राहुरी फॅक्टरीत थरारक घटना – मोठी दुर्घटना टळली राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसाद राहुरी फॅक्टरीत थरारक घटना – मोठी दुर्घटना टळली राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसाद नगर येथे चर्चसमोर आज एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरून जात असलेल्या चालत्या कंटेनरमुळे अचानक वीजतारा तुटल्या आणि विजेचा पोल थेट घरावर कोसळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अपघातामुळे परिसरातील सर्व वीज पुरवठा खंडित झाला आहे अपघातात रस्त्यावर उभी असलेली बजाज बॉक्सर मोटारसायकल मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदर परिसर हा नेहमीच वर्दळीचा असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांनी तात्काळ प्रशासनाने लक्ष देऊन अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरची उंची अधिक असल्यामुळे वीजतारा अडकून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे.

- मंगल संपत पोटघनश्रीगोंदा, अहमदनगर, महाराष्ट्र🙏on 16 April
- श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!1
- संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन रवी जाधव सर मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद shaha social media bidkin1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- सिल्लोड येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निवेदन सिल्लोड, ता. — अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लहुजी क्रांती सेना, सिल्लोड तालुका तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सिल्लोड तहसीलचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीतील घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच आरक्षणाचा लाभ सर्व स्तरांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित लहुजी क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे, मराठवाडा अध्यक्ष सखाराम अहिरे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाबुराव अहिरे युवा जिल्हाध्यक्ष फकीरचंद तांबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव अहिरे, युवा तालुकाध्यक्ष किशोर भिसे, शिवदास दणके , विष्णू साळवे ज्ञानेश्वर अहिरे किसन सौदागर संजय मोरे, राजू कांबळे,संजय गायकवाड सोनू सुरडकर संतोष कांबळे आनंद गायकवाड, रघुनाथ अहिरे, संजय निकाळजे, गणपत गायकवाड सुभाष निकाळजे तसेच लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.1
- गंगापूर-वैजापूर रोडवरील शिंगी पाटी येथे दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात शंकर विनायकराव वाघ (वय 30, रा. शिंगी, ता. गंगापूर) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीस उपचारासाठी गंगापूर घाटी येथे दाखल केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या जखमीवर उपचार सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.1
- Post by कर्जत लाईव्ह1
- jas to jasto logon per potwa1
- शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.1