मुंबई. शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून तळागाळातील महिलांपर्यंत योजना पोहोचवा; संघटन अधिक बळकट करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून तळागाळातील महिलांपर्यंत योजना पोहोचवा; संघटन अधिक बळकट करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *महिला नगरसेविका व पदाधिकारी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न; जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी कार्यक्रमाच्या मालिकेचे डॅा.नीलम गोऱ्हे तर्फे नियोजन* मुंबई, दि. २७ : शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महिला आघाडीच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ आणि ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती तळागाळातील गरजू महिलांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनांमुळे अनेक गरजू नागरिकांना थेट मदत मिळू शकते, त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रिय राहून या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच, कार्य करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेत ‘आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ अंतर्गत नागरिकांच्या तक्रारी व अर्जांचे निवारण करण्याची पद्धत सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आली. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’अंतर्गत वैद्यकीय मदतीसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, महिला संघटन अधिक बळकट करून विभागातील सामाजिक कार्यांना गती देण्यासाठी आवश्यक दिशा देण्यात आली. कार्यशाळेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाबत श्री. रामहरी राऊत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मोफत आरोग्य सेवा, कॅशलेस योजना तसेच महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या उपचार सुविधांबाबतही त्यांनी माहिती दिली. यासोबतच, या योजनांमध्ये कुठलीही अडचण आल्यास ओम पालकर (८६५७०६१५१५), रवी ननावरे (८९०७७७६५५०) आणि रामहरी राऊत (८९०७७७६००४) या क्रमांकांवर संपर्क साधून शिवसेनेतर्फे मदत व माहिती मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील विविध हॉस्पिटलमध्ये वेळ न मिळाल्यास रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी विशेष समन्वय व्यवस्था उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष आणि एस.आय.आर. (Special Intensive Revision) प्रक्रियेबाबत श्री. शेखर परदेशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एस.आय.आर. म्हणजे मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन असून, BLO मार्फत केलेल्या पडताळणीद्वारे मतदार यादी अचूक व त्रुटीमुक्त ठेवण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ECI NET ॲपविषयीही माहिती दिली. या कार्यशाळेला शिवसेना उपनेत्या कला शिंदे, सुशीबेन शहा, कांदिवलीच्या नगरसेविका दीक्षा कारकर, ॲडव्होकेट संगीता चव्हाण (महिला संपर्कप्रमुख, बीड-धाराशिव), बोरिवलीच्या नगरसेविका संध्या दोषी, चाकणच्या नगराध्यक्ष, अंधेरी पश्चिमच्या माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे तसेच मागाठाणे विभाग प्रमुख मीना पानमंद उपस्थित होत्या. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. याशिवाय बीड, सांगली जिल्ह्यांसह विविध ठिकाणांतील उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख तसेच मुंबईतील विधानसभा प्रमुख, विभाग प्रमुख आणि महिला संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनिता मोरे (संपर्कप्रमुख, सांगली) यांनी केले. ही कार्यशाळा महिला आघाडीच्या कार्याला नवी दिशा देणारी ठरली असून, जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केला.

- सामाजिक कार्यकर्ते संदिप देशमुख यांनी डाॅक्टर झाकिर हूसेन चौक येथे झालेली वाहणांची गर्दी बाजूला सारली...1
- राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर (पोक्रा) अंतर्गत खरीपपूर्व तयारीला गती देण्यात आली आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध स्तरावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत गावागावात प्रात्यक्षिके, प्रशिक्षण कार्यक्रम व शेतशाळा आयोजित करून मृद व जलसंधारण, पीक नियोजन, तसेच सुधारित बियाण्यांची निवड याबाबत माहिती दिली जात आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून पिकांची निवड, बीजप्रक्रिया, सेंद्रिय व संतुलित खतांचा वापर, आणि कीड-रोग व्यवस्थापन याबाबतही शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे पाण्याची उपलब्धता वाढवण्यावरही भर दिला जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोक्रा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची माहिती मिळत असून उत्पादन वाढीसह जोखीम कमी करण्यास मदत होत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी खरीपपूर्व तयारी वेळेत पूर्ण करून प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. — टेक्नॉलॉजी को-ऑर्डिनेटर:1
- जायकवाडी कालव्यात तात्काळ पाणी सोडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यकारी अभियंतांची खुर्ची केली जप्त?1
- जायकवाडी धरण येथून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या दाबावरून परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. धरणातून बाराशे क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याचा दावा असताना, तेच पाणी परभणीपर्यंत येईपर्यंत केवळ सुमारे आठशे क्युसेक्स दाबाने पोहोचत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे कॅनॉलमधील पाण्याचा वेग कमी झाला असून, शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी रब्बी हंगाम जवळपास हातातून गेला असून, आता उसासारखी उभी पिकेही करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या “दोन” कार्यालयात धडक दिली. अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर आंदोलन तीव्र होत गेले आणि संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची खुर्चीच उचलून नेली. “जोपर्यंत कॅनॉलमधून योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत ही खुर्ची परत दिली जाणार नाही,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या घटनेतून प्रशासनाविषयीचा रोष स्पष्टपणे समोर आला असून, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.1
- वार्ड क्रमांक 18 में सड़क और नाली निर्माण कार्य का उद्घाटन समारोह उत्साह के साथ संपन्न1
- अंबडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना ‘मोफत रेती’ वाटप सुरू; २१५ जणांना प्रारंभी लाभ अंबड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ८ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार अंबड तालुक्यातील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत रेती वाटपाची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या देखरेखीखाली ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. अंबड तालुक्यात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल यंत्रणा कार्यरत आहे. १०७५ ब्रास रेती उपलब्ध; २१५ लाभार्थ्यांची निवड शासनाच्या नियमानुसार रेती घाटातून मिळणाऱ्या एकूण रेतीपैकी १० टक्के रेती घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येते. सध्या तालुक्यात १०७५ ब्रास रेती उपलब्ध झाली असून, पहिल्या टप्प्यात २१५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे. पुढील काळात रेती उपलब्धतेनुसार उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी? लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात अर्ज न करता ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करायचा आहे. ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त पाहणीनंतर अहवाल तहसील कार्यालयात पाठवला जाईल. त्यानंतर माहिती ऑनलाईन अपलोड करून आधार क्रमांक व लिंक मोबाईलद्वारे पडताळणी केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला ई-टीपीद्वारे ‘झिरो रॉयल्टी पास’ मिळेल आणि तो संबंधित रेती घाटावरून मोफत रेती उचलू शकेल. महत्त्वाच्या अटी केवळ ५ ब्रास रेती मोफत; वाहतूक खर्च लाभार्थ्याने करायचा पूर्ण झालेल्या घरकुलांना लाभ मिळणार नाही स्थानिक नद्यांमधील रेती स्थानिक वापरासाठीच राखीव प्रशासनाचे आवाहन अंबड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले घरकुल पूर्ण करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.1
- राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी गटशेती (समूह शेती) हा प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. लहान-लहान तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीमुळे उत्पादन खर्च वाढत असताना, शेतकरी एकत्र येऊन शेती करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे मोठ्या क्षेत्रावर पीक घेणे शक्य होत असून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुलभ होत आहे. गटशेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समन्वय वाढतो, उत्पादन खर्च कमी होतो आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होते. ठिबक सिंचन, ड्रोन तंत्रज्ञान, तसेच यांत्रिकीकरण यांचा वापर सामूहिक पद्धतीने करता येत असल्याने उत्पादनात वाढ होत आहे. दरम्यान, राज्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर दिला जात असून AI, ड्रोन, नैसर्गिक शेती आणि अन्नप्रक्रिया यांसारख्या नव्या संकल्पनांना चालना दिली जात आहे. अशा उपक्रमांमुळे गटशेती अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, भविष्यात शेती केवळ पारंपरिक न राहता तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय बनत असून गटशेती हीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची किल्ली ठरणार आहे.1
- जालना - गोंदेगाव खून प्रकरण उघड: ८ तासांत दोन आरोपी जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई; आरोपींकडून मोटारसायकल व मोबाईल जप्त.. जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ८ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1