चिमुकल्यांच्या अदाकारीने एरंडगावचे ग्रामस्थ मंत्रमुग्ध; बक्षिसांची झाली खैरात अभ्यासाच्या दप्तराचे ओझे बाजूला सारून, एरंडगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचा असा काही आविष्कार घडवला की, उपस्थित ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित या सांस्कृतिक सोहळ्यात चिमुकल्यांनी 'एकसे बढकर एक' सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या उत्साहाचे कौतुक म्हणून ग्रामस्थांनीही हजारो रुपयांच्या बक्षिसांची खैरात केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 'माझी शाळा मला आवडते भारी', 'गोंडावाली पोर', 'कान्हा सो जा जरा', आणि 'राधा तेरी चुनरी' यांसारख्या गीतांवर मुलांनी ठेका धरला. विशेषतः 'लाखात नंबर एकचा पाटलांचा बैलगाडा' आणि 'मराठी तडका' या गाण्यांनी संमेलनात मोठी रंगत आणली. पहिली ते चौथीच्या मुलांनी सादर केलेल्या कॉमेडी डान्स आणि विविध कलाविष्कारांना पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सोहळ्याला सरपंच योविता शिवाजी खापरे, रामदास अण्णा पाबळे, नितीन गायकवाड, माजी सरपंच कचरू उराडे, काकासाहेब पडोळ, सिद्धेश उराडे, ज्ञानेश्वर ढेरंगे, बाजीराव ढेरंगे, पोलीस पाटील देविदास उराडे आणि राजेंद्र खापरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र ठोंबरे, मीनल बोडके आणि सुचित्रा कांगणे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्साह दुणावला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चिमुकल्यांच्या अदाकारीने एरंडगावचे ग्रामस्थ मंत्रमुग्ध; बक्षिसांची झाली खैरात अभ्यासाच्या दप्तराचे ओझे बाजूला सारून, एरंडगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचा असा काही आविष्कार घडवला की, उपस्थित ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित या सांस्कृतिक सोहळ्यात चिमुकल्यांनी 'एकसे बढकर एक' सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या उत्साहाचे कौतुक म्हणून ग्रामस्थांनीही हजारो रुपयांच्या बक्षिसांची खैरात केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ
मिळावे, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 'माझी शाळा मला आवडते भारी', 'गोंडावाली पोर', 'कान्हा सो जा जरा', आणि 'राधा तेरी चुनरी' यांसारख्या गीतांवर मुलांनी ठेका धरला. विशेषतः 'लाखात नंबर एकचा पाटलांचा बैलगाडा' आणि 'मराठी तडका' या गाण्यांनी संमेलनात मोठी रंगत आणली. पहिली ते चौथीच्या मुलांनी सादर केलेल्या कॉमेडी डान्स आणि विविध कलाविष्कारांना पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सोहळ्याला सरपंच योविता
शिवाजी खापरे, रामदास अण्णा पाबळे, नितीन गायकवाड, माजी सरपंच कचरू उराडे, काकासाहेब पडोळ, सिद्धेश उराडे, ज्ञानेश्वर ढेरंगे, बाजीराव ढेरंगे, पोलीस पाटील देविदास उराडे आणि राजेंद्र खापरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र ठोंबरे, मीनल बोडके आणि सुचित्रा कांगणे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्साह दुणावला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त येवले शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील शालेय मुलांना सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चौधरी यांच्या वतीने खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षणाची कोणतीही सोय नसताना अतिशय विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन बॅरिस्टर झालेल्या बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा हा मंत्र सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेचे संरक्षण करा असा महत्वपूर्ण सल्ला मंच वरून प्रा. डॉ. अमोल पगारे यांनी व्यासपीठावरून बोलताना दिला. तर सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ आणि विवेक चौधरी यांनी महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधक राबवलेला सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्यास मत पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी व्यक्त केलं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, नगरसेवक एजाजभाई शेख, बापूसाहेब पगारे, भगवान चित्ते, प्राध्यापक निकुंभ सर, प्राध्यापक कोकणे सर, आधी सह विद्यार्थी उपस्थित होते. आयोजकाकडून शालेय बॅग, शालेय साहित्य व खाऊ स्वीकारल्यानंतर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला2
- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तमाम भारतीय बांधवांना शांतता ठेवून समाजकार्य करणं म्हणजे महान तत्व निर्माण करणं आयुष्यात प्रत्येक दिवशी संविधानाची शपथ स्वच्छ भारत अभियान1
- छत्रपती संभाजी नगर शहरातील भडकल गेट परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या ठिकाणी विविध पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.1
- Grand Inaugration | मल्हार पेट्रोलियम | Ramgiri Maharaj1
- तालुका फुलंब्री वडोद बाजार करीम शेख प्रतिनिधी तालुका वडोद बाजार येथेसण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या दिवशी वाळूचे ट्रॅक्टरचे धूम चालू आहे प्रशासना चा याच्यावर काहीच लक्ष नाही दररोज लाख रुपयाची वाढू वडोद बाजार गिरजा नदीतून जेसीबीच्या द्वारा उपसा होत आहे ट्रॅक्टर वाला आम्ही म्हणलं आहे ट्रॅक्टर दम ला चालवा नाहीतर आम्ही कंप्लेंट करू ते आम्हाला धमकून सांगत आहे तुम्ही आमचा काही करू शकत नाही आमचे हप्ते चालू आहे तरी आम्ही प्रशासनाला शांतीपूर्वक हे आवाहन करतो आणि निवेदन करतो याच्यावर तुम्ही कारवाई करा1
- छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना छावणी येथील बंगलो नंबर नऊ येथे ते राहत होते मात्र सध्या त्या बंगलोची बिकट परिस्थिती झाल्याचंही सांगण्यात येत आहे1
- ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏1
- येवला: सुमारे ३५० वर्षांपूर्वी येवला शहराची स्थापना करणारे आणि पैठणी उद्योगाला वैभव प्राप्त करून देणारे राजे रघुजीबाबा शिंदे यांचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवार (१४ एप्रिल) पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त शहरात भक्तीमय वातावरण असून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेची परंपरा जपत सोमवारी रात्री शहरातील युवकांनी कोपरगावहून पायी चालत गोदावरीचे पाणी (कावडी) आणले. मंगळवारी सकाळी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक पाटलांच्या गढीवर रघुजीबाबांच्या मुखवट्याची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वाजत-गाजत भव्य पालखी व कावडी मिरवणूक काढण्यात आली. राजे रघुजीबाबांनी केवळ शहर वसवले नाही, तर पैठणी विणकर व व्यापारी समाजाला राजाश्रय देऊन सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून 'पाटील मशिद'ही उभारली. यात्रेनिमित्त बुधवारी महाप्रसाद, तर गुरुवारी पालखी मिरवणुकीने उत्सवाची सांगता होईल. यावेळी सुनील शिंदे,भास्करराव शिंदे, डॉक्टर संकेत शिंदे,अविनाश शिंदे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शरद शिंदे,संजय शिंदे,प्रशांत शिंदे,बापू शिंदे यांच्यासह शिंदे परिवारातील सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1