लातूरच्या ममदापूरमध्ये महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. लातूर |प्रतिनिधी लातूर तालुक्यातील ममदापूर येथे १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ममदापूर पाटी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात तहसील विभागामार्फत रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले जागीच वितरित करण्यात आले. आरोग्य विभागाकडून मोफत तपासणी व आयुष्मान कार्डांचे वाटप करण्यात आले, तर कृषी व भूमी अभिलेख विभागाकडून शेतकरी आयडी, बी-बियाण्यांबाबत मार्गदर्शन आणि जमिनीच्या नकाशांचे वितरण करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजनेबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे शेकडो प्रलंबित कामे मार्गी लागली असून प्रशासनाच्या या प्रयत्नाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तहसीलदार तांदळे यांनी सांगितले की, नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
लातूरच्या ममदापूरमध्ये महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. लातूर |प्रतिनिधी लातूर तालुक्यातील ममदापूर येथे १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ममदापूर पाटी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात तहसील विभागामार्फत रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले जागीच वितरित करण्यात आले. आरोग्य विभागाकडून मोफत तपासणी व आयुष्मान कार्डांचे वाटप करण्यात आले, तर कृषी व भूमी अभिलेख विभागाकडून शेतकरी आयडी, बी-बियाण्यांबाबत मार्गदर्शन आणि जमिनीच्या नकाशांचे वितरण करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजनेबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे शेकडो प्रलंबित कामे मार्गी लागली असून प्रशासनाच्या या प्रयत्नाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तहसीलदार तांदळे यांनी सांगितले की, नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
- लातूर |प्रतिनिधी लातूर तालुक्यातील ममदापूर येथे १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ममदापूर पाटी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात तहसील विभागामार्फत रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले जागीच वितरित करण्यात आले. आरोग्य विभागाकडून मोफत तपासणी व आयुष्मान कार्डांचे वाटप करण्यात आले, तर कृषी व भूमी अभिलेख विभागाकडून शेतकरी आयडी, बी-बियाण्यांबाबत मार्गदर्शन आणि जमिनीच्या नकाशांचे वितरण करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजनेबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे शेकडो प्रलंबित कामे मार्गी लागली असून प्रशासनाच्या या प्रयत्नाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तहसीलदार तांदळे यांनी सांगितले की, नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.1
- लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026. लातूर शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव 1) नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर) असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/-स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.2
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर (प्रतिनिधी) शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १८.०० वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर)असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/- स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.2
- धाराशिव हादरलं! स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा सर्जिकल स्ट्राईक; पवनचक्की चोरी करणारी टोळी जाळ्यात2
- ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुखेड शहराला सध्या अवैध धंद्यांच्या विळख्याने ग्रासले आहे. तालुक्यातील निसर्गसंपदा ओरबाडली जात असून, दुसरीकडे तरुण पिढी नशेच्या जाळ्यात ओढली जात आहे. अवैध रेती उपसा, डोंगर पोखरून केले जाणारे मुरूम उत्खनन, वनविभागाच्या नाकाखाली होणारी लाकूड तोड आणि गल्ली बोळांत मिळणारा गांजा यामुळे शहराचे स्वास्थ्य बिघडले आहे. विशेष म्हणजे, ‘श्रमिक एकता न्यूज‘ व इतर माध्यमातून वारंवार आवाज उठवूनही प्रशासन ढिम्म हलतनसल्याने ‘प्रशासन माफियांच्या दावणीला बांधले गेले आहे का?’ असा संतापजनक प्रश्न नागरिक विचारत आहेत. तालुक्यातील नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक केली जाते. महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन हे माफिया शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. मुरुमाच्या उत्खननामुळे एकेकाळी हिरवेगार दिसणारे डोंगर आता विद्रूप झालेआहेत. झाडांची बेसुमार कत्तल करून लाकूड तस्करीचे रॅकेट सक्रिय झाले असून, पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळला आहे. शहरातील काही ठराविक भागांत गांजाची विक्री राजरोसपणे सुरू आहे. शालेय आणि महाविद्यालयीनविद्यार्थी या नशेकडे ओढले जात आहेत. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ आणि तरुणांमधील व्यसनाधीनता मुखेडच्या भविष्यासाठी घातक ठरणार आहे. पोलिसांना या ठिकाणांची माहिती असूनही कारवाई का होत नाही? हा मोठा प्रश्न आहे. तक्रार केली की केवळ कागदी घोडे नाचवायचे, एखादी किरकोळ कारवाई करून दाखवायची आणि पुन्हा ‘जैसे थे‘ कारभार सुरू होऊ द्यायचा, असा शिरस्ता प्रशासनाने लावून घेतला आहे. तक्रारदारांनाच धमकावण्यापर्यंत या माफियांनी मजल मारली आहे. जर लेखी पुराव्यानिशी तक्रार देऊनही कारवाई होत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का होऊ नये?4
- लातूर एमआयडीसी क्रमांक एक मध्ये मुंदडा इंडस्ट्री ला लागली भीषण आहार आगीत दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती.1