विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या सामाजिक उद्देशाने आधारवड फाउंडेशनच्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालयातील २४ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आणि इतर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासाठी प्रेरणादायी वातावरण तयार झाले आहे. या प्रसंगी आधारवड फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन चव्हाण, कोषाध्यक्ष दत्ता कोरडे, सदस्य भानुदास टिपरकर तसेच लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिराजदार, राजकुमार राऊत सर, बालाजी ढोबळे सर, घुगे सर, आळणे सर व मोरे सर उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करून चांगले शिक्षण घेण्याचा आणि समाजात आदर्श नागरिक बनण्याचा संदेश दिला. या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी स्वागत करत संस्थेचे आभार मानले, तर फाउंडेशनने भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे शिक्षणाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.

- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या सामाजिक उद्देशाने आधारवड फाउंडेशनच्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालयातील २४ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आणि इतर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासाठी प्रेरणादायी वातावरण तयार झाले आहे. या प्रसंगी आधारवड फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन चव्हाण, कोषाध्यक्ष दत्ता कोरडे, सदस्य भानुदास टिपरकर तसेच लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिराजदार, राजकुमार राऊत सर, बालाजी ढोबळे सर, घुगे सर, आळणे सर व मोरे सर उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करून चांगले शिक्षण घेण्याचा आणि समाजात आदर्श नागरिक बनण्याचा संदेश दिला. या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी स्वागत करत संस्थेचे आभार मानले, तर फाउंडेशनने भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे शिक्षणाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयावर दादा राव गवारे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला.1
- जालना येथे येत्या 27 जुलै रोजी 'गो सन्मान महारॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली 'बडे सडक' येथील राम मंदिरापासून निघणार आहे. या महारॅलीमध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने आणि भरभरून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी महाराज यांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यात शनिवारी पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडले आहे. आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या श्री आनंदी स्वामींच्या या पालखी सोहळ्याचे मुस्लिम बांधवांकडून अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील बाजार चौकी परिसरात मुस्लिम बांधवांनी पालखीचे स्वागत करत मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन भावूक सत्कार केला. पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे जालन्यातील गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून चालत आलेली सामाजिक सलोख्याची आणि बंधुभावाची परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात कायम राहिली आहे.1
- धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर जालन्यामध्ये VBA म्हणजेच वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरात फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.1
- जनआंदोलनाच्या परिणामामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून हा संघर्षाचा विजय असल्याचे रवि सोनकांबळे यांनी म्हटले आहे. जनआंदोलनाचा झालेला हा परिणाम म्हणजेच चाललेल्या संघर्षाला मिळालेले मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.1
- हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंगोलीचे भूमिपुत्र अभिजीत दिपके यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली. या संघर्षामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. गोरेगाव येथे झालेल्या या आनंदोत्सवात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी "हा आंदोलनाचा विजय आहे, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे" अशा जोरदार घोषणा देत जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या संघर्षाला हे यश समर्पित असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान गजानन कावरखे, नामदेव पतंगे, राहुल कावरखे, अमोल जाधव, अमोल एकशिंगे, रामेश्वर कावरखे, अलीम भाई आणि कोंडबाराव खटके यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. युवा शक्तीपुढे शेवटी मोदी सरकारला झुकावे लागले असून याच युवा शक्तीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.1