Shuru
Apke Nagar Ki App…
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नारीशक्ती सुवर्ण विजय करा विरोध म्हणजे एक सामान्य महिलेच्या विकासावर गदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नारीशक्ती सुवर्ण विजय करा विरोध म्हणजे एक सामान्य महिलेच्या विकासावर गदा
द महाराष्ट्र न्युज
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नारीशक्ती सुवर्ण विजय करा विरोध म्हणजे एक सामान्य महिलेच्या विकासावर गदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नारीशक्ती सुवर्ण विजय करा विरोध म्हणजे एक सामान्य महिलेच्या विकासावर गदा
More news from Maharashtra and nearby areas
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नारीशक्ती सुवर्ण विजय करा विरोध म्हणजे एक सामान्य महिलेच्या विकासावर गदा1
- परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.1
- माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.1
- आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन करत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनगणनेचे महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जनगणनेसाठी जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न ठेवता जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची हमीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे “माझी जनगणना, माझी जबाबदारी” या भावनेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून, ग्रामीण व शहरी भागात जनगणनेविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.1
- Post by Ramesh Mulgir1
- फटाफट खबरें: 2 मिनट में 20 बड़ी खबरें | 28 अप्रैल 2026 | आज की ताजा खबरें #TodayNews #2Minute20News1
- *महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ॲड.गणेश गोमचाळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी अध्यक्ष यांचा आज मुंबई येथे शिव सेनेत केला जाहीर प्रवेश...*1
- परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.1
- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले यांच्या वाढदिवस श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा करण्यात आला. यावेळी देवस्थानच्या अतिथी कक्षात मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी अमोलराजे भोसले यांचा वाढदिवसानिमीत्त श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र पांघरून व स्वामींचे प्रसाद मिठाई भरवून यथोचित सन्मान करून अमोलराजे भोसले यांना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अमोल राजे भोसले यांनी महेश मालक इंगळे व माझे पितामह तथा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय (महाराज) भोसले व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिवार हे सर्व आपण स्वामी सेवेत आहोत हे आपणासर्वांसाठी खुप अभिमानाची बाब आहे. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे स्वामी सेवेचे हे कार्य व सेवा करण्यास या पुढेही श्री स्वामी समर्थाचे आशिर्वाद नेहमीच आपणा सर्वांच्या पाठीशी असतील असे मनोगत व्यक्त करुन श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व महेश मालक इंगळे यांचे स्नेह पुर्वक ऋणानुबंध व आशिर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत असा विश्वास व्यक्त केला व आज येथे झालेल्या सन्माना प्रित्यर्थ सर्वांचे मन पुर्वक आभार मानले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव यांनी ही अमोलराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.1