Shuru
Apke Nagar Ki App…
इचलकरंजी मध्ये एलपीजी पाईपलाईन मुळे अडचणी येत आहे सगळीकडे उकरून ठेवलेला आहे वाहतुकीस अडचण येत आहे जिकडे तिकडे नळ तुटलेले आहेत पाण्याची सगळीकडे उकरून ठेवल्यामुळे वाहतुकीला जाण्यास अडचणी येत आहेत नळ कनेक्शन तुटत आहेत पाण्याची अडचण चालू आहे घरापासून गाड्या लांब लावून घरी चालत हेच आकार लागत आहे ही कामं जरा फास्ट झाली तर बरं होईल
Amit Mhadev Kadam
इचलकरंजी मध्ये एलपीजी पाईपलाईन मुळे अडचणी येत आहे सगळीकडे उकरून ठेवलेला आहे वाहतुकीस अडचण येत आहे जिकडे तिकडे नळ तुटलेले आहेत पाण्याची सगळीकडे उकरून ठेवल्यामुळे वाहतुकीला जाण्यास अडचणी येत आहेत नळ कनेक्शन तुटत आहेत पाण्याची अडचण चालू आहे घरापासून गाड्या लांब लावून घरी चालत हेच आकार लागत आहे ही कामं जरा फास्ट झाली तर बरं होईल
More news from महाराष्ट्र and nearby areas
- इचलकरंजीहून निघालेल्या वऱ्हाडी टेम्पो ट्रॅव्हलरला सांकेश्वरजवळ भरधाव कारची धडक बसल्याने एकवीस प्रवासी जखमी; परिसरात खळबळ.1
- Post by Amit Mhadev Kadam1
- कोल्हापूर: प्रतिनिधी करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग जोतिबा मंदिरात सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यावर्षी उन्हाचा कडाका प्रचंड असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने विशेष 'थंडावा' देणारे नियोजन करण्यात आले आहे. या उपाययोजनांची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी दिली. उन्हावर मात करण्यासाठी 'थंडावा' नियोजन सचिव शिवराज नाईकवडे यांनी सांगितले की, वाढत्या तापमानाचा विचार करून भाविकांना उन्हापासून वाचवण्यासाठी मंदिर परिसरात विविध ठिकाणी विशेष 'मॅटिंग' टाकण्यात आले आहे. जमिनीची उष्णता कमी करण्यासाठी आणि भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून उष्णतारोधक पांढरे पट्टे मारण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. यासोबतच भाविकांसाठी शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी सोय करण्यात आली आहे. मर्यादित जागेतही सोयीसुविधांवर भर सध्या दोन्ही मंदिरांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या संवर्धन योजनेअंतर्गत आणि पुरातत्व विभागामार्फत जतनाची कामे सुरू आहेत. या कामासाठी क्रेन आणि ट्रॉलीची सातत्याने ये-जा सुरू असते, त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात कायमस्वरूपी मंडप उभारणे तांत्रिकदृष्ट्या शक्य झालेले नाही. मात्र, जिथे जिथे जागा उपलब्ध आहे आणि जिथे तांत्रिक अडचण नाही, अशा सर्व ठिकाणी प्रशासनाने मंडप उभारले आहेत. या मंडपांमध्ये उकाड्यापासून बचाव करण्यासाठी पंखे आणि कुलरची व्यवस्था करण्यात आली असल्याचे नाईकवडे यांनी नमूद केले. प्रशासनाचे भाविकांना आवाहन हवामान खात्याने दिलेल्या उष्णतेच्या लाटेच्या (Heat Wave) इशाऱ्यांनुसार भाविकांनी आपल्या प्रवासाचे आणि दर्शनाचे नियोजन करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीचा विचार करून कडाक्याच्या उन्हाची वेळ टाळून योग्य वेळेतच दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.1
- सातारा जिल्ह्यातील तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. तुषार जोशी यांची बदली झाल्यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक म्हणून श्री. निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारला. नवीन अधिकाऱ्यांच्या आगमनामुळे प्रशासनात सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत होती. पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते स्वागत व निवेदन देण्यासाठी भेटीस आले. मात्र, या भेटीदरम्यान घडलेल्या काही घटनांमुळे नाराजीची भावना निर्माण झाली. काहींना पुष्पगुच्छ देताना, निवेदन देताना किंवा फोटो काढताना संधी देण्यात आली, तर काहींना ती नाकारण्यात आली. या प्रकारामुळे भेदभाव झाल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री. निखिल पिंगळे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “मी संविधानिक पद्धतीने काम करीन, सर्वांशी एकोप्याने वागेन आणि सर्वधर्मसमभावाची भावना जपेन.” मात्र, प्रत्यक्ष कृतीत दिसणारे चित्र वेगळे असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे “कथनापेक्षा कर्तृत्व मोठे असते” ही बाब अधिक ठळकपणे समोर येत आहे. प्रशासनातील जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याकडून सर्वांशी समान वागणूक अपेक्षित असते. सातारा हा स्वाभिमानी आणि सामाजिक दृष्ट्या जागरूक जिल्हा असल्याने अशा प्रकारच्या अनुभवामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे. जर सुरुवातीलाच अशा तक्रारी पुढे येत असतील, तर याचा परिणाम प्रशासन आणि जनतेतील विश्वासावर होऊ शकतो. साताऱ्यातील नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे की, पोलीस अधीक्षकांनी आपल्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, समानता आणि आदर राखावा. कोणताही भेदभाव न करता सर्वांशी सुसंवाद ठेवत काम करणे हीच खरी लोकसेवा आहे. अन्यथा, वाढणारी नाराजी पुढे मोठ्या असंतोषात रूपांतरित होऊ शकते. प्रशासनात पद मोठे असते, पण त्या पदाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी वागणूक तितकीच मोठी असावी लागते—ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे. *आम्ही सातारकर*1
- सातारा. मौजे शेंद्रे येथील प्लाॅट नंबर 15337/अ/२ हा शासनाने सर्व नियम अटी घालून राहण्यासाठी दिला होता मात्र याठिकाणी मात्र आजोबांच्या निधनानंतर आमच्या वाली वारसदारने अधिक पडवळ या इसमाने शासकीय कोणत्या प्रकारची परवानगी न घेता अतिक्रमण केले आहे या बाबत अनेक वेळा दुय्यम निबंधक दोन, तसेच शेंद्रे सर्कल यांच्या कडे पत्रव्यवहार करून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही आशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची संबंधित विभागामार्फत करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मौजे शेंद्रे येथील प्लाॅट नंबर 15337/अ/२ वरील अतिक्रमण आठ दिवसांत काढण्यात यावे अन्यथा पुढील काळात प्रांत अधिकारी सातारा यांचे कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असे निवेदन दिले बहुजन युथ पॅंथरचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा. अंकित वाघमारे यांनी सातारा उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे निवेदन देताना अंकित वाघमारे यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.1
- विक्रम शिंदे /भोर दि.29 खडकी ग्रामपंचायत पोट निवडणुकीत राहुल मोहन बांदल यांनी अमित गोपीनाथ रांजणे यांचा पराभव केला असून सरपंचपदी राहुल बांदल यांनी विजय प्राप्त करत विराजमान झाले आहेत. दि.28 रोजी खडकी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली होती.2
- Post by मन्सूर शेख1
- सगळीकडे उकरून ठेवल्यामुळे वाहतुकीला जाण्यास अडचणी येत आहेत नळ कनेक्शन तुटत आहेत पाण्याची अडचण चालू आहे घरापासून गाड्या लांब लावून घरी चालत हेच आकार लागत आहे ही कामं जरा फास्ट झाली तर बरं होईल1