सायरन वाजला अन् चोरट्यांची पाचावर धारण! खामगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे आदर्श नगरमधील घरफोडी टळली खामगाव ; शहरातील आदर्श नगर भागात बंद घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. गस्तीवरील पोलीस वाहनाचा सायरन वाजताच तिन्ही चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगर येथील जसवंत सिंग चव्हाण हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून मध्यरात्री तीन चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराचा कडी-कोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून साहित्याची आणि कपड्यांची उथापालथ केली.दरम्यान,त्याच वेळी शहर पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन परिसरात गस्तीवर होते. पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकताच चोरट्यांची धांदल उडाली. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. गस्ती पथकाने तत्काळ संशयितांचा पाठलाग करत परिसरात कसून शोध घेतला, परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले. घटनेची माहिती मिळताच आज सकाळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी डी.बी.पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणातील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात तीन चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास चक्र वेगाने फिरवली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
सायरन वाजला अन् चोरट्यांची पाचावर धारण! खामगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे आदर्श नगरमधील घरफोडी टळली खामगाव ; शहरातील आदर्श नगर भागात बंद घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. गस्तीवरील पोलीस वाहनाचा सायरन वाजताच तिन्ही चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगर येथील जसवंत सिंग चव्हाण हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून मध्यरात्री तीन चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराचा कडी-कोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून साहित्याची आणि कपड्यांची उथापालथ केली.दरम्यान,त्याच वेळी शहर पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन परिसरात गस्तीवर होते. पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकताच चोरट्यांची धांदल उडाली. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. गस्ती पथकाने तत्काळ संशयितांचा पाठलाग करत परिसरात कसून शोध घेतला, परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले. घटनेची माहिती मिळताच आज सकाळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी डी.बी.पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणातील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात तीन चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास चक्र वेगाने फिरवली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
- सायरन वाजला अन् चोरट्यांची पाचावर धारण! खामगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे आदर्श नगरमधील घरफोडी टळली खामगाव ; शहरातील आदर्श नगर भागात बंद घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. गस्तीवरील पोलीस वाहनाचा सायरन वाजताच तिन्ही चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगर येथील जसवंत सिंग चव्हाण हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून मध्यरात्री तीन चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराचा कडी-कोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून साहित्याची आणि कपड्यांची उथापालथ केली.दरम्यान,त्याच वेळी शहर पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन परिसरात गस्तीवर होते. पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकताच चोरट्यांची धांदल उडाली. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. गस्ती पथकाने तत्काळ संशयितांचा पाठलाग करत परिसरात कसून शोध घेतला, परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले. घटनेची माहिती मिळताच आज सकाळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी डी.बी.पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणातील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात तीन चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास चक्र वेगाने फिरवली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.1
- नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या..! नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या! भोटे कोशी नदीच्या महापुराने नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांसह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक आणि नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आणि तातडीचे आवाहन केले आहे. नेपाळमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कोणताही नागरिक, पर्यटक किंवा नातेवाईक अडकले असतील अथवा त्यांच्याशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ अधिकृत संकेतस्थळावर माहिती नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, सध्याचे ठिकाण, हॉटेलचा तपशील, प्रवासाची माहिती आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक अचूक नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन संपर्क : 📞 जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२६८३ 📞 पोलीस नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२४०० 📞 टोल फ्री : १०७७ 📱 मोबाईल : ७०२०४३५९५४ जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधून अधिकृत माध्यमांद्वारे माहिती नोंदविण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे.1
- रस्त्याअभावी सर्पदंशग्रस्त २२ वर्षीय महिलेचा मृत्यू; आदिवासी भागातील सुविधांवर प्रश्नचिन्ह! रस्त्याअभावी सर्पदंशग्रस्त २२ वर्षीय महिलेचा मृत्यू; आदिवासी भागातील सुविधांवर प्रश्नचिन्ह! जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भिंगारा अंतर्गत चाळीस टापरी येथील २२ वर्षीय सादुरी राधेशाम खरात यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. सर्पदंशानंतर उपचारासाठी जळगाव जामोद येथे आणताना गावातील खराब रस्त्यामुळे विलंब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दुर्गम आदिवासी भागात आजही पक्क्या रस्त्यासह पुरेशा आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी खामगाव-अकोला येथे रेफर करण्याची वेळ येते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा फलक लावला असला तरी प्रत्यक्षात रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने सादुरी ताईचा जीव गेला, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.काही वर्षांपूर्वी गोमाल येथे दूषित पाणी व वेळेवर उपचार न मिळाल्याने तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एका तरुण महिलेचा बळी गेल्याने आदिवासी भागातील रस्ते व आरोग्य सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.1
- बुलढाणा राजुर घाटातील दरड कोसळण्याचा धोका मॉर्निंग वॉक व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी व नागरिकासह वाहन चालक धोक्याच्या कक्षेत राजूर घाटात दरड कोसळण्याचा धोका; वाहन चालकासह मॉर्निंग वॉक व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी धोक्याच्या कक्षेत बुलढाणा–राजूर घाटातील हनुमान मंदिर जवळील पहिल्याच वळणावर रस्त्यालगत असलेल्या डोंगराची कड पावसामुळे मोठ्या प्रमाणात सैल झाली असून, डोंगराचा काही भाग व दरड कोसळण्याच्या स्थितीत आला आहे. मातीचे थर व दगड सैल झाल्याने सध्या पावसाळा सुरू असून पावसाचा जोर वाढल्यास अचानक दरड रस्त्यावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.मॉर्निंग वॉक करणारे नागरिक आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी थेट धोक्याच्या परिसरात राजूर घाटातील हा परिसर केवळ वाहनांची वाहतूक असलेला मार्ग नसून, सकाळच्या वेळेत मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी धावण्याच्या सरावासाठी या रनिंग ट्रॅकचा नियमित वापर करतात.4
- शुरू ऐप च्या वृत्ताची दखल मुंडगाव येथील त्या फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती! शुरू ऐप च्या वृत्ताची दखल मुंडगाव येथील त्या फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती! अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील नागरिकांना प्यावे लागते नाली मधील घाणयुक्त दुषित पाणी या कडे मुंडगाव ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला होता.या बाबतीत शुरू ऐप मध्ये वृत्त दि.२६ ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आले होते.त्या वृत्ताची दखल घेत मुंडगाव ग्रामपंचायत ने त्वरित फुटलेली जलवाहिनी जोडण्याचे काम दि.२७ ऑगस्ट रोजी सुरू केले आहे. मुंडगाव लोहारी रोड लगत असलेल्या जनतेला पिण्याचे पाणी 15 दिवसातुन एक वेळ मिळते व सदर मुंडगाव मधील अनेक वस्त्यांना गावातील सांडपाण्याच्या नाल्यानंमधुन पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकण्यात आली आहे.मात्र सदर पाईप लाईन अनेक ठिकाणी लिकेज असुन त्या मधुन हजारों लिटर पाणी जनतेला प्यायला न मिळता वाया जात आहे.तसेच पाणी पुरवठा बंद झाल्यावर पाईप लाईन मध्ये गट्टारा मधिल घाणयुक्त पाणी या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये जाऊन ते पाणी मुंडगाव येथील नागरिकांना प्यायला मिळत होते.मात्र या बाबतीत येथील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शाहु वानखडे यांनी मुंडगाव ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सैय्यद नजाकत यांचे सह सरपंच,उपसरपंच, सदस्य सह अकोट पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनाही फोन वरून या बाबतीत माहिती दिली व विस्तार अधिकारी यांनी सुद्धा आश्वासन दिले की मि ग्रामसेवक यांना फोन वरून सांगतो व याला २ ते ३ महिने ओलांडून गेली तरी सुद्धा या पाईप लाईन ची दुरुस्ती अद्याप ही केली नसल्या बाबतीत शुरू ऐप मध्ये वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायत प्रशासनाने या कडे लक्ष देऊन येथील फुटलेली पाईप लाईन दुरुस्त कली.व या बाबतीत शुरू ऐप चे नागरिकांनी आभार व्यक्त केले.2
- *अकोट मध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न* *हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघाला भव्य जुलूस; ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी दुमदुमले अकोट शहर* अहेमद शेख / अकोट अकोट पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) यांच्या जयंतीच्या पावन प्रसंगी अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस मोठ्या जोश, शिस्त आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला. प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघालेल्या या ऐतिहासिक जुलूसने शहरात धार्मिक श्रद्धा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश दिला. जुलूस दरम्यान ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी संपूर्ण अकोट शहर ईमानी उत्साहाने भारावून गेले. या भव्य जुलूसमध्ये लहान मुले, तरुण, वृद्ध आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जुलूसमध्ये तयार करण्यात आलेली मस्जिद-ए-नबवीच्या हिरव्या घुमटाची सुंदर झांकी भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली. फुलांनी सजवलेल्या विशेष बग्गीमध्ये प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब विराजमान होते. संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. अकोट शहरातील सर्व सुन्नी मशिदींचे इमाम, विविध मदरशांचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो भाविक या मुबारक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी अकोट शहरातील सर्व नगरसेवक, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांचे स्वीय सहायक सैय्यद अहमद यांच्यासह अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील शौकत अली चौकातून सुरू झालेला हा जुलूस आपल्या नियोजित मार्गावरून पूर्ण शिस्तबद्धपणे जात पुन्हा शौकत अली चौकात पोहोचून शांततेत आणि वेळेवर संपन्न झाला. *जुलूस कमिटीतर्फे पोलीस प्रशासनाचा सन्मान* जुलूस शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल जुलूस कमिटीच्या वतीने अकोट पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. निखिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, किशोर जुनघरे पोलीस निरीक्षक, अकोट शहर पोलीस स्टेशन, श्रीधर गुठ्ठे पोलीस निरीक्षक, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, विष्णू बोडखे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी हिम्मत दांडी बीट जमादार, या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांचाही सन्मान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यात जुलूस कमिटीची महत्त्वाची भूमिका राहिली. कमिटीचे अध्यक्ष तौहीद खान कादरी, उपाध्यक्ष फजल सिद्दीकी, गफूर शाह, मोहम्मद हुसेन , सैय्यद अशफाक अली, सैय्यद खालिद अली, अब्दुल वाहिद रिझवी, साई सिकंदर, वसीम शाह, शेख रझिक, अजहर खान यांच्यासह सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार सैय्यद मजहर अली यांनी केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे ईद-ए-मिलादुन्नबीचा हा जुलूस अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला. *अकोट मध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न* *हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघाला भव्य जुलूस; ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी दुमदुमले अकोट शहर* अहेमद शेख / अकोट अकोट पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) यांच्या जयंतीच्या पावन प्रसंगी अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस मोठ्या जोश, शिस्त आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला. प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघालेल्या या ऐतिहासिक जुलूसने शहरात धार्मिक श्रद्धा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश दिला. जुलूस दरम्यान ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी संपूर्ण अकोट शहर ईमानी उत्साहाने भारावून गेले. या भव्य जुलूसमध्ये लहान मुले, तरुण, वृद्ध आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जुलूसमध्ये तयार करण्यात आलेली मस्जिद-ए-नबवीच्या हिरव्या घुमटाची सुंदर झांकी भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली. फुलांनी सजवलेल्या विशेष बग्गीमध्ये प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब विराजमान होते. संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. अकोट शहरातील सर्व सुन्नी मशिदींचे इमाम, विविध मदरशांचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो भाविक या मुबारक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी अकोट शहरातील सर्व नगरसेवक, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांचे स्वीय सहायक सैय्यद अहमद यांच्यासह अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील शौकत अली चौकातून सुरू झालेला हा जुलूस आपल्या नियोजित मार्गावरून पूर्ण शिस्तबद्धपणे जात पुन्हा शौकत अली चौकात पोहोचून शांततेत आणि वेळेवर संपन्न झाला. *जुलूस कमिटीतर्फे पोलीस प्रशासनाचा सन्मान* जुलूस शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल जुलूस कमिटीच्या वतीने अकोट पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. निखिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, किशोर जुनघरे पोलीस निरीक्षक, अकोट शहर पोलीस स्टेशन, श्रीधर गुठ्ठे पोलीस निरीक्षक, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, विष्णू बोडखे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी हिम्मत दांडी बीट जमादार, या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांचाही सन्मान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यात जुलूस कमिटीची महत्त्वाची भूमिका राहिली. कमिटीचे अध्यक्ष तौहीद खान कादरी, उपाध्यक्ष फजल सिद्दीकी, गफूर शाह, मोहम्मद हुसेन , सैय्यद अशफाक अली, सैय्यद खालिद अली, अब्दुल वाहिद रिझवी, साई सिकंदर, वसीम शाह, शेख रझिक, अजहर खान यांच्यासह सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार सैय्यद मजहर अली यांनी केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे ईद-ए-मिलादुन्नबीचा हा जुलूस अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.2
- बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..4
- Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप (गजानन राऊत बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...4