logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन ! मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा संताप उफाळला जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन ! मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा संताप उफाळला.. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, शेतकरी दिवसभर रखरखत्या उन्हात आणि रात्री अंधारातही पाण्यात उभे राहून निषेध करत आहेत. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, 👉 अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना मोठा हलगर्जीपणा केला 👉 प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वगळले गेले 👉 आणि बोगस लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले यामुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत— ✔️ चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई ✔️ संबंधितांना निलंबित करणे ✔️ आणि सर्व वंचित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत दरम्यान, तहसीलदार रमेश पागोटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या कामामुळे आंदोलनस्थळी पोहोचता आले नाही. युवा शेतकरी संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर घनसावंगी तालुक्यातील सर्व गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील आणि आंदोलन अधिक तीव्र होईल.

12 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
12 hrs ago

जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन ! मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा संताप उफाळला जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन ! मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा संताप उफाळला.. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, शेतकरी दिवसभर रखरखत्या उन्हात आणि रात्री अंधारातही पाण्यात उभे राहून निषेध करत आहेत. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, 👉 अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना मोठा हलगर्जीपणा केला 👉 प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वगळले गेले 👉 आणि बोगस लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले यामुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत— ✔️ चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई ✔️ संबंधितांना निलंबित करणे ✔️ आणि सर्व वंचित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत दरम्यान, तहसीलदार रमेश पागोटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या कामामुळे आंदोलनस्थळी पोहोचता आले नाही. युवा शेतकरी संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर घनसावंगी तालुक्यातील सर्व गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील आणि आंदोलन अधिक तीव्र होईल.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे सुरू असलेले जलसमाधी आंदोलन स्थगित सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केलं होतं मागण्या मान्य; आंदोलन स्थगित दरम्यान, प्रशासनाकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर युवा शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. घनसावंगी चे तहसीलदार रमेश पागोटे व गटविकास अधिकारी प्रदीप यांच्या मार्फत संबंधित पत्र स्वीकारण्यात आले. या निर्णयानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा दिल्या. गुंज परिसरातील या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
    1
    जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे सुरू असलेले जलसमाधी आंदोलन स्थगित
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केलं होतं 
मागण्या मान्य; आंदोलन स्थगित
दरम्यान, प्रशासनाकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर युवा शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. घनसावंगी चे तहसीलदार रमेश पागोटे व गटविकास अधिकारी प्रदीप यांच्या मार्फत संबंधित पत्र स्वीकारण्यात आले.
या निर्णयानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा दिल्या. गुंज परिसरातील या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन.. संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नजर; DYSP अनंत कुलकर्णी
    1
    जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन..
संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नजर; DYSP अनंत कुलकर्णी
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बदनापूर जिल्हा जालना ढासला येथील सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ढासला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. ज्ञान, समता आणि न्याय यांचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महामानवाच्या विचारांनी कार्यक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. गजभार व्ही. पी. यांनी अत्यंत ओघवत्या, आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी शैलीत केले. त्यांच्या नेटक्या व सुसंगत निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एकसंधता लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करत बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. तसेच, विद्यार्थ्यांनी सादर केलेले भीमगीत, गीतगायन आणि नृत्य यांमुळे कार्यक्रमात उत्साहाची रंगत वाढली व उपस्थितांची दाद मिळाली. ज्ञानाचा दीप लावून अंधःकार दूर करणारे, समानतेचा मार्ग दाखवणारे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे महामानव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजही प्रत्येक पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम स्तुत्य ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बचकूल ए. एस. होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धनाड आर. व्ही. उपस्थित होते. यावेळी श्री. भोवते एन. बी. यांनी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. व्यासपीठावर श्री. नलावडे पी. आर., श्री. शिंदे एस. एस., श्री. कदम एस. बी., श्री. गायकवाड एम. डी., श्री. कुऱ्हे एल. व्ही., श्रीमती. भोईटे एस. आर., श्रीमती. दुबे डी. वाय., श्रीमती. दराडे ए. जे. व श्री. गाडेकर एस. डी. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री. नालिंदे एम. एस. यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.
    3
    बदनापूर जिल्हा जालना 
ढासला  येथील सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ढासला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. ज्ञान, समता आणि न्याय यांचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महामानवाच्या विचारांनी कार्यक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. गजभार व्ही. पी. यांनी अत्यंत ओघवत्या, आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी शैलीत केले. त्यांच्या नेटक्या व सुसंगत निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एकसंधता लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करत बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. तसेच, विद्यार्थ्यांनी सादर केलेले भीमगीत, गीतगायन आणि नृत्य यांमुळे कार्यक्रमात उत्साहाची रंगत वाढली व उपस्थितांची दाद मिळाली.
ज्ञानाचा दीप लावून अंधःकार दूर करणारे, समानतेचा मार्ग दाखवणारे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे महामानव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजही प्रत्येक पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम स्तुत्य ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बचकूल ए. एस. होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धनाड आर. व्ही. उपस्थित होते. यावेळी श्री. भोवते एन. बी. यांनी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
व्यासपीठावर श्री. नलावडे पी. आर., श्री. शिंदे एस. एस., श्री. कदम एस. बी., श्री. गायकवाड एम. डी., श्री. कुऱ्हे एल. व्ही., श्रीमती. भोईटे एस. आर., श्रीमती. दुबे डी. वाय., श्रीमती. दराडे ए. जे. व श्री. गाडेकर एस. डी. उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री. नालिंदे एम. एस. यांनी केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.
    user_सय्यद नजाकत
    सय्यद नजाकत
    बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मंठा (जि. जालना) — मंठा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रांवर सोयाबीन, हरभरा व तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब खवणे यांनी तहसीलदार यांना सविस्तर निवेदन सादर करून तात्काळ चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित खरेदी केंद्रांवर हमाली व चाळणीच्या नावाखाली प्रति क्विंटल ₹140/- इतकी रक्कम शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसूल केली जात आहे. प्रत्यक्षात, किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत होणाऱ्या खरेदी प्रक्रियेमध्ये हमाली, चाळणी, साठवणूक यांसारखे सर्व खर्च शासनाकडून संबंधित खरेदी संस्थांना दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे अतिरिक्त रक्कम वसूल करणे हे नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, चाळणी प्रक्रियेदरम्यान खाली पडणारा शेतमाल तसेच धान्य उतरवताना होणारी गळती ही देखील केंद्राकडून अनधिकृतपणे घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत असून त्यांच्या मालकी हक्कावर अतिक्रमण होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. या सर्व प्रकारांमुळे शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या MSP चा पूर्ण लाभ मिळत नसून आर्थिक फसवणूक होत आहे. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उघड उल्लंघन होत असल्याने हा प्रकार भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यांत बसणारा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे सर्व नाफेड खरेदी केंद्रांची तात्काळ संयुक्त चौकशी करावी, शेतकऱ्यांकडून वसूल केलेली ₹140/- प्रति क्विंटल रक्कम परत करावी, चाळणीदरम्यान खाली पडणारा शेतमाल शेतकऱ्यांना परत देण्याबाबत सक्त आदेश द्यावेत, संबंधित केंद्र चालक, ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड व शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
    1
    मंठा (जि. जालना) — मंठा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रांवर सोयाबीन, हरभरा व तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब खवणे यांनी तहसीलदार यांना सविस्तर निवेदन सादर करून तात्काळ चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित खरेदी केंद्रांवर हमाली व चाळणीच्या नावाखाली प्रति क्विंटल ₹140/- इतकी रक्कम शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसूल केली जात आहे. प्रत्यक्षात, किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत होणाऱ्या खरेदी प्रक्रियेमध्ये हमाली, चाळणी, साठवणूक यांसारखे सर्व खर्च शासनाकडून संबंधित खरेदी संस्थांना दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे अतिरिक्त रक्कम वसूल करणे हे नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, चाळणी प्रक्रियेदरम्यान खाली पडणारा शेतमाल तसेच धान्य उतरवताना होणारी गळती ही देखील केंद्राकडून अनधिकृतपणे घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत असून त्यांच्या मालकी हक्कावर अतिक्रमण होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
या सर्व प्रकारांमुळे शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या MSP चा पूर्ण लाभ मिळत नसून आर्थिक फसवणूक होत आहे. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उघड उल्लंघन होत असल्याने हा प्रकार भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यांत बसणारा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे सर्व नाफेड खरेदी केंद्रांची तात्काळ संयुक्त चौकशी करावी, शेतकऱ्यांकडून वसूल केलेली ₹140/- प्रति क्विंटल रक्कम परत करावी, चाळणीदरम्यान खाली पडणारा शेतमाल शेतकऱ्यांना परत देण्याबाबत सक्त आदेश द्यावेत, संबंधित केंद्र चालक, ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड व शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागर यांनी केला दिलखुलास डान्स.
    1
    बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागर यांनी केला दिलखुलास डान्स.
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन ! मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा संताप उफाळला.. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, शेतकरी दिवसभर रखरखत्या उन्हात आणि रात्री अंधारातही पाण्यात उभे राहून निषेध करत आहेत. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, 👉 अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना मोठा हलगर्जीपणा केला 👉 प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वगळले गेले 👉 आणि बोगस लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले यामुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत— ✔️ चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई ✔️ संबंधितांना निलंबित करणे ✔️ आणि सर्व वंचित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत दरम्यान, तहसीलदार रमेश पागोटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या कामामुळे आंदोलनस्थळी पोहोचता आले नाही. युवा शेतकरी संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर घनसावंगी तालुक्यातील सर्व गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील आणि आंदोलन अधिक तीव्र होईल.
    1
    जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन ! मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा संताप उफाळला..
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून,
शेतकरी दिवसभर रखरखत्या उन्हात आणि रात्री अंधारातही पाण्यात उभे राहून निषेध करत आहेत.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की,
👉 अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना मोठा हलगर्जीपणा केला
👉 प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वगळले गेले
👉 आणि बोगस लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले
यामुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत—
✔️ चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई
✔️ संबंधितांना निलंबित करणे
✔️ आणि सर्व वंचित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत
दरम्यान, तहसीलदार रमेश पागोटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या कामामुळे आंदोलनस्थळी पोहोचता आले नाही.
युवा शेतकरी संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की,
जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर घनसावंगी तालुक्यातील सर्व गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील आणि आंदोलन अधिक तीव्र होईल.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.