांधकाम अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट करत, संबंधित घरमालकाला ते स्वतःहून काढून घेण्याबाबत पूर्वसूचना व रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्या गेल्याने अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलले. यावेळी. नगर परिषद कांधकामचे म्हस्के , लबडे, निळे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हे दोन खोल्यांचे पक्के बांधकाम पाडण्यात आले.या कारवाईमुळे आता या मार्गावरील रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.3
- गजानन महाराजांच्या चरणी राष्ट्रपती ! पाहा शेगाव भेटीचे विशेष क्षण,1
- खामगाव: खामगाव नगर परिषदेने शहरात लागू केलेल्या प्रचंड कर वाढीविरोधात आता व्यापारी, डॉक्टर आणि वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पालिकेच्या कारभारावर जोरदार टीका करत जनतेची बाजू मांडली. कर वाढ अन्यायकारक असून ती त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. खामगाव नगर परिषदेने मालमत्ता करात केलेली वाढ ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अनेक ठिकाणी ही वाढ ४०० ते ५०० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर शहरातील व्यापारी, डॉक्टर आणि वकील वर्गही संतापलेला आहे. या सर्व संघटनांनी एकत्र येत या करवाढीला विरोध दर्शवला आहे.माजी आमदार सानंदा यांनी स्पष्ट केले की, जनतेवर लादलेला हा कराचा बोजा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. पालिकेने ही वाढ करताना वस्तुस्थितीचा विचार केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. सानंदा यांनी बैठकीत प्रशासनाला धारेवर धरत विचारणा केली की, नियमावली धाब्यावर बसवून ही वाढ कशी केली? त्यांनी या प्रश्नावर कायदेशीर आणि आंदोलनात्मक अशा दोन्ही मार्गांनी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली, जेणेकरून खामगावकरांना या आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. जर ही कर वाढ त्वरित मागे घेतली नाही किंवा त्यात मोठी सवलत दिली नाही, तर आगामी काळात मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा या बैठकीद्वारे देण्यात आला आहे. या बैठकीला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.1