तळोदा तालुक्यातील आमलाड येथे विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात पालखी दिंडी, वृक्ष दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात व विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे फलक हातात धरून "झाडे लावा, झाडे जगवा" आणि "पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा" अशा घोषणा देत वृक्ष दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीनंतर गावातील विविध ठिकाणांसह देव मोगरा माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. धार्मिक परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश देणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक एन. व्ही. मराठे, सांस्कृतिक समितीचे ए. ए. शेंडे, आर. बी. कुवर, एस. ए. सूर्यवंशी, बी. बी. शेंडे, डी. एन. गिरासे, आर. के. पाडवी, वाय. एस. मासुळे, श्रीमती सुनीता शिंदे, श्रीमती आशा जाधव, श्रीमती शीतल ठाकरे, शिक्षकेतर कर्मचारी लखन पाडवी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
तळोदा तालुक्यातील आमलाड येथे विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात पालखी दिंडी, वृक्ष दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात व विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे फलक हातात धरून "झाडे लावा, झाडे जगवा" आणि "पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा" अशा घोषणा देत वृक्ष दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीनंतर गावातील विविध ठिकाणांसह देव मोगरा माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. धार्मिक परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश देणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक एन. व्ही. मराठे, सांस्कृतिक समितीचे ए. ए. शेंडे, आर. बी. कुवर, एस. ए. सूर्यवंशी, बी. बी. शेंडे, डी. एन. गिरासे, आर. के. पाडवी, वाय. एस. मासुळे, श्रीमती सुनीता शिंदे, श्रीमती आशा जाधव, श्रीमती शीतल ठाकरे, शिक्षकेतर कर्मचारी लखन पाडवी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
- तळोदा तालुक्यातील आमलाड येथे विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात पालखी दिंडी, वृक्ष दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात व विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे फलक हातात धरून "झाडे लावा, झाडे जगवा" आणि "पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा" अशा घोषणा देत वृक्ष दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीनंतर गावातील विविध ठिकाणांसह देव मोगरा माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. धार्मिक परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश देणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक एन. व्ही. मराठे, सांस्कृतिक समितीचे ए. ए. शेंडे, आर. बी. कुवर, एस. ए. सूर्यवंशी, बी. बी. शेंडे, डी. एन. गिरासे, आर. के. पाडवी, वाय. एस. मासुळे, श्रीमती सुनीता शिंदे, श्रीमती आशा जाधव, श्रीमती शीतल ठाकरे, शिक्षकेतर कर्मचारी लखन पाडवी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.1
- धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फुटी भव्य पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. शिवरायांच्या या भव्य पुतळ्याच्या स्थापनेमुळे संपूर्ण परिसरातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- मालेगावमध्ये ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महारॅलीची तयारी अत्यंत वेगाने सुरू आहे. या रॅलीच्या नियोजनासाठी आणि तयारीसाठी लियाकत शैदा सर आणि रिझवान बॅटरीवाला आपल्या संपूर्ण टीमसह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.1
- सुरगाणा तालुक्यातील घागबारी फाटा येथे शुक्रवारी (२४ जुलै) राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्याने तब्बल तीन ते चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार रामजी राठोड, प्रांताधिकारी कश्मिरा संखे, मोहन गांगुर्डे, घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, तलाठी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने व चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेषतः नागझरी फाट्यावरील पुलाचे काम पावसाळा सुरू असतानाही अपूर्ण असल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना आधीच निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि निवेदनकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाचा एकही अधिकारी तसेच मुख्य ठेकेदार उपस्थित न राहिल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने इशारा दिला आहे की, रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली नाही किंवा पुढील काळात या खराब रस्त्यामुळे अपघात घडल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. घागबारी परिसरात आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, या महामार्गाच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी कोण आहेत याची चौकशी करून त्यांना जबाबदार धरावे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.2
- दिनांक २९ जून २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेला विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी दिंडी सोहळा २६ दिवसांच्या प्रवासानंतर आज सायंकाळी सुमारे ४ वाजता भूवैकुंठ पंढरपूरमध्ये अत्यंत भक्तिभावाने दाखल झाला आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कळस दर्शनास पडताच वारकऱ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात सर्व वारकऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वीणेकरी, भालदार, चोपदार, तुळशीधारी महिला, टाळकरी तसेच पालखीच्या रथाचे पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त आणि भव्य स्वागत केले. या पालखी सोहळ्यासोबत सुमारे ७० ते ७५ दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या असून नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील अंदाजे दीड ते दोन लाख वारकरी भाविक आज पंढरपूर नगरीत पोहोचले आहेत. सध्या संपूर्ण पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने पूर्णपणे भारावून गेली असून उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांची शिगेला पोहोचली आहे.1
- धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातील तरुण शेतकरी यशराज सतीश नलावडे यांनी आपल्या १ एकर शेतात माती आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर करून विठ्ठलाची अप्रतिम व भव्य प्रतिकृती साकारली आहे. कोणतीही महागडी यंत्रसामग्री किंवा खर्चिक साधने न वापरता, केवळ स्वतःच्या कल्पकतेने आणि अनेक दिवसांच्या मेहनतीतून त्यांनी जमिनीवर ही कलाकृती उभी केली. जमिनीवरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच वरून पाहिल्यावर ही रचना अधिक भव्य आणि प्रमाणबद्ध भासते. या अनोख्या उपक्रमामुळे येडशी गावाचे नाव संपूर्ण परिसरात चर्चेत आले असून, ही कलाकृती पाहण्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेत आहेत. येणाऱ्या नागरिकांनी मोबाईलमध्ये छायाचित्रे टिपून सोशल मीडियावरही या कलाकृतीचे कौतुक केले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यशराज यांना आशीर्वाद दिले असून, शेती आणि अध्यात्म यांच्या या संगमामुळे ग्रामीण तरुणांमध्ये परंपरेबद्दल अभिमानाची भावना व नवा उत्साह निर्माण झाला आहे.1
- धुळे जिल्ह्यातील पांझरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला धुळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी शासनाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. आंदोलनादरम्यान धुळ्यातील कराचीवाला खुंटा आणि चाळीसगाव चौफुली येथे जोरदार 'रास्ता रोको' करण्यात आला. कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा हातात धरून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.1