logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवांतर्गत आयोजित चौथ्या पुष्पात ख्यातनाम गायिका आर्या आंबेकर यांच्या ‘स्वर आर्या’ कार्यक्रमाने श्रोते भारावून गेले. या प्रसंगी आर्या आंबेकर व सहकलाकारांनी श्री गणेश स्तवन, तारकमंत्र, 'निशंक हो.. निर्भय हो..', 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा', 'श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ' आणि 'विठ्ठल विठ्ठल' यांसारखी विविध मराठी, हिंदी व कन्नड भावगीते आणि भक्तिगीते सादर केली. हा सोहळा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सायंकाळी संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संपादक महेश रामदासी, माजी नगरसेवक विजुभाऊ तांडेल, संपादक प्रशांत माने, सुनील घाटे, संपतराव शिंदे, नगरसेवक महेश हिंडोळे, सद्धाम शेरीकर, पंचायत समिती सदस्य विनोद मोरे, अपाशा किवडे, प्रथमेश इंगळे, आराध्य तांडेल, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे रिजनल हेड अंचित कुमार, बीड युवा सेना प्रमुख ऋषिकेश लोमटे, गणेश केरे पाटील, बाळकृष्ण लावंड, गुरुनाथ बुचांडे व कल्याणराव साळुंके यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान, श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांचे चिरंजीव कु. स्वराज याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात न्यासाच्या वतीने गायिका आर्या आंबेकर यांचा सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी व विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते मंत्रपठणाने पूजन संपन्न झाले. या प्रसंगी न्यासाच्या विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले, तर सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत करून आभार मानले.

1 day ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धाराशिव (उस्मानाबाद) शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
    1
    धाराशिव (उस्मानाबाद) शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
    user_Appasaheb Sirasathe
    Appasaheb Sirasathe
    उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भारतात पाण्यापासून चालणाऱ्या हायड्रोजन इंधनावरील पहिली रेल्वे सेवा सुरू झाली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच हायड्रोजन ट्रेन ठरली आहे.
    1
    भारतात पाण्यापासून चालणाऱ्या हायड्रोजन इंधनावरील पहिली रेल्वे सेवा सुरू झाली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच हायड्रोजन ट्रेन ठरली आहे.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील औसा येथे पवनचक्की प्रकल्पातून जर्मन वायर चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २३ जुलै रोजी पीव्हीआर चौक ते औसा बायपास रोडवर सापळा रचला होता. तेथे उभ्या असलेल्या MH-24-AU-2237 क्रमांकाच्या टाटा एस मालवाहू वाहनाची पाहणी केली असता, त्यात १५० किलो वजनाचे चोरीचे जर्मन वायरचे चार बंडल आढळले. औसा तालुक्यातील करजगाव पाटी परिसरातील पवनचक्की प्रकल्पातून हे वायर चोरी करून स्क्रॅप म्हणून विक्रीसाठी लातूर येथे आणल्याची कबुली संशयितांनी दिली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ५५,००० रुपयांचे वायर आणि २,५०,००० रुपयांचे मालवाहू वाहन असा एकूण ३,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये युनुस दस्तगीर शेख (वय ३८, रा. यहिया कॉलनी, लातूर), चमरुलाल नन्हुसिंग वरकडे (वय ३८, रा. कुटरायी, ता. शहापूर, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) आणि हरिचंद्र फगणू मरावी (वय ३०, रा. भानपूर, ता. सहपरा, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे आणि रामदास बाचीफळे यांच्या पथकाने केली.
    2
    लातूर जिल्ह्यातील औसा येथे पवनचक्की प्रकल्पातून जर्मन वायर चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २३ जुलै रोजी पीव्हीआर चौक ते औसा बायपास रोडवर सापळा रचला होता. तेथे उभ्या असलेल्या MH-24-AU-2237 क्रमांकाच्या टाटा एस मालवाहू वाहनाची पाहणी केली असता, त्यात १५० किलो वजनाचे चोरीचे जर्मन वायरचे चार बंडल आढळले. औसा तालुक्यातील करजगाव पाटी परिसरातील पवनचक्की प्रकल्पातून हे वायर चोरी करून स्क्रॅप म्हणून विक्रीसाठी लातूर येथे आणल्याची कबुली संशयितांनी दिली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ५५,००० रुपयांचे वायर आणि २,५०,००० रुपयांचे मालवाहू वाहन असा एकूण ३,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये युनुस दस्तगीर शेख (वय ३८, रा. यहिया कॉलनी, लातूर), चमरुलाल नन्हुसिंग वरकडे (वय ३८, रा. कुटरायी, ता. शहापूर, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) आणि हरिचंद्र फगणू मरावी (वय ३०, रा. भानपूर, ता. सहपरा, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे आणि रामदास बाचीफळे यांच्या पथकाने केली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वाटंबरे येथील जिल्हा प्राथमिक केंद्र शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बालदिंडी सोहळ्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
    1
    वाटंबरे येथील जिल्हा प्राथमिक केंद्र शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बालदिंडी सोहळ्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे शहरातील सर्व व्यापार आणि व्यवसाय आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दिल्ली येथील विद्यार्थी लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ आपले व्यवहार बंद ठेवले.
    1
    दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे शहरातील सर्व व्यापार आणि व्यवसाय आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.

सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दिल्ली येथील विद्यार्थी लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ आपले व्यवहार बंद ठेवले.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही कामे न करताच लाखो रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला असून ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या लाखोंच्या भ्रष्टाचाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणकर्ते पूर्ण जोमात आंदोलनावर ठाम आहेत.
    1
    भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही कामे न करताच लाखो रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला असून ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या लाखोंच्या भ्रष्टाचाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणकर्ते पूर्ण जोमात आंदोलनावर ठाम आहेत.
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • रविराज साबळे पाटील यांना आंबी पोलिस ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.
    1
    रविराज साबळे पाटील यांना आंबी पोलिस ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.