सुनेत्राताई पवार यांच्याबाबतच्या वक्तव्याचा वडवणीत राष्ट्रवादीकडून निषेध तहसील कार्यालयासमोर निदर्शने; महिलांचा सन्मान राखण्याची मागणी वडवणी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या आदेशानुसार वडवणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. राजकारणामध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, राजकीय मतभेद व्यक्त करताना महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि सभ्य भाषेची मर्यादा कायम राखली पाहिजे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी वक्तव्य करताना राजकीय संस्कार आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवत लोकशाही व शांततेच्या मार्गाने प्रशासनासमोर आपली भूमिका मांडण्यात आली. यावेळी वडवणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शेषराव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बजरंग सांबळे, संतोष पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचा सन्मान हीच लोकशाहीची खरी ओळख असून, राजकीय मतभेद असले तरी सभ्यतेची मर्यादा जपली गेली पाहिजे, असा सूर यावेळी आंदोलनातून उमटला.तालुकाध्यक्ष विकास मुंडे, संदीपान आप्पा खळगे, तालुका उपाध्यक्ष महादेवराव सावंत, आबेद भाई शेख, संजय अंबुरे, , दिलीपराव मस्करे, राजेभाऊ लंगे, भैय्या वाघमोडे, सुजित वाघमारे, अशोकराव टिपरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

- अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर नायगाव येथे पुलावर जाग जाग्यावर खड्डे शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर नायगाव ती ब्राह्मणी येथील पुलावर काही ठिकाणी जाग जागेवर खड्डे व गजबाहेर निघालेले आहेत तरी प्रशासन दुर्लक्ष करते याच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो1
- रथयात्रा विशेष : कर्जतच्या बसस्थानकातील पाळण्यांसाठी मोठी ऑफर1
- ‘धाकटी पंढरी’ झाली कुस्तीमय!; सिकंदर शेखसह दिग्गज पैलवानांनी गाजवले मैदान1
- सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई,अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड प्रतिनिधी : ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने सिल्लोड एसटी बस डेपोतील M/s S.T. Canteen Upahar Gruh येथे धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींची कमतरता अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. फरशीपासून स्वयंपाकघरापर्यंत अस्वच्छता कॅन्टीनच्या तळमजल्यावरील फरशीवर धूळ, माती, वेष्टने आणि पॅकेजिंगचा कचरा आढळला. भिंतींचे पापुद्रे निघालेले असून रंग उडालेला व भिंती काळवंडलेल्या होत्या. खिडक्यांना कीटक व उंदीर रोखण्यासाठी आवश्यक वायर मेशही बसवलेली नव्हती. भांडी घासण्याची जागाही अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले. FSSAI परवाना फलक आणि पाणी तपासणी अहवालही नाही कॅन्टीनमध्ये FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला आढळला नाही. तसेच पाणी तपासणीचा अद्ययावत अहवाल उपलब्ध नव्हता. बेसन, तेल व काही किराणा मालाच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध असल्या तरी चिप्स, नमकीन आदी खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड सादर करता आले नाही. ‘मयूर ब्रँड’ चणाडाळीचा साठा आणि त्याचे खरेदी रेकॉर्डही तपासणीवेळी उपलब्ध नव्हते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही; कॅन्टीनचा परवाना निलंबित अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन व हातमोजेही नव्हते. हात धुण्याची तसेच कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा आढळली नाही. साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्डही उपलब्ध नव्हते. उघड्या कचराकुंड्या, अयोग्य सांडपाणी वाहिन्या आणि अस्वच्छ परिसरामुळे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सदर कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित (Suspend Forthwith) केला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे.1
- व्यापारीकडून शेतकऱ्याला शिवीगाळीचा आरोप; गंगापूर बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी गर्दी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत दाखल झाले. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.1
- फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सोसाव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणीच्या काळातील इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्या काळातील सामाजिक परिणाम तसेच संघर्षातून मिळणारे धडे विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘हर घर तिरंगा’ अभियान, ‘वंदे मातरम्’ विषयावरील प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’ तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याचे प्रदर्शन भरवून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. या उपक्रमांमधून फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करताना देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावना अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे1
- सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ची धडक कारवाई; परवाना निलंबित सिल्लोड येथील एसटी बस डेपोमधील कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. कॅन्टीनमध्ये अपूर्ण खरेदी नोंदी, पाणी तपासणी अहवालाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न झाल्याचेही निदर्शनास आले. या त्रुटींमुळे कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.1
- झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका *छत्रपती संभाजीनगर* अभिजीत दिपके बाईट*झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात असताना पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात नाही, मात्र विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरच लाठीचार्ज आणि गॅसचा वापर केला जातो, हे अत्यंत वेदनादायी असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. झारखंडमधील आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे देवेंद्र महातो यांच्याशी आपण संवाद साधला असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, झारखंडच्या आंदोलनात अभिजीत दिपके स्वतः सहभागी का झाले नाहीत, असा सवाल केला असता, आंदोलनाचं चांगलं नेतृत्व देवेंद्र महातो करत असून त्यांचं नेतृत्व पुढे यावं, यासाठी CJPकडून सहकार्य केलं जात असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलं. आंदोलन हायजॅक करण्याचा आमचा उद्देश नसून, आमची टीम तिथे पाठवण्यात आली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे, 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी CJPकडून नवं धोरण स्वीकारलं जाणार असल्याची घोषणाही अभिजीत दिपके यांनी केली आहे. स्वातंत्र्याला 80 वर्षे होत असतानाही ग्रामीण भागातील अनेक शाळांची अवस्था खराब आहे. मोठ्या इमारती, संसद भवन आणि लोकप्रतिनिधींची घरं उभी राहिली, मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि मजुरांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला हिंगोलीतील आपल्या गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. त्यासोबतच खासगी शाळांमधील कथित लूट थांबवण्यासाठी कॅप लागला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.1