कसई–दोडामार्ग नगरपंचायतीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नाचणी पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी २० रुपयांत विमा यांसारख्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दोडामार्ग,१०:* स्वच्छ सर्वेक्षण तसेच माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत कसई–दोडामार्ग नगरपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली. महिलांच्या कलागुणांना व कौशल्यांना वाव मिळावा या हेतूने नाचणीवर आधारित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिलांनी नाचणीपासून विविध पौष्टिक व चविष्ट पदार्थ तयार करून आपली पाककला सादर केली. नाचणीसारख्या पौष्टिक धान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे उपस्थितांनीही विशेष कौतुक केले. याशिवाय कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. महिलांनी नृत्य, गीत व इतर कलात्मक सादरीकरणांद्वारे कार्यक्रमात रंगत आणली. या उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासोबतच परस्पर संवाद व सहभागाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. कार्यक्रमादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून महिलांना केवळ २० रुपयांत विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलादूतांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे महिलांमध्ये प्रेरणा निर्माण झाली. या कार्यक्रमाला कसई–दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, आरोग्य व शिक्षण सभापती संजना म्हावळणकर, नगरसेविका संध्या प्रसादी, क्रांती जाधव, गौरी पार्सेकर, स्वराली गवस, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अंकिता कदम, अॅड. परब मॅडम, तसेच बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी नम्रिता देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नगरपंचायत कर्मचारीवृंद व स्थानिक नागरिकांनीही या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. महिलांच्या आरोग्य, सक्षमीकरण आणि कौशल्यविकासाला चालना देणारा हा उपक्रम ठरल्याने उपस्थितांकडून कार्यक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. भविष्यातही महिलांसाठी अशाच सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीतर्फे यावेळी सांगण्यात आले.

- मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर विकासाबाबत संभ्रम; सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न कोल्हापूर / प्रतिनिधी मुंबई शहराचे “फुप्फुस” मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जागेच्या विकासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला.आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करत या मोठ्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले. मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जमिनीवर विकासकामे सुरू असून या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी अधिवेशनात नमूद केले.या संदर्भात त्यांनी राज्य सरकारने नागरिकांसाठी खुली सुनावणी आयोजित करावी किंवा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या या हरित क्षेत्राचा आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई सेंट्रल पार्क विकसित करताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण होणार नसल्याचा स्पष्ट खुलासा सामंत यांनी केला. पार्कचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नागरिकांना खुला असा करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मोठे हरित क्षेत्र उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या 295 एकर जागेचा विकास कशा स्वरूपात होणार याकडे आता नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागले आहे.1
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रफुल्लित केंद्रामार्फत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे प्रेरणादायी उपक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. तसेच प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांचा ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.2
- Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज1
- सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.1
- सोलापूर : ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहित नव्हते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावरून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहीत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल माहीत झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील नाझरे गावात शेकडो वर्षांपासून सोंगांच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची सेवा करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जात आहे. पूर्वजांच्या श्रद्धेतून सुरू झालेली ही परंपरा पिढ्यान् पिढ्या ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे. होळी नंतर सलग सात दिवस यात्रेपर्यंत गावात विविध सोंगं घेऊन उत्सव साजरा केला जातो. गावातील खेळगडी वेगवेगळी वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या तालावर गावभर फिरतात. त्यानंतर चौकाचौकात ढोल-ताशांच्या गजरात सोंगांचे सादरीकरण करत ग्रामस्थांचे मनोरंजन केले जाते. या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी खेळगड्यांचा वंश वाढत नसल्याने गावच्या पूर्वजांनी ग्रामदैवत भैरवनाथाला नवस केला होता. त्यानुसार धुलवडीच्या दिवशी होळीची शिळी पोळी घरोघरी मागून ती ओढ्याजवळ जाऊन खाणे तसेच गावातून वेगवेगळ्या सोंगांचे सादरीकरण करत छबिना काढण्याची प्रथा सुरू झाली. हा नवस फेडत आजही ग्रामस्थ सोंगांच्या माध्यमातून भैरवनाथ देवाची सेवा करत ही शेकडो वर्षांची परंपरा जिवंत ठेवत आहेत.1
- हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व कुंभोज / प्रतिनिधी हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या कट्टर समर्थक अश्विनी अनिल बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.तर आळते पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले इंगवले गटाचे समर्थक संतोष कांबळे (शिवसेना शिंदे गट) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी अश्विनी बिरंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.त्यानंतर उपसभापती पदासाठी संतोष कांबळे यांच्या नावावर सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काम पाहिले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,राजू इंगवले,किरण इंगवले, झाकीर भालदार,वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरंजे व उपसभापती संतोष कांबळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.पंचायत समिती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,या निवड प्रक्रियेनंतर जनसुराज्य पक्षाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.1