निमशिरगावात दूषित पाणीपुरवठ्याने संताप; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाविरोधात आंदोलनाचा इशारा निमशिरगाव / प्रतिनिधी निमशिरगाव गावात ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात घाण, कचरा तसेच अळ्या आढळत असल्याने हे पाणी पिण्यास पूर्णपणे अयोग्य ठरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.मात्र या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.गावातील अनेक भागांत मैलायुक्त व गटारीच्या पाण्यासारखा दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दूषित पाण्यामुळे लहान मुले,महिलांमध्ये तसेच वयोवृद्धांमध्ये पोटदुखी,जुलाब आणि ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच सदस्य यांना वारंवार याबाबत कळवूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाविषयी गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना सात ते आठ दिवसातून केवळ एकदाच पाणी मिळत आहे. त्यातही दूषित पाणीच मिळत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गावाचे प्रशासन सांभाळण्यासाठी निवडून दिलेल्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही जबाबदारी पार पाडली जात नसल्याने संतप्त नागरिकांमध्ये “ग्रामपंचायतीला टाळे ठोका आणि गावकऱ्यांनीच प्रशासन चालवा” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.दरम्यान, गावातील पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून पाण्याचे शुद्धीकरण करावे व नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.या संदर्भात तालुक्याचे गटविकास अधिकारी विजकुमार परीट यांनी सांगितले की, “दोन ते तीन दिवसांत निमशिरगावला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली जाईल आणि पाणीपुरवठा सुरळीत व शुद्ध पाणी मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील.

- हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व कुंभोज / प्रतिनिधी हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या कट्टर समर्थक अश्विनी अनिल बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.तर आळते पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले इंगवले गटाचे समर्थक संतोष कांबळे (शिवसेना शिंदे गट) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी अश्विनी बिरंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.त्यानंतर उपसभापती पदासाठी संतोष कांबळे यांच्या नावावर सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काम पाहिले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,राजू इंगवले,किरण इंगवले, झाकीर भालदार,वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरंजे व उपसभापती संतोष कांबळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.पंचायत समिती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,या निवड प्रक्रियेनंतर जनसुराज्य पक्षाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.1
- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.1
- Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज1
- सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1