logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

24 ते 26 एप्रिल सहकार भारतीचे नॉर्थकोट मैदानावर महिलांसाठी राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पो महिला बाल कल्याण मंत्री मेघना बोर्डीकर, आ.चित्रा वाघ यांची उपस्थिती राहणार सोलापूर, महिलांचे संघटन आणि महिलांचा आर्थिक विकास या हेतुने सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पो फॉर वुमेन एम्पावरमेंट या संकल्पनेतून महिलांकडून उत्पादित वस्तुचे प्रदर्शन आणि विक्री नॉर्थकोट मैदानावर दि. 24 ते 26 एप्रिल या दरम्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती या एक्स्पोच्या स्वागताध्यक्षा सुधा अळ्ळीमोरे यांनी दिली. कला, स्वाद व संस्कृतीचा अनोखा संगम या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून अनुभवायला येणार आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी एक पाऊल या धर्तीवर या व्हिजन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून महिलांकडून उत्पादित वस्तुला व्यासपीठ मिळावे म्हणून या प्रदर्शनातील स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मध्ये महिलांनी मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी केले. दि. 24 एप्रिल रोजी या व्हिजन एक्स्पोचे उदघाटन आ.चित्रा वाघ यांच्या हस्ते होणार असून यावेळी महापौर विनायक कोंड्याल,  दि. 26 एप्रिल रोजी याचा समारोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे. महिलांसाठी असणार्‍या साड्या, ड्रेस, विविध प्रकारचे आभुषणे, पर्स पासून ते सर्वच वस्तु तसेच खाद्य पदार्थ असा या व्हिजन एक्स्पो मध्ये सहभाग असणार आहे. तसेच महिलांसाठी परिसंवादाचेही यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील  विविध जिल्ह्यातील महिलांकडून यामध्ये स्टॉल्स लावण्यात येणार आहे. याचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा. बिना संस्कार नही सहकार, बिना सहकार नही उद्धार हे ब्रीद घेवून काम करणार्‍या सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने महिलांना सक्षम करण्याचा या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. नॉर्थकोट मैदानावर जवळपास 100 पेक्षा अधिक स्टॉल्स महिलांना मोफत उपलब्ध होणार आहेत. सहकार भारतीचे विभाग प्रमुख संतोष गायकवाड, कार्यकारणी सदस्य सुर्यकांत पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष किरण करकमकर, महामंत्री यशवंत बुर्‍हाडे, कार्यक्रम प्रमुख प्राची धामणगांवकर, सुजाता इनामदार,डॉ. जयंत शेळगीकर, अर्चना कुलकर्णी, श्रृती पवार, हनुमंत कोळी, आरती पानगांवकर,कुमुद अंकाराम यांच्यासह सहकार भारतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या व्हिजन एक्स्पोच्या यशस्वीतेसाठी काम करीत आहेत. चौकट - महिला बालकल्याण मंत्री मेघना बोर्डीकर, चित्रा वाघ यांची उपस्थिती राहणार या व्हिजन एक्स्पोला राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री मेघना बोर्डीकर तसेच आ.चित्रा वाघ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आ.देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, शहाजी पवार, सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, प्रदेश संघटक शरद जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. परिसंवाद - राज्यातील विविध तज्ञ महिलांचा सहभाग असलेला परिसंवाद यामध्ये होणार आहे.

20 hrs ago
user_Yasin Shikilkar
Yasin Shikilkar
माळशिरस, सोलापूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency Karjat, Ahmednagar•
    19 min ago
  • गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली. “जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे. नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. “सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली.
“जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे.
नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
“सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.२३ भोरसाठी वर्षभरासाठी ५०कोटीचा निधी आणला शिल्लक चार वर्षात किती निधी आणतो ते बघा असे सांगून विरोधकांच्या भुलथापाना बळी पडू नका असे भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर म्हणाले.भोर येथील नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकूल आणि रामबाग परिसरातील जलतरण तलावाचे लोकार्पण आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मा.श्री.रामचंद्रनाना आवारे - नगराध्यक्ष,न.प.भोर मा.श्री.गजाननजी शिंदे सर - सी.ओ.- न.प.भोर मा.श्री.विक्रमदादा खुटवड-जि.प.सदस्य,पुणे मा.श्री.रणजितदादा शिवतरे मा.उपाध्यक्ष,जि.प. मा.श्री.प्रवीणजी जगदाळे -जि.प.सदस्य,पुणे मा.सौ.मनीषाताई कंक - सभापती,पं.स.भोर मा.श्री.राजेशभाऊ बोडके - सदस्य,पं.स.भोर मा.श्री.केदारजी देशपांडे - गटनेते,न.प.भोर व सर्व सन्माननीय नगरसेवक ,पदाधिकारी तथा अधिकारी उपस्थित होते.
    2
    विक्रम शिंदे /भोर दि.२३
भोरसाठी वर्षभरासाठी ५०कोटीचा निधी आणला शिल्लक चार वर्षात किती निधी आणतो ते बघा असे सांगून विरोधकांच्या भुलथापाना बळी पडू नका असे भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर म्हणाले.भोर येथील नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकूल आणि रामबाग परिसरातील जलतरण तलावाचे लोकार्पण आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मा.श्री.रामचंद्रनाना आवारे - नगराध्यक्ष,न.प.भोर
मा.श्री.गजाननजी शिंदे सर - सी.ओ.- न.प.भोर
मा.श्री.विक्रमदादा खुटवड-जि.प.सदस्य,पुणे
मा.श्री.रणजितदादा शिवतरे मा.उपाध्यक्ष,जि.प.
मा.श्री.प्रवीणजी जगदाळे -जि.प.सदस्य,पुणे
मा.सौ.मनीषाताई कंक - सभापती,पं.स.भोर
मा.श्री.राजेशभाऊ बोडके - सदस्य,पं.स.भोर
मा.श्री.केदारजी देशपांडे - गटनेते,न.प.भोर 
व सर्व सन्माननीय नगरसेवक ,पदाधिकारी तथा अधिकारी उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Baban Gawade
    1
    Post by Baban Gawade
    user_Baban Gawade
    Baban Gawade
    Singer Tuljapur, Osmanabad•
    16 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic Warje, Pune•
    21 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.२२ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या मात्र पैकी २४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने तालुक्यातील रावडी , अंगसुळे ,खडकी या ३ ग्रामपंचायतीसाठी पोट निवडणूक येत्या २८ होत आहे.या निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज (दि.22) पंचायत समिती भोर येथे पार पडले.रावडी आणि खडकी येथे सरपंचपदासाठी तर खडकी येथे केवळ एका वॉर्डमधील केवळ एका सदस्यपदासाठी ही पोट निवडणूक होत असल्याचे निवासी नायब तहसीलदार महसूल वैशाली घोरपडे यांनी सांगितले.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.२२
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या मात्र पैकी २४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने तालुक्यातील रावडी , अंगसुळे ,खडकी या  ३ ग्रामपंचायतीसाठी पोट निवडणूक येत्या २८
होत आहे.या निवडणुकीसाठी नियुक्त  अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज (दि.22) पंचायत समिती भोर येथे पार पडले.रावडी आणि खडकी येथे सरपंचपदासाठी तर खडकी येथे केवळ एका वॉर्डमधील केवळ एका सदस्यपदासाठी ही पोट निवडणूक होत असल्याचे निवासी नायब तहसीलदार महसूल वैशाली घोरपडे यांनी सांगितले.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.