चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील 'अरेबियन ताज बिर्याणी' हॉटेलचे संचालक आणि एमआयएमचे (MIM) नगरसेवक अझहर शेख यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक नव्हता, हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी हे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक अझहर शेख यांचा हा वाद तिरंगा रॅलीवरून झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून सुरुवातीला दोन व्यक्तींमध्ये आपापसात झटापटी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या धारदार शस्त्राचा वापर झालेला नाही किंवा जीवघेणा हल्ला झालेला नाही, असे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत फरान फिरोज खान (२७), फेजान फिरोज खान (२२) आणि फिरोज गुलजार खान (४६) या तीन आरोपींविरोधात कलम ११८(१), २९६, ३५१, २८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे, असे प्रमोद चौगुले यांनी सांगितले.
चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील 'अरेबियन ताज बिर्याणी' हॉटेलचे संचालक आणि एमआयएमचे (MIM) नगरसेवक अझहर शेख यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक नव्हता, हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी हे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक अझहर शेख यांचा हा वाद तिरंगा रॅलीवरून झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून सुरुवातीला दोन व्यक्तींमध्ये आपापसात झटापटी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या धारदार शस्त्राचा वापर झालेला नाही किंवा जीवघेणा हल्ला झालेला नाही, असे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत फरान फिरोज खान (२७), फेजान फिरोज खान (२२) आणि फिरोज गुलजार खान (४६) या तीन आरोपींविरोधात कलम ११८(१), २९६, ३५१, २८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे, असे प्रमोद चौगुले यांनी सांगितले.
- मुल तालुक्यात आज सकाळी 10 वाजता मुल पोलिसांनी एक धडक कारवाई करत अवैध गोवंश तस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे. छत्तीसगडहून आंध्र प्रदेशच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयित आयशर वाहनाचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला जाळ्यात पकडले. या धडक कारवाईत वाहनातून ३७ गोधनांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी आयशर वाहनासह एकूण सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुल तालुक्यात अलीकडच्या काळात झालेली गोधन तस्करीविरोधातील ही सर्वात मोठी आणि कौतुकास्पद कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास मूल पोलीस करत आहेत.1
- हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी स्क्वॉड) अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये ₹2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दोन मोटारसायकली, एक मोपेड तसेच मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 26 जुलै 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना मौजा लाडकी-बुरकोणी मार्गावर दोन मोटारसायकलींवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे बबन थुल व भगवान काळे यांना ताब्यात घेण्यात आले. बबन थुल याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 100 सिलबंद बाटल्या (किंमत ₹12,000) तसेच हिरो पॅशन प्रो मोटारसायकल (किंमत ₹90,000) असा एकूण ₹1.02 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर भगवान काळे याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिलीच्या 100 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹12,000) व हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (किंमत ₹70,000) असा एकूण ₹82 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच दरम्यान संत तुकडोजी वॉर्ड येथील संदीप चाफले हा आपल्या मोपेडच्या डिकीत विदेशी दारू ठेवून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून हिरो डेस्टिनी मोपेड (किंमत ₹1 लाख), रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 6 बाटल्या तसेच रॉयल चॅलेंजर्स कंपनीच्या 180 मिलीच्या 4 बाटल्या असा एकूण ₹1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ₹2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल आणि डीबी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, प्रवीण बोधणे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई मंगेश वाघमारे, आशिष नेवारे व रोहित साठे यांनी संयुक्तपणे केली.1
- आज आपल्या सेहताकडे लक्ष पुरवा. प्रत्येक आरोग्य समस्यांचा योग्य आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहे. हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृत आजार, आणि फुफ्फुसाचे आजार (अस्थमा आणि क्षयरोग) यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य सल्ला महत्त्वाचा आहे. मधुमेहाच्या उपचारात एक नवीन आणि सोपी पद्धत साप्ताहिक इंसुलिन आहे, ज्याचा उल्लेख डॉ. मेहेर अब्बास यांनी केला आहे. या प्रकारचा इंसुलिन प्रकार 1 आणि प्रकार 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. स्वास्थ्यविषयक कोणत्याही सल्ल्यासाठी किंवा नियुक्ती बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकात संपर्क साधा. #DrMeherAbbas #Diabetes #Insulin #Awiqliinsulininjection #Type1diabetes #Type2diabetes1
- महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या विरोधात माहिती अधिकार कायदा आणि दप्तर दिरंगाई अधिनियम अंतर्गत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचा आधार म्हणून माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचा आणि दप्तर दिरंगाई अधिनियमाच्या तरतुदींचा संदर्भ घेतला गेला आहे. या चौकशीची मागणी केली गेली आहे कारण राहुल परिहार यांच्यावर काही आरोप आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे. या मागणीमुळे संबंधित प्राधिकरणांवर दबाव आला आहे की ते या आरोपांची तपासणी करावीत आणि योग्य कारवाई करावीत.1
- नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात मांडळ-किन्ही-शिवणी-कुजबा रस्त्यावर होणाऱ्या जनक्षोभाचा आवाज जोर धरू लागला आहे. वर्षभरातच लाखो रुपये खर्च करून बनवलेल्या या रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सरकारी पैशांची उधळपट्टी आणि अधिकाऱ्यांची भ्रष्ट वृत्ती याचा जिवंत पुरावा म्हणजे हा रस्ता! वर्षभरापूर्वीच बनवलेला हा रस्ता आज शोधूनही सापडत नाही. रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता आहे की मृत्यूची दरी? असा संताप आता नागरिक व्यक्त करत आहेत. कंत्राटदार-अधिकारी साखळीचा भांडाफोड: वर्षभरात रस्ता उखडतोच कसा? निकृष्ट दर्जाची खडी आणि नावापुरते डांबर वापरून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या मेहेरबानीमुळेच कंत्राटदाराचे उखडले पांढरे झाले असून सामान्य जनतेला मात्र धुळीचे आणि खड्ड्यांचे साम्राज्य सहन करावे लागत आहे. प्रवाशांच्या जिवाशी खेळ: या रस्त्यावरून रोज हजारो शेतकरी, शाळकरी मुले आणि नागरिक प्रवास करतात. खड्ड्यांमुळे दररोज गाड्यांचे अपघात होत असून निष्पाप लोक जखमी होत आहेत. एखादा मोठा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल विचारला जात आहे. अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा: या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट संशय आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) कसून चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना व त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे. ७ दिवसांत काम नाही तर 'ठिय्या' आंदोलन! सार्वजनिक बांधकाम विभागाने गाढ झोपेतून जागे व्हावे. येत्या ७ दिवसांच्या आत या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने सुरू झाले नाही, तर PWD कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयाचे कामकाज ठप्प केले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांचा सवाल: "जनतेचा कर रूपाने आलेला पैसा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. ७ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर PWD अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांत बसवून जाब विचारू!"1
- महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपू लागलेली सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मूग ही पिके आता पुन्हा जोमाने वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्याने अनेक ठिकाणी पिके धोक्यात आली होती. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचाही सामना करावा लागला होता. मात्र अलीकडे झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसामुळे शेततळी, विहिरी आणि नाल्यांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी चांगला पाऊस झाल्यास यंदाचे खरीप उत्पादन समाधानकारक होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.1
- महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील हिंग्णा तालुक्यातील धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री सुधीर बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना केली. मंत्री बावनकुळे यांनी देवस्थानाच्या परिसरातील विकासासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. देवस्थान परिसरातील सुविधा वाढवण्यासाठी त्यांनी विशेष भर दिली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी देखील त्यांच्या भेटीचे स्वागत केले.1
- चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील 'अरेबियन ताज बिर्याणी' हॉटेलचे संचालक आणि एमआयएमचे (MIM) नगरसेवक अझहर शेख यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक नव्हता, हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी हे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक अझहर शेख यांचा हा वाद तिरंगा रॅलीवरून झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून सुरुवातीला दोन व्यक्तींमध्ये आपापसात झटापटी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या धारदार शस्त्राचा वापर झालेला नाही किंवा जीवघेणा हल्ला झालेला नाही, असे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत फरान फिरोज खान (२७), फेजान फिरोज खान (२२) आणि फिरोज गुलजार खान (४६) या तीन आरोपींविरोधात कलम ११८(१), २९६, ३५१, २८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे, असे प्रमोद चौगुले यांनी सांगितले.1