कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदणीचे काम येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदणीचे काम येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पीएम किसान पोर्टलवर नोंद असलेल्या ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १ लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदी अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात या संदर्भात बैठक पार पडली. बैठकीस उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालींधर पांगारे, कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, नामदेव परीट यांच्यासह तालुका कृषी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सहायक निबंधक ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले की, भविष्यात कोणताही कृषी विषयक लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य असणार आहे. कर्जमाफीसारख्या योजनांचा लाभ देताना देखील शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. गावस्तरावर सरपंच, स्थानिक पदाधिकारी आणि सोसायट्यांचे सचिव यांच्या सहकार्याने मोहीम राबवून उर्वरित नोंदी पूर्ण कराव्यात, असे त्यांनी निर्देश दिले.तालुकानिहाय आढावा घेताना मयत शेतकऱ्यांच्या नोंदींबाबतही सूचना देण्यात आल्या. मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद घेणे तसेच संपर्क होत नसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक गाव कृषी सहाय्यकांना वाटप करून दररोज नोंदींचा आढावा घेण्याचेही सांगण्यात आले.ज्या गावांमध्ये ॲग्रीस्टॅक नोंदणीचे काम शंभर टक्के पूर्ण होईल, त्या गावांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही प्रशासनाकडून गौरव केला जाणार आहे. दरम्यान, या कामाचा पुढील आढावा घेण्यासाठी १७ व २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

- हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व कुंभोज / प्रतिनिधी हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या कट्टर समर्थक अश्विनी अनिल बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.तर आळते पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले इंगवले गटाचे समर्थक संतोष कांबळे (शिवसेना शिंदे गट) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी अश्विनी बिरंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.त्यानंतर उपसभापती पदासाठी संतोष कांबळे यांच्या नावावर सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काम पाहिले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,राजू इंगवले,किरण इंगवले, झाकीर भालदार,वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरंजे व उपसभापती संतोष कांबळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.पंचायत समिती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,या निवड प्रक्रियेनंतर जनसुराज्य पक्षाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.1
- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.1
- Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज1
- सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1