गटशेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल; आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पन्न वाढीची संधी राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी गटशेती (समूह शेती) हा प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. लहान-लहान तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीमुळे उत्पादन खर्च वाढत असताना, शेतकरी एकत्र येऊन शेती करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे मोठ्या क्षेत्रावर पीक घेणे शक्य होत असून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुलभ होत आहे. गटशेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समन्वय वाढतो, उत्पादन खर्च कमी होतो आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होते. ठिबक सिंचन, ड्रोन तंत्रज्ञान, तसेच यांत्रिकीकरण यांचा वापर सामूहिक पद्धतीने करता येत असल्याने उत्पादनात वाढ होत आहे. दरम्यान, राज्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर दिला जात असून AI, ड्रोन, नैसर्गिक शेती आणि अन्नप्रक्रिया यांसारख्या नव्या संकल्पनांना चालना दिली जात आहे. अशा उपक्रमांमुळे गटशेती अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, भविष्यात शेती केवळ पारंपरिक न राहता तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय बनत असून गटशेती हीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची किल्ली ठरणार आहे.

- मेघा इंजीनियरिंग ची खोटी आश्वासने गावकऱ्यांचा संताप ... पेण तालुक्यातील मुंगोशी बेलावडे ग्रामपंचायत या हद्दीमध्ये मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रा प्रा लिमिटेड यांनी सुमारे 300 मीटर खोल जल बोगदा करण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील असणारे सर्व पाण्याचे झरे या बोगद्यामध्ये आल्याने सर्व विहिरी व पाणी आटलेला आहे त्या टनल मधलं पाणी हे नाल्यामध्ये सोडल्याने संपूर्ण शेतीचे सुद्धा नुकसान झालं आहे पाण्याची क्षारता जास्त असल्याने तेथील शेतकऱ्यांना मोठा घटका बसला आहे गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही टँकर ने पाणी गावाला पोचवलं जातंय आतून टर्नलच्या निघालेल्या मटेरियल मुळे अनेक जीवजंतूचा नुकसान झाला आहे भाजपाला लावू शकत नाही शेतीचं उत्पन्न घेऊ शकत नाही या भागामध्ये या टर्नल मुले अनेकांचे नुकसान झालेला आहे याकरता येणाऱ्या दोन दिवसात प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आलेले आहे त्यामध्ये जर मार्ग निघाला नाही त्याला समस्त गावकरी 12 आदिवासी वाड्या व अनेक महसूल गावे मिळून या मेघा इंजीनियरिंग पूर्ण काम बंद करणार असा इशारा दिला आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड1
- लातूर-अहमदपूर माजी मंत्री विनायकराव पाटील शदर पवारांना धक्का देत अनेक कार्यकर्त्यांसह केला शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश1
- जालना - गोंदेगाव खून प्रकरण उघड: ८ तासांत दोन आरोपी जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई; आरोपींकडून मोटारसायकल व मोबाईल जप्त.. जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ८ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे1
- जायकवाडी कालव्यात तात्काळ पाणी सोडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यकारी अभियंतांची खुर्ची केली जप्त?1
- जायकवाडी धरण येथून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या दाबावरून परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. धरणातून बाराशे क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याचा दावा असताना, तेच पाणी परभणीपर्यंत येईपर्यंत केवळ सुमारे आठशे क्युसेक्स दाबाने पोहोचत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे कॅनॉलमधील पाण्याचा वेग कमी झाला असून, शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी रब्बी हंगाम जवळपास हातातून गेला असून, आता उसासारखी उभी पिकेही करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या “दोन” कार्यालयात धडक दिली. अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर आंदोलन तीव्र होत गेले आणि संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची खुर्चीच उचलून नेली. “जोपर्यंत कॅनॉलमधून योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत ही खुर्ची परत दिली जाणार नाही,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या घटनेतून प्रशासनाविषयीचा रोष स्पष्टपणे समोर आला असून, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन1
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा काहीही इतिहास बरळणारा वाचाळखोर यांना पोकळ बांबूचे फटके देऊन झोडपून काढल्याशिवाय ही नालायक सुधरणार नाहीत मग ते कोणीही असो 😡 आमच्या दैवताच्या नावाने तुमच्या राजकीय पोळ्या भाजायचं बंद करा याचे परिणाम काय होतील याचा विचार देखील करू शकणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्हाला कधी कधी कुठ कस पळवून हाणतील सांगता देखील येणार नाही.1
- सामाजिक कार्यकर्ते संदिप देशमुख यांनी डाॅक्टर झाकिर हूसेन चौक येथे झालेली वाहणांची गर्दी बाजूला सारली...1
- श्री क्षेत्र रामसगाव येथे दुर्दैवी घटना: गोदावरी नदीत बुडून एकाचा मृत्यू जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामसगाव येथे आज सोमवारी (२७ एप्रिल) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. गोदावरी नदीत उडी घेतल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला.1