logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वडद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर अभियान सानगडी मंडळ अंतर्गत येत असलेल्या सर्वच साझ्यातील महसूल विभाग संबंधित शेतकरी व लाभार्थी यांच्यासाठी मौजा वडद येथे श्री संत गजानन महाराज देवस्थान वडद ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान चे दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी आयोजन करण्यात आले. सदर समाधान शिबिराचे उद्घाटन सन्माननीय तहसीलदार निलेश जी कदम सर यांचे सुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय मदन भाऊ रामटेके माजी समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य भंडारा हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वडद येथील सरपंच सन्माननीय भारतीताई बडवाईक, उपसरपंच दीपक जी कळस्कर, नायब तहसीलदार सन्माननीय शेंडे साहेब ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सन्माननीय झासीरामजी शेंडे, सानगडी मंडळ अधिकारी पटले सर, ग्राम विकास अधिकारी झेड .आर .पटेल साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला मल्हार पण करून थोर समाजसेवक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वडद येथील सरपंच सन्माननीय भारतीताई बडवाईक यांनी सदर समाधान शिबिर विषयी विस्तृत मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले समाधान करून घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शिबिराचे आयोजक साकोली तहसीलदार सन्माननीय निलेश जी कदम सर यांनी सदर शिबिराविषयी शासनाचा निर्णय असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या ठिकाणी येऊन तालुकास्तरावरील व आरोग्य विषयक माहिती करून घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणातून सन्माननीय मदन भाऊ रामटेके यांनी आपल्या क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान म्हणजेच एक खिडकी योजना असून यात सर्वच विभागाची अधिकारी येत असल्याने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न निकाली निघू शकतात असे मौलिक मार्गदर्शन केले. ह्याप्रसंगी सर्वसामान्य शेतकरी यांचे दैनंदिन प्रश्न, सातबारा, आग्रिस्टॅक, पी . एम.किसान,आधारकार्ड नूतनीकरण, फेरफार, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्नाचे दाखले तसेच संजय गांधी योजना, जमीन मोजणी व इतर सर्व प्रकारचे प्रकरण, तसेच आरोग्य तपासणी, वनविभाग, एस. टी. महामंडळ, एम. एस. ई. बी., भूमि अभिलेख, दुय्यम निबंधक, उमेद इत्यादी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न निकाली काढण्यात आले. तसेच उपस्थित सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सोविंदराव हटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सन्माननीय पटले सर मंडळ अधिकारी सांनगडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महसूल अधिकारी दहिवले, पारधीकर, पायल तिरपुडे, बाळबुद्धे, व सांगली मंडळातील सर्वच महसूल अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

2 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
2 hrs ago

वडद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर अभियान सानगडी मंडळ अंतर्गत येत असलेल्या सर्वच साझ्यातील महसूल विभाग संबंधित शेतकरी व लाभार्थी यांच्यासाठी मौजा वडद येथे श्री संत गजानन महाराज देवस्थान वडद ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान चे दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी आयोजन करण्यात आले. सदर समाधान शिबिराचे उद्घाटन सन्माननीय तहसीलदार निलेश जी कदम सर यांचे सुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय मदन भाऊ रामटेके माजी समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य

3f6514a7-9a49-44a0-98eb-33031f0277ec

भंडारा हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वडद येथील सरपंच सन्माननीय भारतीताई बडवाईक, उपसरपंच दीपक जी कळस्कर, नायब तहसीलदार सन्माननीय शेंडे साहेब ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सन्माननीय झासीरामजी शेंडे, सानगडी मंडळ अधिकारी पटले सर, ग्राम विकास अधिकारी झेड .आर .पटेल साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला मल्हार पण करून थोर समाजसेवक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वडद येथील सरपंच सन्माननीय भारतीताई बडवाईक यांनी सदर समाधान शिबिर विषयी विस्तृत मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले समाधान करून घेण्याचे

fc3c31c5-5465-46eb-ab1e-963c203f7b33

आवाहन केले. याप्रसंगी शिबिराचे आयोजक साकोली तहसीलदार सन्माननीय निलेश जी कदम सर यांनी सदर शिबिराविषयी शासनाचा निर्णय असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या ठिकाणी येऊन तालुकास्तरावरील व आरोग्य विषयक माहिती करून घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणातून सन्माननीय मदन भाऊ रामटेके यांनी आपल्या क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान म्हणजेच एक खिडकी योजना असून यात सर्वच विभागाची अधिकारी येत असल्याने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न निकाली निघू शकतात असे मौलिक मार्गदर्शन केले. ह्याप्रसंगी सर्वसामान्य शेतकरी यांचे दैनंदिन प्रश्न, सातबारा, आग्रिस्टॅक, पी . एम.किसान,आधारकार्ड नूतनीकरण, फेरफार, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्नाचे

8ef53b8d-5f27-4e2e-85c7-c94992ffe737

दाखले तसेच संजय गांधी योजना, जमीन मोजणी व इतर सर्व प्रकारचे प्रकरण, तसेच आरोग्य तपासणी, वनविभाग, एस. टी. महामंडळ, एम. एस. ई. बी., भूमि अभिलेख, दुय्यम निबंधक, उमेद इत्यादी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न निकाली काढण्यात आले. तसेच उपस्थित सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सोविंदराव हटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सन्माननीय पटले सर मंडळ अधिकारी सांनगडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महसूल अधिकारी दहिवले, पारधीकर, पायल तिरपुडे, बाळबुद्धे, व सांगली मंडळातील सर्वच महसूल अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    21 hrs ago
  • माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन नागपूर/उमरेड प्रतिनिधी नागपूर/ उमरेड: (दि १८) माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माननीय श्री. राजूभाऊ मेश्राम होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून युवकांना शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांचा संदेश देत उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवली. तसेच माननीय श्री. प्रणयजी मेश्राम, माननीय श्री. अमित भाऊ लाडेकर, विजयजी पाटील, रविंद्र पिल्लेवान, विजयानंद गजघाटे, विनोद शंभरकर, बबलू हाडके, हिमांशू बहादुरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
    1
    माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन 
नागपूर/उमरेड प्रतिनिधी
नागपूर/ उमरेड: (दि १८) माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माननीय श्री. राजूभाऊ मेश्राम होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून युवकांना शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांचा संदेश देत उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवली.
तसेच माननीय श्री. प्रणयजी मेश्राम, माननीय श्री. अमित भाऊ लाडेकर, विजयजी पाटील, रविंद्र पिल्लेवान, विजयानंद गजघाटे, विनोद शंभरकर, बबलू हाडके, हिमांशू बहादुरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • इसासनी-वागधरा येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा स्फोटक आरोप! माजी सरपंचांची पालकमंत्र्यांकडे धाव नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इसासनी-वागधरा ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. माजी सरपंच संतोष गोपीचंद कटरे यांनी थेट महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करून उच्चस्तरीय चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, शांती नगर, बुद्ध नगरी व बहुजन नगर परिसरातील खसरा क्रमांक एक, सहा व सात या शासकीय जमिनीवर संघटित पद्धतीने कब्जा करण्यात आला आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रभावशाली व्यक्तींच्या संगनमताने नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन जागा ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही स्थानिक सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची नावेही चर्चेत आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्या भागात सिमेंट रस्ते, पाणी पाईपलाईन व इतर विकासकामे करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. म्हणजेच बेकायदेशीर अतिक्रमणालाच शासकीय सुविधांचा आधार दिला जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच अतिक्रमणासाठी त्या भागातील तलावही बुजविण्यात आला असून पर्यावरणीय हानी झाल्याची बाब समोर आली आहे. माजी सरपंच संतोष कटरे यांनी या प्रकरणाला विरोध केल्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उलट पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कटरे यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगत स्वतःस व कुटुंबास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारक, अधिकारी व निष्क्रिय पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय जमीन मोकळी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या स्फोटक तक्रारीमुळे इसासनी-वागधरा परिसरात खळबळ उडाली असून आता पालकमंत्री बावनकुळे या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    इसासनी-वागधरा येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा स्फोटक आरोप! माजी सरपंचांची पालकमंत्र्यांकडे धाव
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इसासनी-वागधरा ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. माजी सरपंच संतोष गोपीचंद कटरे यांनी थेट महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करून उच्चस्तरीय चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, शांती नगर, बुद्ध नगरी व बहुजन नगर परिसरातील खसरा क्रमांक एक, सहा व सात या शासकीय जमिनीवर संघटित पद्धतीने कब्जा करण्यात आला आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रभावशाली व्यक्तींच्या संगनमताने नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन जागा ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही स्थानिक सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची नावेही चर्चेत आली आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्या भागात सिमेंट रस्ते, पाणी पाईपलाईन व इतर विकासकामे करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. म्हणजेच बेकायदेशीर अतिक्रमणालाच शासकीय सुविधांचा आधार दिला जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच अतिक्रमणासाठी त्या भागातील तलावही बुजविण्यात आला असून पर्यावरणीय हानी झाल्याची बाब समोर आली आहे.
माजी सरपंच संतोष कटरे यांनी या प्रकरणाला विरोध केल्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उलट पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
कटरे यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगत स्वतःस व कुटुंबास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारक, अधिकारी व निष्क्रिय पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय जमीन मोकळी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
या स्फोटक तक्रारीमुळे इसासनी-वागधरा परिसरात खळबळ उडाली असून आता पालकमंत्री बावनकुळे या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मुजफ्फरपुर जीरोमाइल में ऑटो वाला से पर्ची के नाम पर पैसा वसूल रहा है #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur #BiharPolice
    1
    मुजफ्फरपुर जीरोमाइल में ऑटो वाला से पर्ची के नाम पर पैसा वसूल रहा है
#viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur #BiharPolice
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • कर्तृत्वाला मानाचा मुजरा : चंद्रपूरकरांकडून जी.सी. विनय गौडा यांचा 19 एप्रिल ला भव्य नागरी सत्कार नव्या जिल्हाधिकारी वसूमना पंत देखील होणार सन्मानित चंद्रपूर: जिल्ह्याच्या विकासाला नवे आयाम देत प्रशासनाला लोकाभिमुखतेची धार देणारे माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांचे योगदान चंद्रपूरकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांची आणि राबवलेल्या उपक्रमांची आठवण आजही नागरिक अभिमानाने करतात. आ सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास प्रकल्पाना प्रशासकीय पातळीवर त्यांनी केलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळाली आहे. या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार असून, कार्यक्रमाला आ कीर्तिकुमार भांगडिया, आ. देवराव भोंगळे, आ करण देवतळे या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचवेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती वसूमना पंत यांचाही शुभेच्छापर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आगामी कार्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे. दोन्ही कार्यक्षम आणि लोकाभिमुख सनदी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित हा नागरी सत्कार सोहळा चंद्रपूरच्या सामाजिक ऐक्याचे आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
    1
    कर्तृत्वाला मानाचा मुजरा : चंद्रपूरकरांकडून जी.सी. विनय गौडा यांचा 19 एप्रिल ला भव्य नागरी सत्कार
नव्या जिल्हाधिकारी वसूमना पंत देखील होणार सन्मानित
चंद्रपूर: जिल्ह्याच्या विकासाला नवे आयाम देत प्रशासनाला लोकाभिमुखतेची धार देणारे माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांचे योगदान चंद्रपूरकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांची आणि राबवलेल्या उपक्रमांची आठवण आजही नागरिक अभिमानाने करतात. आ सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास प्रकल्पाना प्रशासकीय पातळीवर त्यांनी केलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळाली आहे. या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार असून, कार्यक्रमाला आ कीर्तिकुमार भांगडिया, आ. देवराव भोंगळे, आ करण देवतळे या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
याचवेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती वसूमना पंत यांचाही शुभेच्छापर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आगामी कार्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे.
दोन्ही कार्यक्षम आणि लोकाभिमुख सनदी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित हा नागरी सत्कार सोहळा चंद्रपूरच्या सामाजिक ऐक्याचे आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    11 hrs ago
  • *जूही जायसवाल प्रातः काल एक्सप्रेस* उत्तर प्रदेश के मिर्जापुर में एक वायरल वीडियो ने प्रशासन और राजनीति के बीच टकराव को उजागर कर दिया है। वीडियो में समाजवादी पार्टी (सपा) का एक स्थानीय नेता एसडीएम (उपजिलाधिकारी) और सीओ (क्षेत्राधिकारी) से बहस करता दिखाई दे रहा है। क्या दिख रहा है वीडियो में? सपा नेता खुद को अधिवक्ता (वकील) बताते हुए अधिकारियों से तीखी बहस करता है वह कहता सुनाई देता है — “अधिवक्ता हूं, आराम से SDM साहब” मौके पर मौजूद पुलिस और प्रशासनिक टीम स्थिति को नियंत्रित करने की कोशिश करती दिखती है. मामला क्या बताया जा रहा है? यह विवाद किसी स्थानीय प्रशासनिक कार्रवाई / जांच / व्यवस्था को लेकर बताया जा रहा है सपा नेता ने अपने अधिकारों और कानूनी स्थिति का हवाला दिया वहीं प्रशासनिक अधिकारी नियम-कानून का पालन कराने पर जोर देते नजर आए.
    1
    *जूही जायसवाल प्रातः काल एक्सप्रेस*
उत्तर प्रदेश के मिर्जापुर में एक वायरल वीडियो ने प्रशासन और राजनीति के बीच टकराव को उजागर कर दिया है। वीडियो में समाजवादी पार्टी (सपा) का एक स्थानीय नेता एसडीएम (उपजिलाधिकारी) और सीओ (क्षेत्राधिकारी) से बहस करता दिखाई दे रहा है।
क्या दिख रहा है वीडियो में?
सपा नेता खुद को अधिवक्ता (वकील) बताते हुए अधिकारियों से तीखी बहस करता है
वह कहता सुनाई देता है
— “अधिवक्ता हूं, आराम से SDM साहब”
मौके पर मौजूद पुलिस और प्रशासनिक टीम स्थिति को नियंत्रित करने की कोशिश करती दिखती है.
मामला क्या बताया जा रहा है?
यह विवाद किसी स्थानीय प्रशासनिक कार्रवाई / जांच / व्यवस्था को लेकर बताया जा रहा है
सपा नेता ने अपने अधिकारों और कानूनी स्थिति का हवाला दिया
वहीं प्रशासनिक अधिकारी नियम-कानून का पालन कराने पर जोर देते नजर आए.
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.