इसासनी-वागधरा येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा स्फोटक आरोप! माजी सरपंचांची पालकमंत्र्यांकडे धाव इसासनी-वागधरा येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा स्फोटक आरोप! माजी सरपंचांची पालकमंत्र्यांकडे धाव नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इसासनी-वागधरा ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. माजी सरपंच संतोष गोपीचंद कटरे यांनी थेट महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करून उच्चस्तरीय चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, शांती नगर, बुद्ध नगरी व बहुजन नगर परिसरातील खसरा क्रमांक एक, सहा व सात या शासकीय जमिनीवर संघटित पद्धतीने कब्जा करण्यात आला आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रभावशाली व्यक्तींच्या संगनमताने नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन जागा ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही स्थानिक सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची नावेही चर्चेत आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्या भागात सिमेंट रस्ते, पाणी पाईपलाईन व इतर विकासकामे करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. म्हणजेच बेकायदेशीर अतिक्रमणालाच शासकीय सुविधांचा आधार दिला जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच अतिक्रमणासाठी त्या भागातील तलावही बुजविण्यात आला असून पर्यावरणीय हानी झाल्याची बाब समोर आली आहे. माजी सरपंच संतोष कटरे यांनी या प्रकरणाला विरोध केल्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उलट पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कटरे यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगत स्वतःस व कुटुंबास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारक, अधिकारी व निष्क्रिय पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय जमीन मोकळी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या स्फोटक तक्रारीमुळे इसासनी-वागधरा परिसरात खळबळ उडाली असून आता पालकमंत्री बावनकुळे या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- इसासनी-वागधरा येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा स्फोटक आरोप! माजी सरपंचांची पालकमंत्र्यांकडे धाव नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इसासनी-वागधरा ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. माजी सरपंच संतोष गोपीचंद कटरे यांनी थेट महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करून उच्चस्तरीय चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, शांती नगर, बुद्ध नगरी व बहुजन नगर परिसरातील खसरा क्रमांक एक, सहा व सात या शासकीय जमिनीवर संघटित पद्धतीने कब्जा करण्यात आला आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रभावशाली व्यक्तींच्या संगनमताने नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन जागा ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही स्थानिक सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची नावेही चर्चेत आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्या भागात सिमेंट रस्ते, पाणी पाईपलाईन व इतर विकासकामे करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. म्हणजेच बेकायदेशीर अतिक्रमणालाच शासकीय सुविधांचा आधार दिला जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच अतिक्रमणासाठी त्या भागातील तलावही बुजविण्यात आला असून पर्यावरणीय हानी झाल्याची बाब समोर आली आहे. माजी सरपंच संतोष कटरे यांनी या प्रकरणाला विरोध केल्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उलट पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कटरे यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगत स्वतःस व कुटुंबास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारक, अधिकारी व निष्क्रिय पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय जमीन मोकळी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या स्फोटक तक्रारीमुळे इसासनी-वागधरा परिसरात खळबळ उडाली असून आता पालकमंत्री बावनकुळे या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- कर्तृत्वाला मानाचा मुजरा : चंद्रपूरकरांकडून जी.सी. विनय गौडा यांचा 19 एप्रिल ला भव्य नागरी सत्कार नव्या जिल्हाधिकारी वसूमना पंत देखील होणार सन्मानित चंद्रपूर: जिल्ह्याच्या विकासाला नवे आयाम देत प्रशासनाला लोकाभिमुखतेची धार देणारे माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांचे योगदान चंद्रपूरकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांची आणि राबवलेल्या उपक्रमांची आठवण आजही नागरिक अभिमानाने करतात. आ सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास प्रकल्पाना प्रशासकीय पातळीवर त्यांनी केलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळाली आहे. या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार असून, कार्यक्रमाला आ कीर्तिकुमार भांगडिया, आ. देवराव भोंगळे, आ करण देवतळे या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचवेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती वसूमना पंत यांचाही शुभेच्छापर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आगामी कार्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे. दोन्ही कार्यक्षम आणि लोकाभिमुख सनदी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित हा नागरी सत्कार सोहळा चंद्रपूरच्या सामाजिक ऐक्याचे आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.1
- Post by Samachar king digital1
- Post by कु सुषमा डबराल1
- Post by Ammar haider (ezaan)1
- Post by RAJA news1
- मुजफ्फरपुर जीरोमाइल में ऑटो वाला से पर्ची के नाम पर पैसा वसूल रहा है #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur #BiharPolice1
- आ.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार,झरपट नदी पुनरुज्जीवनाला गती! जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून झरपट नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस हालचाली सुरू झाल्या असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नदीतील प्रदूषण, गाळ साचणे आणि पाण्याच्या गुणवत्तेतील घसरण याचा आढावा घेतला. मुनगंटीवार यांनी झरपट नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने डीपीआर तयार करून ‘निरी’ व आयआयटी पवई यांच्या संयुक्त समितीकडून सविस्तर अहवाल मागविण्याची मागणी केली. तसेच नदीचे खोलीकरण, स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासोबतच नदी पुनर्जीवन प्राधिकरण स्थापन होताच इरई व झरपट नद्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.1