Shuru
Apke Nagar Ki App…
उन्हाळी सुट्टीत आनंदावर विरजण ; अमरावतीत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावासह चार जणांचा मृत्यू ! उन्हाळी सुट्टीत आनंदावर विरजण ; अमरावतीत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावासह चार जणांचा मृत्यू ! अमरावतीतील काल रविवारी घातखेडा तलावात चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये सोनाली नरेंद्र जोशी (16), आदित्य नरेंद्र जोशी (12), पायल बबलू पंडीत (21) आणि यश गजानन काकणे (13) यांचा समावेश आहे. सोनाली आणि आदित्य हे सख्खे बहीण-भाऊ होते. उन्हाळी सुट्टीत पोहण्यासाठी गेलेल्या या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
पत्रकार ओमप्रकाश उढाण
उन्हाळी सुट्टीत आनंदावर विरजण ; अमरावतीत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावासह चार जणांचा मृत्यू ! उन्हाळी सुट्टीत आनंदावर विरजण ; अमरावतीत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावासह चार जणांचा मृत्यू ! अमरावतीतील काल रविवारी घातखेडा तलावात चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये सोनाली नरेंद्र जोशी (16), आदित्य नरेंद्र जोशी (12), पायल बबलू पंडीत (21) आणि यश गजानन काकणे (13) यांचा समावेश आहे. सोनाली आणि आदित्य हे सख्खे बहीण-भाऊ होते. उन्हाळी सुट्टीत पोहण्यासाठी गेलेल्या या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.1
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने वारकरी संप्रदायातील संतांवर कथित 'प्रतिगामी विचारांच्या घुसखोरी'चा आरोप केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे वारकरी संघटना आणि हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यभर निषेध आंदोलने केली आहेत. आंदोलकांनी प्रवक्त्याची जाहीर माफी आणि तात्काळ अटकेची मागणी केली असून, प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.1
- न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.1
- वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे भीषण आग पहाटे 4 वाजेच्या सुमारास 8 ते 10 दुकाने जळून खाक छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान शिऊर पोलिसांची घटनास्थळी धाव वैजापूर नगर परिषद आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आगीत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, पुढील तपास सुरू ANC : वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील 8 ते 10 दुकाने या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वैजापूर नगर परिषदेचे अग्निशामक दल आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले. दोन्ही विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.4
- औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.1
- मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुलांमध्ये रुजण्यास मदत होईल.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या बिडकीन बस स्थानकाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. छत नसल्याने उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत, कारण बसही स्थानकात न थांबता बाहेरून जात आहेत.1