येवल्यात शिवजयंतीचा अभूतपूर्व जल्लोष; भव्य मिरवणुकीने शहर झाले 'शिवमय'... येवला येथे गेल्या अनेक वर्षांपासून खंडित झालेली शिवसेनेची तारखेप्रमाणे होणारी शिवजयंती यंदा येवल्यात अत्यंत दिमाखात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार किशोर दराडे यांच्या सूचनेनुसार आयोजित या भव्य सोहळ्यात शिवसेना प्रणित सर्व आघाड्या आणि शहर-तालुक्यातील शिवसैनिकांनी अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन केले. सकाळी साडेआठ वाजता शिवसृष्टी येथे शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी विधानपरिषद आमदार नरेंद्र दराडे, कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते कुणाल दराडे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर मेन रोड, सराफ बाजार मार्गे टिळक मैदान येथे भव्य मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत ढोल-ताशांचा कडकडाट, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शिवसैनिक आणि भगवे फेटे मुख्य आकर्षण ठरले. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होत लाठीकाठी व लेझीमची थरारक प्रात्यक्षिके सादर केली, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशस्वी आयोजनासाठी तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके प, शहरप्रमुख विशाल परदेशी, अमोल शिंदे, सचिन आहेर, महेश काळे, बाळासाहेब खान्देशी यांच्यासह अनेक शिवप्रेमी व पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
येवल्यात शिवजयंतीचा अभूतपूर्व जल्लोष; भव्य मिरवणुकीने शहर झाले 'शिवमय'... येवला येथे गेल्या अनेक वर्षांपासून खंडित झालेली शिवसेनेची तारखेप्रमाणे होणारी शिवजयंती यंदा येवल्यात अत्यंत दिमाखात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार किशोर दराडे यांच्या सूचनेनुसार आयोजित या भव्य सोहळ्यात शिवसेना प्रणित सर्व
आघाड्या आणि शहर-तालुक्यातील शिवसैनिकांनी अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन केले. सकाळी साडेआठ वाजता शिवसृष्टी येथे शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी विधानपरिषद आमदार नरेंद्र दराडे, कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते कुणाल दराडे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज
यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर मेन रोड, सराफ बाजार मार्गे टिळक मैदान येथे भव्य मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत ढोल-ताशांचा कडकडाट, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शिवसैनिक आणि भगवे फेटे मुख्य आकर्षण ठरले. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होत लाठीकाठी व लेझीमची थरारक
प्रात्यक्षिके सादर केली, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशस्वी आयोजनासाठी तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके प, शहरप्रमुख विशाल परदेशी, अमोल शिंदे, सचिन आहेर, महेश काळे, बाळासाहेब खान्देशी यांच्यासह अनेक शिवप्रेमी व पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा कोणा एका समाजाविरुद्ध नसून तो अन्यायाविरुद्धचा लढा होता. त्यांनी अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. शिवजयंतीनिमित्त येवला येथील भव्य 'शिवसृष्टी' प्रकल्पात आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टीतील नयनरम्य कारंजाचे (Fountain) लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसृष्टी प्रकल्प हा केवळ पर्यटन केंद्र नसून भावी पिढीला महाराजांच्या विचारांची प्रेरणा देणारे संस्कार केंद्र असल्याचेही त्यांनी नमूद केले. 'शाहिरी शिवदर्शन'ने उपस्थितांच्या अंगावर शहारे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 'शाहिरी शिवदर्शन'मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या दमदार पोवाड्यांतून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जिवंत केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि वीररसपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. अजितदादांच्या आठवणीने डोळे पाणावले कार्यक्रमादरम्यान शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळ्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन प्रसंगाच्या स्मृती पाहून उपस्थित नागरिक भावूक झाले. यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्याला येवलेकर नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- क्रांती चौकात छत्रपति शिवाजी महाराज यांची जल्लोष मध्ये जयंती साजरी करण्यात आली1
- नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा महाराज स्वतः बग्गीमध्ये बसून जात असताना1
- सार्वजनिक छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सव घरकुल 20261
- शिवजयंतीनिमित्त धुळे येथील कार्यक्रमासाठी निघालेल्या राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला धुळे येथे पुतळा अनावरण सोहळा आयोजित होता. मुंबईहून निघालेल्या विमानातील दोन्ही इंजिन सुरू असताना डॅशबोर्डच्या स्क्रीन अचानक बंद पडल्या. तात्काळ अभियंत्यांना बोलावून तपासणीचे निर्देश देण्यात आले. वेळ न दवडता भुजबळ गाडीद्वारे येवला मार्गे धुळे येथे रवाना झाले. वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य अनर्थ टळल्याची माहिती त्यांनी दिली.1
- Post by Haseeb Khan1
- सिल्लोड शहरामध्ये शिवजयंती निमित्त मुस्लिम समाजाच्या बांधवांकडून मिरवणुकीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. सिल्लोड शहरांमध्ये हिंदू मुस्लिम एकताचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम मावळ्याकडून अभिवादन1
- छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड; रस्त्याने केला प्रवास धुळे विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने सर्व सुरक्षित आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे भुजबळ यांनी धुळ्याहून येवल्याकडे जाण्यासाठी विमान प्रवासाऐवजी रस्त्याने प्रवास करणे पसंत केले. त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी1