logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मूर्तिजापूर हादरलं! उड्डाणपुलावर तरुणीचा विनयभंग | नकार दिल्यावर प्रियकराचा संताप मूर्तिजापूर शहरातील दर्यापूर उड्डाणपुलावर २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तरुणीचा पाठलाग करत लग्नासाठी दबाव टाकला आणि जबरदस्तीने तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

23 hrs ago
user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
MOHAMMED RIZWAN RAHEMAN
Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
23 hrs ago
8f87709c-156d-493f-9469-803aee374cbb

मूर्तिजापूर हादरलं! उड्डाणपुलावर तरुणीचा विनयभंग | नकार दिल्यावर प्रियकराचा संताप मूर्तिजापूर शहरातील दर्यापूर उड्डाणपुलावर २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तरुणीचा पाठलाग करत लग्नासाठी दबाव टाकला आणि जबरदस्तीने तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • वडकी :-वडकी येथून खैरी मार्गे जाणाऱ्या माढेळी वरोरा रस्त्या वर खैरी येथील गोटाडी ते खैरी गावात शिरणाऱ्या रस्त्यावर गावात शिरताच गावातील रस्त्याच्या कडेला असलेली नाली संपूर्ण बुझल्याने त्याचे घाण पाणी रोड वर पसरत असून उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्या सारखं दृश्य पाहव्यास मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार खैरी येथील मी माणूस एक संघटन चे चालक किशोर सोनवणे यांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे सतत अशा प्रकारचे दुर्लक्षित कार्य प्रशासनाच्या निर्दशानात आणून देण्याचे काम करीत असतात हा पण प्रकार गेल्या अनेक दिवसा पासून पाठपुरावा करीत आहे पण आजच्या या प्रकाराणे खरंच आपले हात टेकले परंतु शासन दुर्लक्ष करीतच असल्याचे दिसत आहे. हा खड्डा आपल्या घरासमोरच असल्यामुळे या खड्ड्या मुळे अनेकांना दुखापत होत त्यांना मदत करण्या पलीकडे दुसरे मी काहीच करू शकत नाही असे मी माणूस एक संघटना चे किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे. त्याच्या या घटनेच्या कार्यामुळे अनेकांना मदत झाली असून पण हि समस्या सोडविण्यात आपण हरलो अशी त्यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केली आहे.
    1
    वडकी :-वडकी येथून खैरी मार्गे जाणाऱ्या माढेळी वरोरा रस्त्या वर खैरी येथील गोटाडी ते खैरी गावात शिरणाऱ्या रस्त्यावर गावात शिरताच गावातील रस्त्याच्या कडेला असलेली नाली संपूर्ण बुझल्याने त्याचे घाण पाणी रोड वर पसरत असून उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्या सारखं दृश्य पाहव्यास मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार खैरी येथील मी माणूस एक संघटन चे चालक किशोर सोनवणे यांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे सतत अशा प्रकारचे दुर्लक्षित कार्य प्रशासनाच्या निर्दशानात आणून देण्याचे काम करीत असतात हा पण प्रकार गेल्या अनेक दिवसा पासून पाठपुरावा करीत आहे पण आजच्या या प्रकाराणे खरंच आपले हात टेकले परंतु शासन दुर्लक्ष करीतच असल्याचे दिसत आहे. हा खड्डा आपल्या घरासमोरच असल्यामुळे या खड्ड्या मुळे अनेकांना दुखापत होत त्यांना मदत करण्या पलीकडे दुसरे मी काहीच करू शकत नाही असे मी माणूस एक संघटना चे किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे.
त्याच्या या घटनेच्या कार्यामुळे अनेकांना मदत झाली असून पण हि समस्या सोडविण्यात आपण हरलो अशी त्यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केली आहे.
    user_Gopal Chandulal Sangani
    Gopal Chandulal Sangani
    राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    26 min ago
  • प्रतिनिधी - संतोष बाहेकर बुलढाणा- संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी न्याय मिळवण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संग्रामपूर पंचायत समिती समोर उपोषणास बसले आहे.. तुटपुंजा पगारावर काम करणारे तळा गळातील कर्मचारी.. आपल्या न्याय हक्कासाठी आज पंचायत समिती समोर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.. सन. सप्टेंबर 2020 ते मार्च 2022 पर्यंत . या कालावधीपर्यंत फरकाची रक्कम अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही.. सदर रक्कम वेळोवेळी मागून सुद्धा कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळाला. मात्र जिल्हा परिषद बुलडाणा दिखाव याची भूमिका घेतलीआले होती. या गलथान कारभारामुळे ग्रामपंचायत कर्मचारी त्रस्त होऊन. उपोषणाचे पाऊल टाकण्यात आले.. कोरोना काळात जीवाची परवा न करता व कुटुंबाची काळजी न करता. जीवाचा रान कर्मचारी करणारा ग्रामपंचायत कर्मचारी आज उपासमारीची वेळ आली आहे.. तसेच कोरोणा काळातील मानधन सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी मानसिक तणावात जीवन जगत आहे.. वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. सहा एप्रिल पासून ग्रामपंचायत कर्मचारी तसेच युनियनचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव उपोषणाला बसले आहे..
    2
    प्रतिनिधी - संतोष बाहेकर
बुलढाणा- संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी न्याय मिळवण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संग्रामपूर पंचायत समिती समोर उपोषणास बसले आहे.. तुटपुंजा पगारावर  काम  करणारे तळा गळातील कर्मचारी.. आपल्या न्याय हक्कासाठी आज पंचायत समिती समोर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.. सन. सप्टेंबर 2020 ते मार्च 2022 पर्यंत . या कालावधीपर्यंत फरकाची रक्कम अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही.. सदर रक्कम वेळोवेळी मागून सुद्धा कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळाला. मात्र जिल्हा परिषद बुलडाणा दिखाव याची भूमिका घेतलीआले होती. या गलथान कारभारामुळे ग्रामपंचायत कर्मचारी त्रस्त होऊन. उपोषणाचे पाऊल टाकण्यात आले.. कोरोना काळात जीवाची परवा न करता व कुटुंबाची काळजी न करता. जीवाचा रान कर्मचारी करणारा ग्रामपंचायत कर्मचारी आज उपासमारीची वेळ आली आहे.. तसेच कोरोणा काळातील मानधन सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी मानसिक तणावात जीवन जगत आहे.. वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. सहा एप्रिल पासून ग्रामपंचायत कर्मचारी तसेच युनियनचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव उपोषणाला बसले आहे..
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    37 min ago
  • माझ्या मुलाला टार्गेट करून सस्पेंड केलं बेंडवाल यांचा आ गायकवाडांवर खळबळजनक आरोप
    1
    माझ्या मुलाला टार्गेट करून सस्पेंड केलं बेंडवाल यांचा आ गायकवाडांवर खळबळजनक आरोप
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • प्रेस नोट... *शेडगाव, गट ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव महाजन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश...* हिंगणघाट :- हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, समुद्रपूर तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील व विनोद बाबुळकर यांच्या नेतृत्वात शेडगाव ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. "जिल्ह्यातील जनता बदलाच्या मूडमध्ये आहे. ज्यांनी निष्ठेने काम करण्याची तयारी दर्शवली आहे, त्या सर्वांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल. शरद पवार साहेबाचे प्रगल्भ नेतृत्व आणि संघर्षाची जिद्द पाहून अनेक नेते आकर्षित होत आहेत. जनमताचा कौल. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्यासाठी हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी शेडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य नामदेव महाजन,अशोक उईके,पांडुरंग महाजन, संतोष डुकरे, संजय थुल, नितीन तामगाडगे, शंकर खंडारे, जितेंद्र वाघमारे, शिवशंकर पाल, गौतम लांडगे, विनोद भुजाडे, गजानन वांदिले, श्रावण महाजन, आकाश नरड आदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वाना पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुछ देवून पक्षात स्वागत केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शाहिद शेख उपस्थिती होते.
    1
    प्रेस नोट...
*शेडगाव, गट ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव महाजन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश...*
हिंगणघाट :-  हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, समुद्रपूर तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील व विनोद बाबुळकर यांच्या नेतृत्वात शेडगाव ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
"जिल्ह्यातील जनता बदलाच्या मूडमध्ये आहे. ज्यांनी निष्ठेने काम करण्याची तयारी दर्शवली आहे, त्या सर्वांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल. शरद पवार साहेबाचे प्रगल्भ नेतृत्व आणि संघर्षाची जिद्द पाहून अनेक नेते आकर्षित होत आहेत. जनमताचा कौल. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्यासाठी हा पक्ष प्रवेश झाला आहे.
यावेळी शेडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य नामदेव महाजन,अशोक उईके,पांडुरंग महाजन, संतोष डुकरे, संजय थुल, नितीन तामगाडगे, शंकर खंडारे, जितेंद्र वाघमारे, शिवशंकर पाल, गौतम लांडगे, विनोद भुजाडे, गजानन वांदिले, श्रावण महाजन, आकाश नरड आदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वाना पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुछ देवून पक्षात स्वागत केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शाहिद शेख उपस्थिती होते.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मंगरूळपीर येथे गॅस टंचाईचे तहसीलदारांना निवेदन वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मंगरूळपीर ता ६ मंगरूळपीर येथे दि ६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे वतीने "नरेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर" या आशायाचे जण आंदोलन करण्यात आले. असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाचा आशय असा की राज्यभरात सुरू असलेली गैस टंचाई, गैस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणामा बद्दल बंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, नागरिक "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन, शासनाचे आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारकचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले आहे. काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ५ तास उन्हात रांगेत उभे होते. त्यातच रांगेत उभे असतांना त्यांचा मृत्यू आला होता. वसेच अमरावती येथे तरुणाचा गैस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्देवी मृत्यू झाला होता. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आले असून मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलन करण्यात येईल.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र राऊत,समाधान भगत, विनोद भगत, सुधीर गहुले,सुनील वानखडे,छाया वानखडे,दुर्गा वानखडे, देवराव भगत,भगवान भगत, विलास दंदे ,संगीता वानखडे, अरुण भगत ,सिद्धार्थ वानखडे, रवींद्र शृंगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    2
    मंगरूळपीर येथे गॅस टंचाईचे तहसीलदारांना निवेदन
वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन 
मंगरूळपीर ता ६ मंगरूळपीर  येथे दि ६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे  वतीने "नरेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर" या आशायाचे जण आंदोलन करण्यात  आले. असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. 
या निवेदनाचा आशय असा की राज्यभरात सुरू असलेली गैस टंचाई, गैस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणामा बद्दल बंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, नागरिक "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर"  ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन, शासनाचे आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारकचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले आहे.
काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ५ तास उन्हात रांगेत उभे होते. त्यातच रांगेत उभे असतांना त्यांचा मृत्यू आला होता. वसेच अमरावती येथे तरुणाचा गैस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्देवी मृत्यू झाला होता. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आले असून मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलन करण्यात येईल.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र राऊत,समाधान भगत, विनोद भगत, सुधीर गहुले,सुनील वानखडे,छाया वानखडे,दुर्गा वानखडे, देवराव भगत,भगवान भगत, विलास दंदे ,संगीता वानखडे, अरुण भगत ,सिद्धार्थ वानखडे, रवींद्र शृंगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • भाजप जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल हा खानदानी गावगुंड आ संजय गायकवाड यांची टीका
    1
    भाजप जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल हा खानदानी गावगुंड आ संजय गायकवाड यांची टीका
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जिल्हा पोलिसांची "वॉशआऊट" मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त*. वर्धा..हिंगणघाट जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. ०६/०४/२०२६ रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध 'वॉशआऊट" मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये एकूण १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०१ कोटी ८० लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या 'सर्जिकल स्ट्राईक'ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्टयांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली. * पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रत्यक्ष देखरेखित जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण २५१ पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. * पहाटे चार वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण ११० आरोपींवर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, या मोहिमेत नवीन कायद्यानुसार 'ई' साक्ष अॅप्लिकेशन (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत या अचानक केलेल्या 'वॉशआऊट "मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, "वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे."
    1
    जिल्हा पोलिसांची "वॉशआऊट" मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त*.
वर्धा..हिंगणघाट
जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. ०६/०४/२०२६ रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध 'वॉशआऊट" मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये एकूण १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०१ कोटी ८० लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.
श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या 'सर्जिकल स्ट्राईक'ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्टयांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली.
* पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रत्यक्ष देखरेखित जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण २५१ पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
* पहाटे चार वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
या कारवाईत एकूण ११० आरोपींवर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, या मोहिमेत नवीन कायद्यानुसार 'ई' साक्ष अॅप्लिकेशन (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले.
भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत
या अचानक केलेल्या 'वॉशआऊट "मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, "वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे."
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.